हाय लायपोप्रोटीन काय आहे ?
लायपोप्रोटीन हे असे दुवे आहे जे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल ला वाहून नेते. असे दोन प्रकारचे लायपोप्रोटीन आहे - कमी घनता ₹लायपोप्रोटीन (एलडीएल), याला खराब कोलेस्ट्रॉल सुद्धा म्हणतात, आणि जास्त घनता असलेले कोलेस्ट्रॉल (एचडीएल ), याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. एलडीएल च्या उच्च पातळीने हृदय रोग आणि स्ट्रोक होण्याचा धोका वाढवतो, तर एचडीएलच्या उच्च पातळीने हा धोका कमी करतो. लायपोप्रोटीन (एलपी) हे एलडीएल कोलेस्ट्रॉल सारखेच असते, आणि त्याची पातळी वाढणे म्हणजे हृदय रोग आणि स्ट्रोक होण्याचा संभावित धोका वाढतो. हे जास्तीचे कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होते, त्यामुळे त्या अरुंद आणि ब्लॉक होतात .
याच्या मुख्य खुणा आणि लक्षणं काय आहेत?
ज्या व्यक्तीमध्ये लायपोप्रोटीनची पातळी वाढलेली आहे ती व्यक्ती कोणतेही लक्षणे न दाखवता सामान्य जीवन जगू शकते. हे जास्तीचे लायपोप्रोटीन हृदयाला आणि मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होते. ह्या रक्त वाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे, ह्या अवयवांना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे हृदय रोग किंवा स्ट्रोक होऊ शकतो. बऱ्याच लोकांना लायपोप्रोटीनची वाढलेल्या पातळीची माहिती ह्या जीवघेण्या रोग झाल्यांनतर किंवा दैनंदिन वैद्यकीय तपासणीच्या वेळेस माहिती पडते .
याचे मुख्य कारणं काय आहेत?
वाढलेल्या लायपोप्रोटीन ची खालील कारणे आहे:
- जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या गोष्टीचा समावेश असलेला अयोग्य आहार घेणे.
- लठ्ठपणा.
- शारीरिक क्रिया न करणे.
- अनुवंशिकता.
- तणाव.
- उच्य रक्तदाब.
- धूम्रपान.
याचा निदान आणि उपचार काय आहे ?
खालील निदान दिले आहे:
- वैद्यकीय आणि कौटुंबिक इतिहास तपासणे.
- शारीरिक तपासणी.
- थायरॉईड हार्मोन ची पातळी तपासणी करण्यासाठी ब्लड टेस्ट करणे कारण जास्तीचे थायरॉईड हार्मोन सुद्धा कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढवते.
- त्वचेची बायप्सी करणे.
- ओटीपोटाचा अल्ट्रा साऊंड पॉलिसिस्टिक ओवरी सिन्ड्रोम, च्या तपासणीसाठी करणे यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल ची पातळी वाढते.
डॉक्टर वाढलेल्या कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील उपचार सांगू शकतात:
- सामान्य बीएमआय ची पातळी येण्याकरता नियमित व्यायाम करावा.
- धूम्रपान सोडावे.
- लायपोप्रोटीन अफेरेसिस, ज्यामध्ये लायपोप्रोटीन रक्तातून गाळून बाहेर काढले जाते.
- कोलेस्ट्रॉल च्या कमी सेवनासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे.
- तणावाचे व्यवस्थापन.
- कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे तुमच्या शरीराचा धोका लक्षात घेऊन घ्यावी.