डोळे खाजवणे म्हणजे काय?
डोळे खाजवणे (ओक्युलर प्र्यूरायटस) ही एक सामान्य समस्या आहे, ज्यामध्ये शरीर एखाद्या ट्रिगर किंवा ॲलर्जीची प्रतिक्रिया म्हणून हिस्टामाइन नावाचे रसायन सोडते. यामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्या रुंदावतात आणि डोळे चुरचुरतात, खाजवतात, पाणी येते आणि कधी डोळे लाल होतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
खाजऱ्या डोळ्यांसह सामान्यतः हे चिन्हे आणि लक्षणे पहायला मिळतात:
- डोळ्याच्या पृष्ठभागावर आणि त्याच्या पृष्ठभागावरील पडद्यावर सूज येणे.
- नाक वाहणे.
- गळ्याच्या आत खाजवणे.
- शिंका येणे.
- पापण्या सुजणे.
- डोळ्यात पाणी येणे.
- डोळ्यांची आग होणे.
- डोळे लाल होणे.
याची मुख्य कारणे काय आहेत?
डोळे खाजवण्याचे सामान्यतः पुढील कारणांपैकी एक कारण असू शकते:
- ॲलर्जी (धूळ माइट्स परागकण, धूळ, डोळ्यात टाकण्याचे ड्रॉप किंवा प्राण्यांचे केस).
- डोळ्याभोवतीच्या त्वचेचा रोग.
- ड्राय आय सिंड्रोम - जेव्हा तुमचे शरीर पुरेसे अश्रू निर्माण करण्यास अपयशी ठरते, जे डोळ्यांच्या पृष्ठभागाला ओलसर आणि आरामदायक ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
- रसायने किंवा बाहेरची वस्तू डोळ्यात जाणे ( मेकअप किंवा पूल मधील क्लोरीन).
- ब्लेफेरायटीस - संसर्गामुळे पापण्यांची जळजळ होणे.
- कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्ग.
- प्रतिकूल औषधाच्या प्रतिक्रियेमुळे (अँटीहिस्टामिनिक्स, पेनकिलर, अँटीडिप्रेसर्रस किंवा गर्भनिरोधक गोळ्या).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर तुमची पूर्णपणे तपासणी करतात:
- पापण्या, डोळ्याच्या बुबुळाचा पारदर्शक पडदा, पापण्यांच्या आतला अस्तरपदर.
- डोळ्याच्या हालचाली.
- तुमच्या डोळ्याच्या तारिकेची प्रकाशाला प्रतिक्रिया.
- दृष्टी.
डोळ्यांना खाज येण्याचे कारण काय आहे, हे ओळखून त्यावर उपचार केले जातात:
- सुरुवातीला, जर एखादा बाहेरचा कण तुमच्या डोळ्यात गेला असेल तर खालील गोष्टी केल्या जाऊ शकतात:
- डोळे स्वच्छ करण्यासाठी सलाईन किंवा कोमट पाणी वापरले जाऊ शकते
- डोळ्यांवर बर्फाचा पॅक ठेवणे किंवा डोळे बंद करून त्यावर स्वच्छ थंड ओलसर कापड ठेवणे
- तुमचे डोळे धुण्यासाठी थंड पाणी वापरा
- डोळे चोळू नका आणि 24 तासांच्या आत आराम न मिळाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
- ॲलर्जीच्या बाबतीत अँटीहिस्टामाइन किंवा दाह विरोधी डोळ्यात टाकण्याच्या ड्रॉप्सचा सल्ला देण्यात येईल.
- सर्वसाधारणपणे डोळ्याच्या पृष्ठभागावरून ॲलर्जन्स धुण्यासाठी, डोळ्यात पाणी आणणाऱ्या ड्रॉप्स चा सल्ला दिला जाईल.
- खोलीच्या चारही बाजूंना पाण्याच्या वाट्या ठेवून, सुकलेल्या डोळ्यांना हाताळण्यासाठी हवेत शक्य तितकी आद्रता आणण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे डोळ्यांना येणारी खाज कमी होईल.
- डोळ्याचे संसर्ग हाताळण्यासाठी अँटीव्हायरल किंवा अँटीबायोटिक डोळ्याचे थेंब किंवा मलम वापरणे.