मॅलिग्नंट हायपरथर्मीया (एमएच-MH) - Malignant Hyperthermia (MH) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 08, 2018

March 06, 2020

मॅलिग्नंट हायपरथर्मीया
मॅलिग्नंट हायपरथर्मीया

मॅलिग्नंट हायपरथर्मीया (एमएच-MH) काय आहे ?

शरीराचे उच्च तापमान हायपरथर्मीया म्हणून ओळखले जाते. मॅलिग्नंट हायपरथर्मीया (एमएच) हा एक कौटुंबिक वारसा रोग आहे ज्यामध्ये व्यक्ती शस्त्रक्रिये दरम्यान काही औषधांना (विशेषत: ॲनेस्थेटीक गॅस) अतिशय जलद प्रतिसाद दिल्याचे अनुभवतात. मॅलिग्नंट हायपरथर्मीयामध्ये स्नायूंच्या आकुंचनाचे गंभीर स्वरूप आणि शरीराचे तापमान वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. या अवस्थेत दिसणारा हायपरथर्मीया इतर वैद्यकीय आणीबाणी जसे संसर्ग किंवा उष्माघात यांच्यापेक्षा वेगळा आहे.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?

एमएचच्या(MH) सामान्य चिन्हे आणि लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहेः

  • शरीराचे तापमान 105 डिग्री फॅ (40.6 डिग्री सेल्सिअस) किंवा त्याहूनही जास्त वाढणे (अधिक वाचा: तापाचे उपचार).
  • स्नायूंचा ताठरपणा, कठोरपणा आणि वेदना (अज्ञात कारणामुळे).
  • जलद हृदय गती.
  • ॲसिडोसिस.
  • रक्तस्त्राव.
  • मूत्राचा रंग बदलणे जे गडद तपकिरी असू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

एमएच (MH) हा पुढील कारणांनी होऊ शकतो:

  • स्थितीचा वारसा (अगदी एक पालकाला जरी रोग असेल तरी त्यामुळे बाळाला हा रोग होऊ शकतो).
  • इतर स्नायूशी संबंधित वारसारोग जसे की:
    • मल्टिमिनकोर मायोपॅथी.
    • केंद्रीय मध्य भागातील रोग.

दोन्ही रोग स्केलेटल स्नायूंना (स्नायू जी हाडांसोबत एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना जोडलेले असतात) प्रभावित करतात, यामुळे स्नायू कमकुवत होतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

शस्त्रक्रियेदरम्यान ॲनेस्थेसिया दिल्यानंतर साधारणतः हि स्थिती उघडकीस येते. एमएच (MH) पासून पीडित व्यक्ती जलद आणि नेहमी अनियंत्रित हृदय दर अनुभवतात आणि ॲनेस्थेसिया दरम्यान कधीकधी अनपेक्षित मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे, ॲनेस्थेसियाचे व्यवस्थापन करण्यापूर्वी डॉक्टरांनी एमएच (MH) चा कौटुंबिक इतिहास घेतला आहे. या स्थितीचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही चाचण्यांमध्ये हे समाविष्ट होते:

  • रक्तचाचण्या जसे की :
    • क्लोटिंग टेस्ट:प्रॉथ्रोम्बीन टाइम (पीटी-PT) आणि पार्शल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम (पीटीटी-PPT).
    • ब्लड केमिस्ट्री पॅनल, ज्यामध्ये क्रिएटिनिन फॉस्फोकाइनेज (सीपीके) चा समावेश होतो.
  • मायोग्लोबिनच्या जी एक स्नायू प्रोटीन आहे. च्या स्तरांचे मूल्यांकन करण्यासाठी मूत्र चाचणी.
  • अनुवांशिक चाचणी.
  • स्नायूंचे बायोप्सी.

एमएच(MH) च्या व्यवस्थापनामध्ये समावेश होतो:

  • डेनट्रोलिनचे प्रशासन, जे एमएच(MH)च्या प्रकरणात पसंतीचे औषध मानले जाते.
  • एखाद्या व्यक्तीला शीतल ब्लँकेटने गुंडाळून ताप किंवा आणखी गंभीर गुंतागुंतींचा धोका कमी करणे.
  • एमएचच्या प्रकारणा दरम्यान व्यक्तीला शिरेतून (शिरेच्या आतून) द्रव दिला जातो, त्यामुळे किडनीचे नुकसान रोखण्यास मदत होते आणि त्यामुळे त्याच्या कार्याचे जतन होते.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Malignant hyperthermia.
  2. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Malignant hyperthermia.
  3. Tobin JR, Jason DR, Challa VR, Nelson TE, Sambuughin N. Malignant hyperthermia and apparent heat stroke.. JAMA. 2001 Jul 11;286(2):168-9.
  4. Larach MG, Brandom BW, Allen GC, Gronert GA, Lehman EB. Malignant hyperthermia deaths related to inadequate temperature monitoring, 2007-2012: a report from the North American malignant hyperthermia registry of the malignant hyperthermia association of the United States.. Anesth. Analg. 2014 Dec;119(6):1359-66.
  5. National Organization for Rare Disorders. [Internet]. Danbury; Malignant Hyperthermia.