आयडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस काय आहे?
फायब्रॉसिस हा एक असामान्य फुफ्फुसांचा रोग आहे ज्यामध्ये फुफ्फुसे खराब आणि जाड होतात. या डागांना फायब्रॉसिस म्हणतात. बरेचदा याचे कारण अज्ञात असते म्हणूनच याला आयडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिस (आयपीएफ) म्हणतात. या गंभीर आजाराचा प्रभाव मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तींवर होऊ शकतो. यामुळे हे परिणाम होऊ शकतात - श्वसनसंस्था निकामी होणे, फुफ्फुसांनमधील उच्च रक्तदाब, हृदय बंद होणे, फुफ्फुसातील रक्तवाहिनीच्या रक्त प्रवाहात अडथळा (फुफ्फुसांना रक्त पुरवणाऱ्या धमन्यांमध्ये रक्ताची गाठ होणे) आणि फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
आयपीएफशी संबंधित लक्षणांची यादी खाली दिली आहे:
- कोरडा खोकला.
- धाप लागणे.
- फुफ्फुसातून आवाज येणे.
- रक्ताभिसरण नीट होत नसल्यामुळे हाताच्या व पायाच्या बोटांची टोके रूंद व जाड होणे.
- स्नायू आणि सांधे दुखणे.
- भूक न लागणे.
- वजन खूप कमी होणे.
- छातीत दुखणे किंवा छातीवर दबाव वाढणे.
- सुस्ती किंवा थकवा.
याची मुख्य कारणे काय आहेत?
आयडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिसची कारणे अज्ञात आहेत पण काही पर्यावरणीय घटक आणि प्रदूषण यामुळे फुफ्फुसांच्या फायब्रॉसिसचा धोका वाढतो. धूम्रपान, धातूच्या धुळीशी संपर्क, लाकडाचा भुसा, दगडाची धूळ, सिलिका, हे डस्ट, बुरशी किंवा शेती उत्पादने यासारख्या घटकांमुळे फुफ्फुसाच्या फायब्रॉसिस होऊ शकतो. यामुळे बहुतेक पुरुष प्रभावित होतात आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हे अधिक प्रमाणात दिसून येते. आयपीएफ असलेल्या सुमारे 20% लोकांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये इंटरस्टिशियल फुफ्फुसांच्या आजाराचे निदान होते.
एखाद्या कुटुंबात एकापेक्षा जास्त सदस्यांना या अवस्थेचा त्रास होत असेल तर त्याला कौटुंबिक फुफ्फुसांचे फायब्रॉसिस म्हणतात. आयपीएफ असलेल्या 75% रुग्णांना गॅस्ट्रोइसोफेगल रीफ्लक्स रोग (जीईआरडी) देखील असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
आयडिओपॅथिक पल्मनरी फायब्रॉसिसचे निदान करण्यासाठी फुफ्फुसशास्त्रज्ञ, रेडियोलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजिस्टचे बहु-अनुशासनिक दृष्टिकोन असणे आवश्यक असते, कारण याची लक्षणे बरेचदा दमा, क्रोनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिझीज (सीओपीडी), आणि कंजस्टिव्ह हार्ट फेलिअर सारखी असतात. तुमचे डॉक्टर निदानासाठी वैद्यकीय इतिहासा, शारीरिक परिक्षण आणि एक्स-रे, हाय रेझोल्यूशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी), फुफ्फुसांचा फंक्शन टेस्ट, पल्स ऑक्सिमेट्री, धमनी रक्ताची गॅस चाचणी, क्षय रोगासाठी त्वचा तपासणी, व्यायाम चाचणी, आणि फुफ्फुसाची बायोप्सी करायला सांगू शकतात.
डॉक्टर याच्या उपचारासाठी औषध, ऑक्सिजन थेरेपी, फुफ्फुसांचे पुनर्वसन किंवा फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करु शकतात. काही अतिरिक्त औषधे धाप लागण्यावर आणि खोकल्याचा उपचार करण्यासाठी देण्यात येतात. गॅस्ट्रोइसोफेगल रीफ्लक्स आजारा (जीईआरडी) साठी अँटासिड थेरपी देखील दिली जाते.