केराटोसिस, सेब्होरिक काय आहे?
सेब्होरिक केराटोसिस ही एक सामान्य, कर्करोग नसलेली त्वचा वाढ आहे, जी सामान्यतः वृद्ध व्यक्तींमध्ये आढळते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, ही हानीकारक नसली तरी चांगली दिसत नाही.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
या प्रकारची वाढ चेहरा, पाठ, खांदे आणि छातीवर दिसू शकते. तर टाळूवर ही सामान्यपणे कमी दिसते.
- ही मेणासारखी आणि उंचावलेली दिसते आणि याची वाढ सामान्यतः काही सेंटीमीटर आकाराची असते.
- गोल किंवा अंडाकृती वाढेचा रंग पिवळट तपकिरी किंवा गडद तपकिरी असतो, कधीकधी काळी असू शकते.
- सेब्होरिक केराटोसिसच्या वाढीचे "पेस्ट ऑन" स्वरूपाची वाढ, असे सामान्यपणे वर्णन केले जाते.
- ही वाढ क्वचितच वेदनादायक असते, परंतु ती खाजवू शकते, विशेषत: जेव्हा ती कपडे किंवा उपकरणाच्या संपर्कात येते.
- दिसण्यावर आधारित, याचे अनेक रूपात्मक नमुन्यात विभाजन केले जाऊ शकते.
याची मुख्य कारणे काय आहेत?
या दुर्मिळ स्थितीचे कोणतेही अचूक कारण नाही. पण, वृद्ध व्यक्ती सामान्यतः अधिक प्रभावित होतात.
- सेब्होरिक केराटोसिसचा जर कौटुंबिक इतिहास असेल तर हा एक जोखमीचा घटक आहे.
- अपुरे पुरावे सूचित करतात की, ही वाढ सतत उन्हात असणाऱ्यांमध्ये दिसून येते.
- ही वाढ सांसर्गिक नाही आणि त्यामुळे संपर्काद्वारे हस्तांतरित होत नाही.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पॅचेसचे निरीक्षण करून डॉक्टर याचे निदान करतात. पण, मेलानोमा किंवा इतर कोणत्याही विकृतीची शक्यता वगळायला टिश्यूंच्या बायोप्सीचा सल्ला देण्यात येतो. सहसा, इतर निदान चाचण्यांची आवश्यक नसते. यासाठी उपचाराची आवश्यकता नसते. वाढ खूप तीव्र किंवा वेदनादायक झाल्यास काढून टाकणे आवश्यक आहे. कॉस्मेटिक कारणास्तव, सेब्होरिक केराटोसिस काढून टाकणे आवश्यक आहे. ही वाढ काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.
- ते लेसरच्या सहाय्याने किंवा क्रिओसर्जरीद्वारे द्रव नायट्रोजन वापरुन काढले जाऊ शकतात.
- वाढीपासून मुक्त होण्यासाठी इलेक्ट्रोसर्जरी ही दुसरी पद्धत आहे. केराटोसिस काढून टाकण्यासाठी यात विद्युत प्रवाहाचा वापर केला जातो.
- आणखी एक शस्त्रक्रिया म्हणजे क्युरिटेज हे साधन वापरून केलेले उपचार, ज्यामध्ये वाढ खोदून बाहेर काढली जाते.
जरी एकाच जागी वाढीची पुनरावृत्तीची होण्याची शक्यता नसली, तरी तुमच्या शरीराच्या इतर भागामध्ये वाढ होण्याची शक्यता असते.