गाऊट म्हणजे काय?
काही लोंकाच्या रक्तात यूरिक ॲसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे वेदनाकारक संधिवात होतो त्यालाच गाऊट म्हणतात . याची लक्षणे म्हणजे वारंवार हाडाच्या सांध्यामध्ये वेदना, सुज, लालसरपणा जे अचानक आणि रात्रीतून वाढते. हाडांच्या सांध्यामध्ये यूरिक ॲसिड जमा झाल्यामुळे, सूई सारखे खडे बनतात त्यामुळे अचानक वेदना होतात.
त्याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
साधारणतः याचा परिणाम पायाच्या अंगठ्याच्या सांध्यावर होतो. गाऊटचे काही लक्षणे आणि चिन्हे खालीलप्रमाणे आहेत:
- सांध्याला ( विशेषतः गुडघा, पायाची बोटं, हाताचा ढोपर आणि बोटं) यात तीव्र आणि अचानक वेदना होतात.
- प्रभावित जागेची त्वचा लाल, गरम होऊन सूजते.
- ताप आणि थंडी.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
गाऊट होण्याचे मुख्य कारणं हे आहेत:
- रक्तामध्ये यूरिक ॲसिड च्या जमा होण्याने सांध्यामध्ये युरेट चे खडे बनतात.
- अनुवांशिक आणि पर्यावरणाच्या घटक यांच्या एकत्रीकरणाने.
- जेवणात प्युरीन युक्त पदार्थ समावेश केल्याने.
- लठ्ठपणा.
- अतिप्रमाणात मद्यपान.
- स्युडोगाऊट (किंवा तीव्र कॅल्शियम प्यरोफॉस्फेट संधिवात).
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
रोगाच्या लक्षणांचा पूर्ण अभ्यास केला जाऊन, डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी केली जाऊ शकते.
निदान करायला सोपी जाण्यासाठी काही ब्लड टेस्ट केल्या जाऊ शकतात:
- सीरम यूरिक ॲसिड ची पातळी निर्धारित करण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाऊ शकते.
- एक्स-रे.
- सांध्यांच्या जोडामधल्या फ्लुइड/द्रवामध्ये सुरवातीला क्रिस्टल बनले का हे शोधण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन केले जाते.
- हाडं आणि सॉफ्ट टिश्यू तपासणीसाठी संगणित टोमोग्राफी (सीटी) किंवा चुंबकीय अनुनाद इमेजिंग ((एमआरआय)) केला जातो.
गाऊट चा उपचार खालीलप्रमाणे केला जाऊ शकतो:
- वेदनेमुळे होणाऱ्या दुखण्याचे व्यवस्थापन करणे
- स्टिरॉइड्स नसलेले अँटी - इंफ्लामेट्री औषधे((एनएसएआयडीएस) जशी आयब्रुफेन, स्टिरॉइड्स ,अँटी इंफ्लामेंट्री औषध कॉलचीसीन वेदनेवर उपचारासाठी वापरले जातात.
- स्टिरॉइड्स नसलेले अँटी - इंफ्लामेट्री औषधे((एनएसएआयडीएस) जशी आयब्रुफेन, स्टिरॉइड्स ,अँटी इंफ्लामेंट्री औषध कॉलचीसीन वेदनेवर उपचारासाठी वापरले जातात.
- भविष्यात फ्लेअर्स होऊ नये म्हणून
- आहार आणि जीवनशैली बदलणे.
- अतिरिक्त वजन कमी करणे.
- मद्याचा वापर टाळावा.
- प्युरीन युक्त आहार टाळावा( रेड मीट किंवा ऑर्गन मीट).
- हायपरयुरिसेमिया च्या संबंधित औषधे बदलणे किंवा बंद करणे (उदा.ड्युरेटीक्स).
- यूरिक ॲसिड कमी करणाऱ्या गोष्टींचा वापर करा
- ऑलोपुरिनोल.
- फेबुओस्टेट.
- पेग्लोटेस.
- स्व-व्यवस्थापन धोरणे
- निरोगी आहार घ्या.
- पूरेसा शारीरिक व्यायाम करा.