गरोदरपणात डोकेदुखी म्हणजे काय?
गरोदरपणात डोकेदुखी चा त्रास बरेचदा होत असतो आणि दिवसाच्या कोणत्याही वेळेत होऊ शकतो. तरीही, गर्भावस्थेच्या पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत डोके दुखणे खूप कॉमन आहे. डोकेदुखी शिवाय इतर लक्षणे दिसत नसतील तर हे धोकादायक नाही आहे.
मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?
गरोदरपणात डोकेदुखी झाल्यावर खूप कंटाळवाणे वाटते आणि डोक्याच्या मागे, किंवा डोळ्यांच्या मागे धडधड वाढून वेदना होतात.
मायग्रेन मूळे होणाऱ्या डोकेदूखीत तीव्र वेदना होतात आणि बरेचदा त्या मानेपर्यंत वाढत जातात.
तुम्हाला जर खालील लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा जर:
- डोकेदुखीसोबत ताप आणि उलट्या होत असेल तर.
- जर डोकेदूखी काही तासात कमी झाली नाही किंवा त्रास जास्त वाढला असेल तर.
- डोकेदुखी मूळे अंधुक दृष्टी होऊन अधिक गोंधळ वाढला असेल तर.
- नाक किंवा डोळ्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर. (अधिक वाचा: नाकातून रक्तस्त्राव चे कारणं)
मूख्य कारण काय आहे?
गर्भावस्थेत हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे डोकेदूखी वाढू शकते.
गर्भावस्थेच्या सुरवातीला ही गोष्ट सामान्य आहे कारण, या काळात, प्रोजेस्टेरॉन गर्भाशयातील स्नायूंना आणि डोक्यातील रक्तवाहिनीला शिथिल करतो. यामुळे रक्तवाहिनीचा दाब वाढून सतत डोकेदुखी होऊ शकते .
इतर ही काही घटक आहे जे डोकेदुखीसाठी कारणीभूत आहेत आणि, ते ट्रिगर सारखे काम करते:
गर्भावस्थेत तीव्र स्वरूपाची डोकेदूखी म्हणजे मायग्रेन होऊ शकते. तर, काही महिलांमध्ये ज्यांना गर्भधारणेपूर्वी तीव्र डोकेदुखी चा त्रास होता, तो कमी होऊ शकतो. कधी कधी डोकेदुखी दुर्मिळ पण गंभीर कारणामुळे होऊ शकते जसे मेंदूतील धमन्या फुटणे, किंवा उच्य रक्तदाब .
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
सामान्यतः डोकेदुखीचे निदान त्याच्या साध्या लक्षणांच्या सांगण्यावरून केले जाते. जर, डोकेदुखीसोबत इतरही लक्षणे दिसत असतील आणि प्रदीर्घ कालावधीनंतर देखील ही कमी झाली नसतील, तर डॉक्टर आणखी निदानासाठी इतर टेस्ट जसे सिटी स्कॅन, एमआरआय, किंवा सिटी अँजिओग्राफी सांगू शकतात. यामुळे डोकेदुखीचे कारण कळायला मदत होईल.
गरोदरपणात होणारी डोकेदुखी काही घरगूती उपायांनी कमी होऊ शकते,जसे
- वॉर्म कॉम्प्रेस म्हणजे गरम शेक घेणे.
- कोल्ड कॉम्प्रेस म्हणजे बर्फाने शेकणे.
- मालिश.
- आराम.
- अरोमाथेरपी.
डोकेदुखी टाळण्यासाठी, डॉक्टर सकस आहार घ्यायला सांगू शकतात आणि नियमित शारीरिक व्यायाम, जसे योगा आणि इतर व्यायाम (तज्ञांच्या देखरेखीखाली) करायला सांगू शकतात .
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टर गर्भावस्थेदरम्यान घेण्यात येणाऱ्या सुरक्षित पेनकिलर्स किंवा रक्तदाब कमी करायचे औषधे घेण्याचा सल्ला देऊ शकतात.