इम्पेटिगो म्हणजे काय?
इम्पेटिगो हा एक सामान्य त्वचेचा रोग त्वचेचा रोग आहे जो मुलांना प्रभावित करतो, ह्यामध्ये खाजवणारे फोड होतात जे खूप संसर्गजन्य असतात. हा मुलांमध्ये अधिक होत असल्यामुळे, त्याला 'स्कूल सोर' असेही म्हटले जाते. हा वरवरच्या त्वचेवर परिणाम करणारा जिवाणूचा संसर्ग आहे आणि 7-10 दिवसात बरा होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
इम्पेटिगो दोन प्रकारचा असतो -
- उग्र नसलेला इंपेटीगो
- खाजवणारे फोडी
- फोड फुटल्यावर त्वचा लाल होणे
- फोडांच्या जवळच्या पेशींना सूज येणे
- मधाच्या रंगासारखी खपली होणे
- उग्र इंपेटीगो : ह्यामध्ये द्रव भरलेले फोड होतात आणि आजूबाजूची त्वचा लालसर होत नाही. पिवळ्या रंगाचे फोड होतात आणि फुटण्याऐवजी कडक फोडांमध्ये बदलतात जे डाग न सोडता आपोआप बरे होतात.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
हा सामान्यपणे स्टॅफिलोकोकस ऑरियस किंवा स्ट्रेप्टोकोकस पायोजीनस जिवाणूमुळे होतो.डेकेअर सेंटर, अतिगर्दीचे ठिकाण आणि संपर्काचे खेळ यामुळे हा रोग पसरू शकतो. एक्झिमा किंवा चिकनपॉक्स झालेला असताना मुलांना हा संसर्ग होऊ शकतो. खाजवल्याने त्वचा विघटित होते आणि जिवाणूंना प्रवेश करणे सोपे होते. हे जिवाणू कीडा चावल्याने, त्वचेवर पुरळ आल्याने, लागल्याने किंवा भाजल्याने शरीरात प्रवेश करू शकतात. उबदार आर्द्र हवामानात हे सामान्यपणे पाहिले जातात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
त्वचेची तपासणी करून त्वचारोग विशेषज्ञ इम्पेटिगो रोगाचे निदान करू शकतात. संसर्गास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाचा प्रकार जाणून घ्यायला फोड तपासणीकरिता लॅबमध्ये पाठवला जातो.
इम्पेटिगो सामान्यतः एक गंभीर रोग नसून 2 ते 3 आठवड्यांमध्ये बरा होतो. सौम्य प्रकरणांसाठी, ॲन्टीबायोटिक क्रीम दिले जाऊ शकते. संसर्ग मोठ्या प्रमाणात आणि अधिक गंभीर असल्यास तोंडामार्गे घेतली जाणारी अँटीबायोटिक औषधे दिली जाऊ शकतात. प्रभावित जागेवर क्रीम लावण्या पूर्वी आणि नंतर हात धुणे महत्वाचे असते.
प्रभावित जागेवर स्वतः आणि दुसऱ्यांनी हात लावणे टाळावे. प्रभावित मुलांना शाळा, डे केअर सेंटर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणापासून दूर ठेवले पाहिजे. पसरण्यापासून बचाव करण्यासाठी, रुग्णांचे रुमाल, पलंगाची चादर आणि कपडे गरम पाण्याने (सुमारे 60 डिग्री) धुवावेत.