बहिरेपणा म्हणजे काय?
बहिरेपणा म्हणजे एक किंवा दोन्ही कानांवर परिणाम होऊन आवाज ऐकण्याची क्षमता कमी होणे. ऐकण्याच्या अक्षमतेवर आधारीत, बहिरेपणा सौम्य, मध्यम आणि गंभीर पणा मध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो. ऐकण्याची क्षमता फारच कमी म्हणजे बहिरेपणा. कारणास्तव ही स्थिती स्थायी किंवा तात्पुरती असू शकते.
डब्ल्यूएचओच्या नुसार, सन 2050 पर्यंत, ऐकण्याची अक्षमता जगभरात 90 दशलक्षांहून अधिक लोकांना असण्याची शक्यता आहे.बहिरेपणाचे उच्च प्रमाण भारतामध्ये आहे.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ऐकू न येणे किंवा बहिरेपणा हेच एक लक्षण आहे. बहिरेपणा दर्शवणारे काही चिन्हे खालील प्रमाणे आहेत:
- एक गोंगाटाच्या ठिकाणी असताना ऐकण्यात संघर्ष करणे.
- संभाषणादरम्यान खराब प्रतिसाद.
- उच्च आवाजात संगीत ऐकणे किंवा टीव्ही पाहणे.
- पुन्हा एकच गोष्ट इतरांना विचारणे.
त्याचे मुख्य कारण काय आहेत?
वाढत्या वयानुसार वृद्ध व्यक्तींमध्ये सामान्यपणे ऐकू न येण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पेशींचे अपुरेपणा होतात. 40 वर्षांनंतर ऐकण्यात अडचण होऊ शकते.
मुलांमध्ये ऐकण्याची अक्षमता वेगवेगळ्या घटकांमुळे होऊ शकते जसे की:
- आनुवांशिकता.
- गर्भधारणा दरम्यान संक्रमण.
- गर्भधारणेदरम्यान घेतलेली काही औषधे.
- जन्माच्या 1 महिन्याच्याआत कावीळ होणे.
- जन्मताच कमी वजन.
- जन्माच्यावेळी ऑक्सिजनची कमतरता.
ऐकण्याच्या क्षमतेवर प्रभावित करणाऱ्या इतर कारणांमधे पुढील गोष्टींचा समाविष्ट आहे:
- मेनिंजायटीस, मिझल्स, मम्प्स सारखे रोग.
- कानचा संक्रमण.
- औषधे
- डोके किंवा कानात दुखापत
- कानातला मळ्
- कामाच्या ठिकाणी किंवा मनोरंजन ठिकाणी (मैफिली, नाइटक्लब, पार्टी) ध्वनीचा एक्सपोजर होणे आणि अतिशय मोठ्या आवाज करून हेडफोन किंवा इयरफोन वापरणे
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
तुम्हाला जर ऐकण्यात समस्या होत असल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांचा (ऑडिओलॉजिस्ट) सल्ला घ्या. तुमचा डॉक्टर तुम्हाला ऐकण्याच्या समस्याचे कारण शोधून त्यावर व्यवस्थापन योजनेचे अंतिम स्वरूप देईल.जर एअरवॉक्स (कानातला मळ ) हे कारण असल्याचे आढळल्यास, इयरवॅक्स काढून टाकून ,ऐकण्याचा सक्षमता सुधारण्यात मदत करेल.
जर आवश्यक असेल तर ऐकण्याचे साधन किंवा इम्प्लांट्स वापरण्याचे डॉक्टर सुचवू शकतात. जर बहिरेपणा वर उपचार केला जाऊ शकत नसेल तर,
ओठांच्या हालचाली चे वाचन आणि सांकेतिक भाषा शिकून आपण इतरांशी आपले संवाद सुधारू शकतो.
मुलांमध्ये ऐकू न येण्याची समस्या याद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकते:
- मिझल्स, मम्प्स च्या लस देणे.
- ओटायटीस मीडियासारख्या संक्रमणांची स्क्रीनिंग करणे.
- जोरदार आवाज / संगीत ऐकू नये.
- मुलांनी त्यांच्या कानात वस्तू घालू नये याची काळजी घेतली पाहिजे.
जास्त गोंगाट असलेल्या कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रौढांनी कान संरक्षण वापरणे आवश्यक आहे.