मनगटाचा अस्थिभंग - Fractured Wrist in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

मनगटाचा अस्थिभंग
मनगटाचा अस्थिभंग

मनगटाचा अस्थिभंग म्हणजे काय?

मनगट हे 8 लहान हाडांनी बनलेले असते जे आपले जॉइंट तयार करण्यासाठी फोरआर्मच्या दोन लांब हाडांसह जोडलेले असते. या कोणत्याही हाडांमध्ये ब्रेक झाल्यास मनगटाचा अस्थिभंग होतो. त्याच्या तीव्रतेनुसार आणि दुखापतीच्या कारणांनुसार फ्रॅक्चर त्रासदायक असू शकते.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • फ्रॅक्चर झालेल्या मनगटाची चिन्हे फ्रॅक्चरच्या सामान्य चिन्हांसारखीच आहेत.
  • जर तुम्हाला वेदना होत असतील, तर तुम्ही मनगट किंचित हलविण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याचे वाईट परिणाम होतील.  
  • सूजच्या भागावर वेदना देखील होऊ शकतात आणि मुकामारा सह असू शकते.
  • जर फ्रॅक्चरमुळे अंतर्निहित ऊतींना बाधा झालो असल्यास, संसर्ग होण्याची शक्यता असते.
  • हाड मोडल्यावर काही प्रकरणांमध्ये मनगट किंवा अंगठा देखील विकृत दिसतो.
  • वेदनाव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीस येणाऱ्या झिणझिण्या अस्वस्थ करतात.
  • संवेदना होतात किंवा हात सुन्न पडतात.  
  • जर हाड त्याच्या जागेतून निखळून आला असेल तर त्याला विस्थापित/डिस्प्लेड  फ्रॅक्चर म्हणतात.

मुख्य कारण काय आहेत?

  • मनगटाचा अस्थिभंग चे बहुतेकदा कारण हे खाली पडण्यामुळे असते. जेव्हा एखादी व्यक्ती जर मनगटावर आघात करते किंवा शरीराचे वजन मनगटावर येते, तेव्हा हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात.
  • मनगटीला एखाद्या जाड वस्तूचा मारा बसल्यास किंवा जाड वस्तू मनगटीवर पडल्यास, फ्रॅक्चर होऊ शकते.
  • क्रीडा मधील काही वैशिष्ट्ये हालचालीमुळे  देखील मनगटाची हाडे मोडू शकतात.

   याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

  • शारीरिक तपासणीमुळे सूज आणि मुकामार दिसून येतो. डॉक्टर मनगटाचा एक्स-रे काढतील.

    जर हाड अनेक तुकड्यांमध्ये फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले, तर सीटी स्कॅन किंवा एमआरआय आवश्यक आहे. फ्रॅक्चरचा उपचार मोडलेल्या हाडांवर अवलंबून असतो, तीव्रता आणि तो विस्थापित/ डिस्प्लेड किंवा नॉन-डिस्प्लेड फ्रॅक्चर असतो.
     
  • डॉक्टर काही वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे देतील आणि संसर्ग झाल्यास अँटीबायोटिक्स देतील.
  • एक स्प्लिंट किंवा कास्ट अस्थी एखाद्या ठिकाणी धरून ठेवते आणि त्यांना स्थिर करते. हे नॉन-डिस्प्लेड फ्रॅक्चरसाठी प्रभावी आहे.
  • कधीकधी, मूळ ठिकाणी हाडे स्थिर ठेवण्यासाठी प्लेट्स आणि स्क्रूची आवश्यकता असते. विस्थापित झालेल्या फ्रॅक्चरच्या उपचारासाठी ही एक शस्त्रक्रिया आहे.
  • डॉक्टरांच्या दिलेल्या सल्लाप्रमाणे मनगटाचा व्यायाम आणि फिजियोथेरपी देखील मदत करू शकते.
  • बहुतेक फ्रॅक्चर, सुमारे आठ आठवड्यात कोणत्याही मोठ्या गुंतागुंतशिवाय बरे होतात. परंतु, संपूर्ण पुनर्प्राप्तीस काही महिने लागू शकतात.



संदर्भ

  1. Obert L et al. High-energy injuries of the wrist.. Orthop Traumatol Surg Res. 2016 Feb;102(1 Suppl):S81-93. PMID: 26782706
  2. Hanel, Jones, Trumble. Wrist fractures.. Orthop Clin North Am. 2002 Jan;33(1):35-57, vii. PMID: 11832312
  3. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Bone fractures
  4. Hsu H, Nallamothu SV. Wrist Fracture. Wrist Fracture. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Colles wrist fracture - aftercare