सामान्य अॅनेस्थिशिया म्हणजे काय?
सामान्य अॅनेस्थिशिया चा वापर नियंत्रित बेशुद्ध स्थिती तयार करण्यासाठी केला जातो, जे शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये गरजेचे असते (ज्यामुळे माणूस हलू शकत नाही किंवा त्याला वेदना होत नाहीत.) जी औषधे सामान्य अॅनेस्थेटिक्स म्हणून ओळखली जातात ती तुम्हाला झोपवण्यासाठी वापरली जातात किंवा तुम्हाला आरामदायक वाटण्यासाठी किंवा शस्त्रक्रियेदरम्यान सुरक्षित वाटावे म्हणून वापरली जातात.
असे का केले जाते?
असे केले जाते कारण:-
- जर शस्त्रक्रिया बराच काळ चालली किंवा खूप वेदनादायक असेल तर.
- तुमच्या अस्वस्थतेची दक्षता घेऊन तुम्हाला आरामदायक वाटावे म्हणून.
- ज्या शस्त्रक्रियेदरम्यान श्वसनाचे विकार होऊ शकतात तेथे मदत करण्यासाठी.
याची गरज कोणाला असते?
खालील बाबतीत सामान्य अॅनेस्थिशियाची गरज भासते:
- शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये दीर्घ काळ आरामाची गरज असते.
- शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक किंवा तत्सम अॅनेस्थिशिया पुरेसा नसतो.
- बऱ्याच प्रमाणात रक्त कमी होण्याची शक्यता असेल तेव्हा.
- जेव्हा श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते तेव्हा.
- सहकार्य न करणाऱ्या रुग्णांना छोट्या प्रक्रियेसाठी देखील सामान्य अॅनेस्थिशियाची गरज भासते.
कशा प्रकारे केले जाते?
हे खालीलप्रमाणे केले जाते:-
- शस्त्रक्रियेच्या आधी एक तज्ञ ज्याला अॅनेस्थेतिस्ट म्हणले जाते, जो वैद्यकीय इतिहास जसे की अॅलर्जी, धूम्रपान, मद्यपान आणि रोज घेण्यात येणारी औषधं जाणून घेतो. अन्न व पाणी योग्य प्रमाणात घेण्याच्या सूचना या वेळेस दिल्या जातात.
- जे अॅनेस्थेटिक औषध दिले जाते ते खालीलप्रमाणे असू शकते:
- पेय: हे रक्तपेशिंमधे कॅनुला (एक छोटी प्लास्टिक ट्यूब) वाटे सोडले जाते.
- गॅस: ज्याचे मास्क वाटे श्वसन केले जाते.
- पेशींमधील सर्व सिग्नल अॅनेस्थॆटिक्स मुळे थांबवले जातात, त्यामुळेच वेदनांचे सिग्नल मेंदू पर्यंत पोचू शकत नाहीत.
- अॅनेस्थॆटिक्स चा परिणाम सुरू झाल्यानंतर पूर्णतः बेशुध्द होण्याआधी मिनिटभर रुग्णाला डोक्यामध्ये हलके वाटू लागते. हीच भावना पूर्ण प्रक्रियेत राहते. शस्त्रक्रियेनंतर च्या वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर ची औषधे दिली जातात.
- पूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे (पल्स, श्वसन, रक्तदाब) मोजले जातात.