सारांश
जठरदाह हे सर्वात सामान्य चयापचयन तंत्राच्या विकारांपैकी एक असे आहे. पोटाच्या आतील भागाच्या रेषेवरील सूज आणि जळजळीमुळे हा दाह होतो.यात पोटाला सूज येते, वेदना होतात, पोटाच्या वरच्या भागात जळजळ होते, सोबतच हृदयात होणारी जळजळ, ढेकर, खाल्लेल्या अन्नाचे विरुद्ध दिशेने प्रवाहित होणे,मळमळ आणि कधीकधी उलट्यामुळे होणारा त्रासही होऊ शकतो. दीर्घकालीन वेदनाशामक वापर (एनसेड्स), जीवाणूजन्य संसर्ग, धूम्रपान, दारू आणि काही स्वयंप्रतीकार अवस्थेमुळे जठरदाह होऊ शकतो. कधीकधी तो अनेक वर्षांपर्यंत टिकून राहतो.याचे निदान एंडोस्कोपी याद्वारे केले जाते. उपचार पर्यायांमध्ये अँटीऍसीड्स, सूक्ष्मजीवरोधक उपचार आणि आहारातील बदल यांचा समावेश आहे.