रक्ताचा कर्करोग - Blood Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 11, 2018

March 06, 2020

रक्ताचा कर्करोग
रक्ताचा कर्करोग

रक्ताचा कर्करोग म्हणजे काय?

रक्ताचा कर्करोग हा असा आजार आहे ज्यामध्ये रक्त पेशींच्या विकासात अडथळा निर्माण झाल्यामुळे  शरीराच्या सामान्य कार्यामध्ये (संसर्गा विरुद्ध लढा, होमिओस्टॅसिस किंवा दुरुस्ती कार्या विरुद्ध लढणे) अडथळा येतो. यामुळे तांबड्या पेशींमध्ये अतिशय वेगाने वाढ होऊन आरोग्यात बिघाड झाल्याची लक्षणे दिसू लागतात. रक्ताच्या कर्करोगाचे मुख्य प्रकार आहेत, मायलोमा, ल्युकेमिया आणि लिम्फोमा जे क्रमशः 3 वेगवेगळ्या पेशींना प्रभावित करतात, उदा. प्लेटलेट्स, पांढऱ्या रक्त पेशी आणि लिम्फोसाइट्स.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

रक्ताच्या कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळी असतात, काही सामान्यतः दिसून येणारी लक्षणे अशी आहेत:

  • अचानक आणि अनावश्यक वजन कमी होणे.
  • अशक्तपणा किंवा खूप थकल्यासारखे वाटणे.
  • खूप घाम येणे, विशेषत: रात्री.
  • पुन्हा पुन्हा होणारे संसर्ग.
  • हाडे आणि / किंवा सांधे दुखणे.
  •  त्वचा खाजवणे, ज्यामध्ये सहजपणे जखम आणि / किंवा रक्तस्त्राव होतो.
  • डोके, मान, मांडीच्या सांध्यात किंवा पोटात गळती किंवा सूज येणे.

रक्ताच्या कर्करोगाचे मुख्य कारण काय आहे?

रक्ताचा कर्करोग मुख्यत्वे डीएनएमधील उत्परिवर्तन(बदल) किंवा दोषांमुळे होतो. उत्परिवर्तनांचे कारण अज्ञात आहे आणि कौटुंबिक इतिहास, वय, लिंग, अनुवांशिकता किंवा इतर आरोग्य-संबंधित परिस्थिती, यासारख्या घटकांशी संबंधित मानले जाते. विशिष्ट रसायने किंवा किरणोत्सर्गाच्या प्रसारच्या इतिहासाशी देखील ते संबंधित असू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सामान्यत: जेव्हा तुम्ही इतर कोणत्याही रोगासाठी रक्त तपासणी करता, तेव्हा अचानक रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान होते आणि जेव्हा डॉक्टर्स लक्षणांवर आधारित खालील तपासणी करण्याचा सल्ला देतात:

  • रक्त तपासण्या:
    • पेरीफेरल ब्लड फिल्म.
    • पूर्ण रक्त गणना (एफबीसी).
    • संसर्गाची स्क्रीनिंग / व्हायरोलॉजी चाचणी.
    • यूरिया आणि इलेक्ट्रोलाइट्स.
    • लिव्हर फंक्शन टेस्ट.
    • फ्लो सायटोमेट्री (इम्यूनोफेनोटाइपिंग).
    • सायटोजेनेटिक चाचणी.
  • बोन मॅरो आणि लिम्फ नोड बायोप्सी.
  • स्कॅनस:
    • एक्स- रे.
    • अल्ट्रासाऊंड.
    • संगणित टोमोग्राफी (सीटी).
    • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय).

रक्त कर्करोगाच्या व्यवस्थापनामध्ये विविध स्तरावर उपचार समाविष्ट आहे.

  • उच्च-तीव्रता उपचार - कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबविण्यासाठी किंवा  बंद करण्यासाठी स्ट्रॉंग औषधे वापरली जातात. यात खालीलचा समावेश होतो:
    • उच्च किंवा प्रमाणित किमोथेरपीचा डोज (कमी डोज कमी-तीव्रतेच्या उपचारांमध्ये वापरले जातात).
    • रेडिएशन किंवा सर्जरी.
    • स्टेम सेल प्रत्यारोपण
  • याचा उपयोग (कमी-तीव्रतेची थेरपी म्हणून देखील वापरला जाऊ शकतो):
    • मोनोक्लोनल अँटीबॉडीज.
    • बायोलॉजिकल थेरपी.
    • इम्युनोथेरपी.



संदर्भ

  1. Bloodwise. What is blood Cancer ?. 23 May 2019; [Internet]
  2. Bloodwise. Blood cancer treatments and side effects. 11 Aug 2017; [Internet]
  3. Bloodwise. Blood cancer treatments and side effects. 11 Aug 2017; [Internet]
  4. National Health Service [Internet]. UK; Overview - Multiple myeloma
  5. Imperial College Healthcare. Blood cancer. [Intrnet]

रक्ताचा कर्करोग साठी औषधे

Medicines listed below are available for रक्ताचा कर्करोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹148.75

₹145.0

Showing 1 to 0 of 2 entries