जीईआरडी म्हणजे काय?
जीईआरडी, ज्याला अन्न नालिकेतील आम्ल उलटण्याचा आजार असे म्हणले जाते, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये अन्न नलिकेच्या (इसोफॅगस) शेवटी असणारा वर्तुळाकार स्नायू नीट बंद होत नाही त्यामुळे पोटातले घटक पुन्हा अन्न नलिकेत वर जातात ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होते. हे हृदयातील जळजळी सारखे असते. त्यात जर एखाद्याला आठवड्यातून दोनदा ह्रदयात जळजळ होत असल्यास त्याला जीईआरडी म्हणतात.
याची प्रमुख लक्षणे व चिन्हे काय आहेत?
जीईआरडी चे प्रमुख लक्षण म्हणजे आठवड्यातून दोनदा ह्रदयात जळजळ होणे होय.
इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- छातीच्या मध्यभागी जळजळ होणे.
- उचक्या लागणे.
- घशामध्ये जळजळ होणे.
- गिळताना त्रास होणे.
- श्वासाची दुर्गंधी.
- सदैव पोट भरल्याचे वाटणे.
- खाल्ल्यानंतर अस्वस्थता वाटणे.
- आंबट तोंड.
- खाल्ल्यानंतर छातीत दुखणे.
- पोटातील आम्ल तोंडामध्ये येऊन वाईट चव येणे.
याची प्रमुख कारणं कोणती आहेत?
जेव्हा पोटाच्या शेवटी असणारा स्नायू दुर्बल होऊन तो पोटातील घटक घशापर्यंत जाण्यापासून अडवू शकत नाही तेव्हा जीईआरडी संभवतो. हे खालील कारणांमुळे होऊ शकते:
- लठ्ठपणा.
- कॉफी व दारू सारख्या पदार्थांचे अती सेवन.
- गर्भधारणा.
- चरबीयुक्त पदार्थांनी युक्त आहार.
- तणावाचा अनुभव.
- हर्निया ( पोटाच्या वरील भाग छातीकडे सरकू लागतो).
- धूम्रपान.
- पेन किलरच्या गोळ्यांचे सेवन.
- मसालेदार पदार्थ खाणे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
यातील पहिली पायरी म्हणजे लक्षणांबद्दल चौकशी केली जाते. जीईआरडी चे पक्के निदान होण्यासाठी बऱ्याच चाचण्या केल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे:
- एंडोस्कॉपी( अन्न नलिकेतील धोके शोधण्यासाठी).
- मॅनोमेट्री( अन्न नलिकेतील स्नायू चे काम तपासण्यासाठी).
हृदयातील जळजळ थांबवण्यासाठी डॉक्टर काही उपचार सांगू शकतात. ते याप्रकारे असू शकतात:-
- जळजळ होणारे अन्न पदार्थ टाळणे.
- वजन कमी करणे.
- अशा भागात झोपा ज्यामुळे शरीराच्या वरचा भाग वर राहील.
- कमी खा.
- मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.
- धूम्रपान, कॉफी व दारू वर्ज्य करा.
बऱ्याच वेळेस हृदयातील जळजळ थांबवण्यासाठी औषधे देखील दिली जातात.
काही वेळेस गंभीर प्रकरणात स्नायू पक्का होण्यासाठी शस्त्रक्रियेचा उपाय सुचवला जातो.