पोटातील संसर्ग म्हणजे काय?
पोटातील संसर्ग प्रामुख्याने बॅक्टेरिया व व्हायरस मुळे होतात ज्यामुळे पचनसंस्थेत मुख्यतः पोटात व आतड्यांमध्ये जळजळ होते ( गॅस्ट्रोएन्टीरायटिस).
याची प्रमुख लक्षणे व चिन्हे काय आहेत?
- पोटातील संसर्ग बॅक्टरिया व व्हायरस मुळे होण्याची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- ताप.
- वजन कमी होणे.
- भूक कमी होणे.
- उलट्या.
- मळमळ.
- पोटात कळ येऊन दुखणे.
- रक्त युक्त विष्ठा व अतिसार.
- पोटातील संसर्ग तीव्र असेल तर चिन्हे व लक्षणे पुढीलप्रमाणे असतात :
- थंडी व घाम.
- कोरडी त्वचा.
- घट्ट सांधे किंवा स्नायू दुखी.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
अशुद्ध अन्न व पाणी ज्यात व्हायरस ( रोटाव्हायरस, नोरवॉक, व्हायरस इ.) किंवा पॅथोजेनिक बॅक्टरिया असते त्यांचे सेवन केल्यामुळे पोटदुखी होते. इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:-
- अशुद्ध अन्न व पाण्याशी संपर्क.
- अशुद्ध वस्तू, जसे ताटल्या व भांड्याशी संपर्क.
- आजारी माणसाने वापरलेली भांडी वापरल्याने.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
- डॉक्टरांकडून मुख्यतः संसर्गाची लक्षणे व निर्जलीकरणाच्या लक्षणांवरून निदान केले जाते. ते खालीलप्रमाणे आहेत:
- कोरडे व चिकट तोंड.
- कमी रक्तदाब.
- कमी/न/कॉन्सन्ट्रेटेड मूत्र (गडद पिवळे).
- आत गेलेले डोळे व फोंटनेल्स ( बाळाच्या डोक्यावर असलेला छोटा डाग).
- अश्रू न येणे.
- सुस्तपणा किंवा कोमा ( पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे) इ.
- डॉक्टर पूर्ण रक्त तपासणी करायला सांगू शकतात, ज्यात पांढर्या रक्त पेशी मोजल्या जातात. याचे प्रमाण वाढल्याने संसर्ग होऊ शकतो.
- शौचेची नियमित चाचणी किंवा सःटूल कल्चरचा सुध्दा सल्ला दिला जातो( बॅक्टेरीयाचा संसर्ग झाल्यावर).
पोटाच्या संसर्गाच्यख उपचारासाठी पुढील गोष्टी केल्या जातात:-
- जुलाबाचे नियमन:
- जेव्हा मळमळ व उलट्यांसोबत अतिसार होतो व पाणी शरीरात टिकत नाही तर ते शिरांद्वारे शरीरात दिले जाते.
- जे रुग्ण अती रक्त दाबाची औषधे घेत असतात जसे की डाययुरेटिक्स किंवा अंजॉटेंसिन, जेव्हा त्यांना पोटाचा संसर्ग होतो तेव्हा त्यांना त्यांच्या डॉक्टर कडून तात्पूरती ही औषधे थांबवायला सांगू शकतात आणि बरे वाटल्यानंतर परत चालू करायला सांगितले जाते.
- निर्जलीकरणाचे नियमन:
- निर्जलीकरणाचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स चा वापर व पाणी युक्त वस्तूंमध्ये बदल किंवा फ्रिझर पॉपस वापरायचा सल्ला दिला जातो.
- कोला, सोडा व फळांचे रस टाळावे.
- जास्त पाणी जबरदस्तीने पिण्यापेक्षा कमी पाणी प्यावे.
- बाळांमधल्या पोटाच्या संसर्गामध्ये त्यांचे डायपर पाण्याचे प्रमाण कमी न होण्यासाठी तपासा.( कमी मूत्र व कमी ओले डायपर.
- मळमळ व उलट्यांचे नियमन: जास्त जेवण टाळा व कमी प्रमाणात नियमित अन्न खायचा प्रयत्न करा, जसे की दही, केळी, ताजे सफरचंद, उकडलेल्या भाज्या, डाळी, उकडलेले किंवा कुस्करलेले बटाटे, लीन मीट, ब्रेड.
- खूप विश्रांती घ्यावी
- अँटिबायोटिक्स फक्त बॅक्टरीया ने ग्रस्त रुग्णांसाठी असतात व ते जेव्हा अतिसार होत असेल व पचनसंस्था कमकुवत असेल तेव्हा दिले जातात. अँटिबायोटिक्सचा व्हायरल संसर्गावर परिणाम होत नाहीत.
- अँटीपायरेटिक औषधे ताप कमी करण्यासाठी वापरली जातात.
- अतिसार कमी करण्यासाठी ची औषधे डॉक्टर च्या सल्ल्याने घ्यावी.