इक्थियोसिस काय आहे?
इक्थियोसिस त्वचेचा आनुवंशिक विकार आहे, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत होते. हा सर्व वयोगटाच्या, वंशाच्या आणि लिंगांच्या लोकांना प्रभावित करतो. हा सामान्यत: जन्माच्या वेळी किंवा आयुष्याच्या पहिल्या वर्षी होतो आणि आयुष्यभर टिकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
इक्थियोसिसच्या प्रकारानुसार त्याची चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळी असतात.
- इक्थियोसिस व्हल्गेरिस - हा सर्वात सामान्य प्रकार आहे. याची आयुष्याच्या पहिल्याच वर्षात लक्षणे दिसून येतात. त्वचा खडबडीत, कोरडी आणि ओबडधोबड होते. तळहात आणि पायाचे तळवे यावरची त्वचा जाड होण्याबरोबरच त्यावर नेहमीपेक्षा जास्त रेषा दिसतात. कोपर आणि गुडघ्याचा दर्शनी भाग आणि बाक यामुळे प्रभावित होत नाही.
- एक्स-लिंक्ड इक्थियोसिस बहुतेक पुरुषांना प्रभावित करतो. धड आणि अवयवांवरची त्वचा खडबडीत होते.
- हरलेक्विन इक्थियोसिस - हा एक दुर्मिळ प्रकार आहे आणि यात त्वचा खूप खडबडीत होते.
- घाम न येऊ शकल्यामुळे शरीराचे तापमान वाढते किंवा वारंवार ताप येतो.
- चांगले दिसत नसल्याने स्वतःबद्दलचे मत मानसिकरीत्या फारसे चांगले राहत नाही.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अपत्याला पालकांकडून आनुवांशिकतेने जेनेटिक म्युटेशन मिळाल्यामुळे इक्थियोसिस होतो. काही बाबतीत पालक हे सदोष जीनचे वाहक असतात, याचा अर्थ असा होतो की त्यांचे ही दोषपूर्ण जीन असतात परंतु त्यांना रोग होत नाही. पण, जेव्हा दोन्ही पालक वाहक असतात तेव्हा अपत्याला हा रोग होतो. कॅन्सरच्या थेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे इक्थियोसिस होऊ शकतो.
सदोष जीन त्वचेच्या पुनरुत्पादनात अडथळा निर्माण करतात. एकतर नवीन त्वचेच्या पेशी खूप वेगाने तयार होतात किंवा जुनी त्वचा फारच हळूहळू गळते ज्यामुळे त्वचा खडबडीत आणि ओबडधोबड होते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
त्वचेतील बदल पाहून डॉक्टर इक्थियोसिसचे निदान करू शकतात. डॉक्टर वैद्यकीय आणि कौटुंबिक इतिहासाबद्दल तपशीलवार विचारतात. इतर त्वचारोगांपासून इक्थियोसिसला वेगळे करण्याकरिता त्वचेची बायोप्सी केली जाऊ शकते.
या रोगासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. त्वचेचा कोरडेपणा कमी करणे आणि ती सजलीत ठेवणे हा उपचारांचा प्राथमिक हेतू असतो. वारंवार आंघोळ करणे, आंघोळ करतांना मऊ त्वचा काढणे, आंघोळीनंतर लगेचच मॉइस्चरायझर लावणे आणि खुल्या जखमांवर पेट्रोलियम जेली लावणे हे या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते.