इनग्रोन टोनेल(पायाचे नख आतल्या बाजूने वाढणे) म्हणजे काय?
इनग्रोन टोनेल मध्ये नखाच्या कोपऱ्यालगतच्या त्वचेत वाढ होते. तुमच्या पायाच्या अंगठ्यावर याचा सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता असते. जर पायाचे नख आतल्या बाजूने वाढले तर त्यातून बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात. खराब वास येतो आणि त्यातून द्रव वाहू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सुरुवातीची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
- नखालगतची त्वचा सुजते आणि अलवार होते.
- पायाचा बोट दाबला तर दुखतो.
- अंगठयाभोवती द्रव जमते.
जर पायाच्या बोटाला संसर्ग झाला तर खालील लक्षणे दिसू शकतात :
- रक्तस्त्राव.
- पस वाहणे.
- नखाभोवती त्वचेची जास्त वाढ.
- चालताना वेदना.
याची मुख्य कारणं काय आहेत?
इनग्रोन टोनेलची समस्या बहुतेक त्या लोकांना होते ज्यांना पायांना खूप घाम येतो. इनग्रोन टोनेलची कारणं खालीलप्रमाणे आहेत:
- पायाच्या अंगठ्यावर दाब घालणारे बूट वापरणे.
- एखादी टोकदार वस्तू लागून किंवा जाड वस्तू पडून पायाच्या बोटाला इजा होणे.
- अनियमित आणि वक्र पायाच्या बोटाचे नख.
- अयोग्यपणे कापलेले पायाच्या बोटाचे नख.
- पायांची अस्वच्छता.
- कधीकधी, इनग्रोन टोनेल अनुवांशिक असते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सामान्यत:, तुमचे डॉक्टर शारीरिक तपासणीतून इनग्रोन टोनेलचे निदान करू शकतात. कधीकधी, नखं त्वचेमध्ये किती वाढले आहेत याची तपासणी करण्यासाठी एक्स-रे आवश्यक असू शकतो.
घरगुती उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:
- दिवसातून 3-4 वेळा पाय कोमट पाण्यात बुडवणे.
- बाकी दिवसभर पाय कोरडे ठेवणे.
- आरामदायक बूट वापरणे.
- वेदना कमी करण्यासाठी एनालजेसिक्स घेणे.
2-3 दिवसात काही सुधारणा न झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखाद्या इन्फेक्टड इनग्रोन टोनेलच्या प्रकरणात, डॉक्टर शस्त्रक्रिया करून नखं, नखांच्या आजूबाजूची त्वचा आणि आसपासचे मऊ टिश्यू काढून टाकतात.
शस्त्रक्रियेनंतर बहुतेक लोकांच्या वेदना कमी होतात आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांचे नियमित दिनचर्या पुन्हा सुरू करू शकतात.