हायपरथायरॉडिझम म्हणजे काय?
थायरॉईड ही फुलपाखराच्या आकारची ग्रंथी तुमच्या गळ्याच्या समोरच्या भागात असते ,जी चयापचय, ऊर्जा उत्पन्न करणे , आणि मूड ला नियंत्रित करण्याचे काम करते. थायरॉईड ग्रंथी मध्ये बिघाड झाल्यास वेगवेगळ्या सिस्टिम च्या कार्यात अडथळे येण्यास सुरवात होईल. थायरॉईड ग्रंथी च्या कामाशी संबंधित महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे एक तर कमीक्रियाशील किंवा अतिक्रियाशील होऊन थायरॉईड हार्मोन्स ची निर्मिती करणे.थायरॉईड ग्रंथीचा विकार हे सामान्यपणे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?
अतिक्रियाशील थायरॉईड ग्रंथी जास्तीचे थायरॉईड हार्मोन बनवते, या परिस्थितीला हायपरथायरॉडिझम म्हणतात. अतिक्रियाशील थायरॉईड चे लक्षणे खालील प्रमाणे आहे :
- वजन कमी होणे.
- चिंता, चिडचिड,आणि मूड वारंवार बदलणे.
- थायरॉईड वाढल्यामुळे (गॉईटर) मानेवर सूज येणे.
- अशक्तपणा.
- हृदयाची धडधड वाढणे.
- उष्णतेची संवेदनशीलता वाढणे.
याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय?
हायपरथायरॉडिझम चे मुख्य कारणे खालील प्रमाणे आहे :
- ग्रेव्हज डिझिज.
- थायरॉईड ग्रंथीवर गाठी येणे.
- आयोडीन चे सेवन जास्त करणे.
- पिट्युटरी ग्रंथीचा कॅन्सर नसलेला ट्युमर होणे.
- विषाणू संसर्गामुळे थायरॉईड ग्रंथीचा दाह होणे.
- थायरॉईड कॅन्सर.
याचे निदान आणि उपचार काय आहे ?
थायरॉईड च्या कोणत्याही प्रॉब्लेम चे निदान खालील प्रमाणे केले जाते:
- मानेची शारीरिक तपासणी करून.
- रक्ताची चाचणी: थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन (टीएसएच ), टी ३, आणि टी ४ च्या पातळीची चाचणी करणे.
- आयोडीन ची चाचणी.
- ग्रंथीवर आलेल्या गाठींची अल्ट्रासाउंड इमेजिंग करणे.
- ग्रंथीवर झालेली अनियंत्रित वाढीची बायोप्सी करणे.
थायरॉईडच्या प्रॉब्लेम चे उपचार हे त्या ग्रंथीच्या कामावर आणि ब्लड टेस्ट मध्ये आलेल्या हार्मोन च्या पातळीवर अवलंबून वेगवेगळे असतात. हायपरथायरॉडिझम साठी खालील उपचाराचे पर्याय दिले आहे.
- औषधे: रेडिओॲक्टिव्ह आयोडीन, थायरॉईड प्रतिबंधित औषधे,आणि दाहनाशक औषधे.
- थायरॉईड चा काही भाग किंवा पूर्ण ग्रंथी शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे.
हायपरथायरॉडिझम ची काळजी घेण्यासाठी नियमित तपासणी आणि पाठपुरावा करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन्स, प्रथिने, कॅल्शिअम, आयोडीन आणि मॅग्नेशिअम ने युक्त असलेला संतुलित आहार तुम्हाला थायरॉईड चे प्रॉब्लेम दूर ठेवण्यास मदत करु शकेल.