हार्ट फेल होणे म्हणजे काय?
हार्ट फेल होणे ही एक सामान्य स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाचे पंपिंग कार्य मोठ्या प्रमाणावर कमी होते त्यामुळे ते उर्वरित शरीराला पुरेसे रक्त देऊ शकत नाही. ही स्थिती बऱ्याच वर्षांपासून हृदय रोगाने ग्रस्त व्यक्तींमध्ये किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येते. ही एक वैद्यकीय तत्काळता असून ताबडतोब रुग्णालयात उपचार करणे आवश्यक आहे.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात:
- श्वास घेण्यात अडचण.
- डोकेदुखी, गोंधळ.
- चिंता.
- पल्स रेटमध्ये वाढ (टॅकीकार्डिया).
- कमी रक्तदाब (हायपोटेन्शन).
- असायटीस (ओटीपोटात द्रव तयार होणे)
- विशेषतः रात्रीत वारंवार लघवीला येणे
- पॅल्पिटेशन.
- छातीमध्ये वेदना ज्या उदर आणि शरीराच्या वरच्या इतर दिशेने येतात.
त्याचे कारण काय आहेत?
हार्ट फेलचे मुख्य कारण पुढीलप्रमाणे आहेतः
- हृदयरुग्णची कारणे ही आहेत:
- उच्च रक्तदाब.
- स्टेनोसिस (ऑर्टिक किंवा पल्मोनरी म्हणजे रक्तवाहिन्याची संकुचितता).
- इंटरअँट्रियल किंवा इंटरव्हेंट्रिक्यूलर सेप्टल डिफेक्ट (हृदयाच्या भिंतीमधील भोक) यासारख्या स्ट्रक्चरल डिफेक्ट.
- मायोकार्डियल इन्फ्रेक्शन (हृदयाच्या स्नायूचे नुकसान).
- संसर्गजन्य एंडोकार्डिटिस.
- इतर कारणे समाविष्ट आहेत:
- संसर्ग.
- फुफ्फुसांच्या संवाद (फुफ्फुसात रक्तरंजित गाठ होणे).
- बीटा-ब्लॉकर्स, नॉन-स्टेरॉयडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स इ. सारख्या औषधांची अति प्रमाणात सेवन.
- शारीरिक आणि भावनिक ताण
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
लक्षणे समजण्यासाठी, रक्तदाब तपासून आणि हृदयाच्या ठोक्याचा तपासणी करून डॉक्टर रुग्णाची सविस्तर माहीती घेतील.
प्रयोगशाळा चाचण्या तसेच शारीरिक तपासणी या दोन्ही तपासणी करून डॉक्टरांद्वारे निदान केले जाते. निदान करण्यासाठी लॅब टेस्ट केली जाते:
- यूरिया.
- इलेक्ट्रोलाइट्स.
- कम्प्लीट ब्लड काउन्ट.
- बीएनपी (ब्रेन नॅचर्यूरेटिक पेप्टाइड).
- यकृतचे कार्य.
- किडनीचे कार्य.
इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी), छाती एक्स-रे आणि इकोकार्डियोग्राफीसारखे इमेजिंग तपासण्या देखील केले जातात.
हार्ट फेलच्या रुग्णाचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे केले जाऊ शकते:
- शारीरिक आणि भावनिक विश्रांती.
- वजन कमी करणे.
- ऑक्सिजन थेरपी प्रदान करून श्वासोच्छवासाचा उपचार करणे.
- आहार सल्लागार.
- दारू आणि धूम्रपान बंदी.
- नियमित शारीरिक व्यायाम.
औषधोपचारात खालील औषधांचा समावेश असतो:
- डायरेक्टिक्स.
- वासोडायलेटर्स.
- एसीई इनहिबिटर्स.
- एआरबी.
- β-ब्लॉकर्स.
- स्टेटिन्स.