लिव्हर फेल होणे(यकृत खराब होणे) म्हणजे काय?
यकृत बरीच कामे करते. ते रक्त फिल्टर करते,अन्नाला वापरण्यायोग्य शक्तीमध्ये बदलते आणि ह्यामध्ये बचावात्मक कार्य करते. जेव्हा यकृत यातील काही किंवा सर्व कामे करू शकत नाही त्या स्थितीला लिव्हर फेल होणे असे म्हणतात.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
यकृत खराब होण्याचे 2 प्रकार आहेत:- ॲक्युट व क्रोनिक.
- काही दिवसात किंवा आठवड्यात यकृत खराब होण्याच्या स्थितीला ॲक्यूट स्थिती म्हणतात. याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- क्रॉनिक फेल होण्याची लक्षणे दिसायला काही महिने किंवा काहीवेळेस वर्षांचा कालावधी लागू शकतो. अक्युट यकृत खराब होण्याच्या लक्षणांव्यतिरिक्त ही जास्तीची लक्षणे दिसून येतात:
- पायांमध्ये द्रवपदार्थ पूर्णपणे प्रवाहित होऊ शकत नाही, ज्यामुळे पायांना सूज येते.
- द्रव पदार्थ पोटात साठून राहतात (असायीटस).
- वजन कमी होणे.
- सतत रक्तस्त्राव.
तिसरा प्रकार, ज्याला ॲक्युट ऑन क्रोनिक यकृत खराब म्हणतात, अलिकडेचमाहित झाला आहे, ज्यामध्ये अचानक यकृतची कार्यप्रणाली बिघडल्यामुळे क्रोनिक यकृत खराब होण्याची शक्यता असते.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
- ॲक्युट खराबीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- काही औषधे जसे अँटी एपिलेप्टीक्स चे दुष्परिणाम.
- व्हायरल संसर्ग जसे हेपिटायटीस बी किंवा हेपिटायटीस सी चा संसर्ग.
- विषारी पदार्थांचे सेवन.
- काहीवेळेस कर्करोगामुळे सुद्धा यकृत खराब होण्याची शक्यता असते.
- हर्बल प्रिपरेशन्स.
- क्रॉनिक खराबीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- दारुचे बराच काळ सेवन.
- हेपेटिक सिरोसिस.
- ऑटोइम्युन हेपिटायटीस सारखे ऑटोइम्युन आजार.
- जनुकीय आजार.
- कुपोषण.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
तुम्ही ज्यावेळेस वरील लक्षणांसह डॉक्टर कडे जाता, तेव्हा ते तुमच्या औषधांचा इतिहास, दारू सेवन, जनुकीय आजारचा अभ्यास करतात.
- एक छोटी रक्त तपासणी सोबत एक बायोप्सी जे यकृताच्या निकामिपणा चे योग्य निदान करू शकते.
- पोटाचा अल्ट्रासाऊंड, सी टी स्कॅन, एम आर आय या तपासण्या मुळे डॉक्टर ना तुमच्या यकृताचे आरोग्य कळते.
पुढील पद्धतीत कारणांवर उपचार, लक्षणांवर उपाय व रुग्णाला स्थिरता देण्याचे काम केले जाते.
- जर औषधे खराबीचे कारण असेल तर औषध इतर औषधांसोबत बदलले जाते.
- जर यकृताचा काही भाग निकामी असेल तर तो काढून टाकला जातो म्हणजे तेथे तो भाग परत बनू शकतो.
- जर यकृत निकामी होण्यामागे काही दुर्मिळ कारण असेल तर यकृत प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसतो.
- उपाचारांसोबत आहार व जीवनशैली मध्ये देखील बदल करावे लागतात.