सारांश
हर्पिस हे हर्पस सिम्प्लेक्स विषाणूमुळे होणारे असे संक्रमण आहे. यामागे कारणीभूत असे दोन प्रकारचे विषाणू म्हणजेच हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस- हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस 1 (एचएसव्ही 1) आणि हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस 2 (एचएसव्ही 2) आहेत. एचएसव्ही - 1 हे मौखिक आणि जननेंद्रियाच्या संक्रमणाचे, तर एचएसव्ही - 2 हे प्रामुख्याने स्त्री अथवा पुरुष जननांग यांमधील संक्रमणाचे कारण असते. हे विषाणू सामान्यतः शरीराच्या म्यूकस असलेल्या भागावर परिणाम करतो जसे तोंड, गुदा आणि जननांग क्षेत्र आणि शरीराच्या इतर भागांमधील त्वचा झाले. हर्पस दीर्घकालीन वैद्यकीय स्थिती आहे आणी या अवस्थेवर कोणताही नेमका उपचार नाही. हर्पस असलेल्या बर्र्याच लोकांना हे संक्रमण होत असले, तरीही काही लक्षणे दिसत नाहीत. इतर लोकांमध्ये फोड, अल्सर इ. सारख्या लक्षणे दिसतात आणि त्यांच्या मूत्रपिंडात वेदना अनुभवू शकतात किंवा जननेंद्रियातून काही पांढरी गळती आढळत असल्यास त्यांला जननेंद्रिय एचएसव्ही हे आजार असू शकते. हर्प्स या रोगावर कोणतेही नेमके उपचार नसले, तरीही काही उपलब्ध औषधे लक्षणे दूर करण्यात मदत करतात. सामान्यत: हर्प्स उपचारांना चांगला प्रतिसाद देतो आणि कोणत्याही प्रकारचे गुंतागुंत होत नाही. नागीण नवजात शिशूंमध्ये किंवा इतर लोकांमध्ये प्रतिकार शक्तीच्या प्रतिक्रियेमुळे असू शकते.