पायात क्रॅम्प्स येणे म्हणजे काय?
पायात क्रॅम्प्स म्हणजे पोटरी आणि मांडीच्या भागात स्नायूंच्या आकुंचनातून वेदना निर्माण होणे. हे क्रॅम्प्स अचानक आणि उत्स्फूर्तपणे येतात. या प्रकारचे स्नायुंचे आकुंचन हे आपोआपच पूर्ववतही होतात. पायातील क्रॅम्प्स येणे हे सहसा तरुणांपेक्षा प्रौढ लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. धावपटू आणि खेळाडूंना त्यांच्या शारीरिक हालचाली आणि मानसिक ताणामुळे अचानक क्रॅम्प्स येतात. जरी पाय आणि मांडीच्या स्नायूंमुळे क्रॅम्प्स निर्माण होत असले तरीही या क्रॅम्प्स चा पोटरीच्या स्नायूंवर परिणाम होणे हे खूप सामान्य आहे.
हे क्रॅम्प्स सहसा फार गंभीर नसतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्यामुळे इतर शारिरिक कॉम्प्लिकेशन होत नाहीत.
पायातील क्रॅम्प्स ची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बहुधा पायातील क्रॅम्प्स हे रात्री व झोपेतून उठताना येतात.या प्रकारचे क्रॅम्प्सला नॉक्टर्नल क्रॅम्प्स असेही म्हणतात. पायाचे क्रॅम्प्स हे पायावरील सूजे मुळेही होऊ शकतात.
पायातील क्रॅम्प्स चे मुख्य कारणं काय आहेत?
पायातील क्रॅम्प्स हे कोणत्याही कारणाशिवाय उद्भवतात. काही त्रासदायक घटक हे या क्रॅम्प्ससाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
- मद्यपान व धूम्रपानाच्या सवयीमुळे पायात क्रॅम्पसचा त्रास होऊन तो दीर्घ काळापर्यंत राहतो.
- मानसिक परिस्थिती जसे कि गरोदरपणा किंवा जास्त वेळ बसून राहण्याच्या कारणांमुळेही पायाचे क्रॅम्प्स येतात.
- पार्किंसोनीझम सारख्या स्नायूंशी निगडित आजारामुळे (न्यूरोमस्क्युलर) त्रासदायक पायाचे क्रॅम्प्स होतात.
- काहींना पायाचे क्रॅम्प्स औषधांचा दुसपरिणामामुळेही होतात.
- विशिष्ट स्नायूंच्या अती वापरामुळेही क्रॅम्प्स होतात.
पायाच्या क्रॅम्प्स चे निदान व उपचार कसे केले जातात?
या आजारास विशिष्ट निरीक्षणाची गरज नाही, जर ते एकच लक्षण तुम्ही अनुभवत असाल. डॉक्टर पायाची सूज, इजा आणि इतर काही कारणांसाठी तपासणी करतात. जर इतर काही समस्या वाटली तर एक्स-रे काढायला सांगितले जाऊ शकते.
अनेकदा पायाचे क्रॅम्प्स हे आपोआपच बरे होतात. योग्य व्यायाम आणि पुरेश्या प्रमाणात झोप याव्यतिरिक्त इतर कोणत्याही विशिष्ट उपचाराची गरज नसते. गरम शेक घेतल्याने क्रॅम्प्स वर त्वरित आराम मिळण्यास मदत होते. जलद चालणे किंवा पायाच्या बोटांवर चालणे पायाच्या क्रॅम्प्ससाठी उपयुक्त असते. जर क्रॅम्प्स चा त्रास सतत आणि असह्य होत असेल तर मेडिकल स्टोअर मध्ये मिळणारे पेनकिलर आणि स्नायूंना आराम देणारे उपचार परिणामकारक ठरतात.