जबड्याचे फ्रॅक्चर म्हणजे काय?
फ्रॅक्चर म्हणजे हाड तुटणे किंवा हाडाला छेद जाणे. जेव्हा जबड्याचे हाड तुटते, तेव्हा त्याला जबड्याचे फ्रॅक्चर असे म्हणतात. जबड्याचे फ्रॅक्चर हे चेहऱ्याच्या फ्रॅकचर मध्ये नाक आणि गालाच्या हाडाच्या फ्रॅक्चर नंतर होणारे तिसऱ्या क्रमांकाचे कॉमन फ्रॅक्चर आहे.
वैद्यकीय भाषेत जबड्याच्या हाडाला मॅंडिबल म्हणतात. या हाडाच्या शेवटी जे उंचवटे असतात ते कानाच्या समोर टेम्पोरोमँडीबुलर जॉईंट चा भाग बनवतात. टेम्पोरोमँडीबुलर जॉईंट मध्ये तुटलेला जबड्याची जागा बदलते.
याचे मुख्य खुणा आणि लक्षणे काय आहे?
तुटलेल्या जबड्याची लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- चेहऱ्यावर किंवा जबड्यात वेदना होणे जे हालचाल केल्यावर आणखी वाढते.
- अन्न चावायला त्रास होणे.
- तोंड उघडायला किंवा बंद करायला त्रास होणे.
- जेव्हा तोंड उघडतो तेव्हा जबडा एका बाजूला झुकतो.
- दाताला क्षती पोहोचते.
- खालच्या ओठाला बधिरता येते.
याचे मुख्य कारण काय आहे?
जबड्याचे फ्रॅक्चर कोणत्या प्रकारचा आघात झाला आहे यावर आधारित असून याचे बरेच प्रकारे होऊ शकतात.
हे खालील मार्गाने होऊ शकते:
- लहान मुलांमध्ये दिसते तसे, अपघाताने हनुवटीवर पडणे.
- मोटरसायकल किंवा दुचाकी वाहनावरून खाली पडणे.
- जबड्याला मार लागणे.
- खेळतांना पडणे.
- औद्योगिक अपघात.
याचे निदान आणि उपचार कसे करतात ?
डॉक्टर शारीरिक तपासणी करून जबड्याच्या हालचालीचे निरीक्षण करतात आणि चेहऱ्याला काही खरचटले, विद्रुपता, सुज किंवा लालसर झालेले आहे का याची पाहणी करतात. बाहेरून तपासणी झाल्यावर, डॉक्टर तोंडाच्या आत दात तुटले आहे का, त्यांची मांडणी बदली आहे का किंवा फ्रॅक्चर झाले आहे का याची तपासणी करतात. पॅनोरॅमिक एक्स- रे हा अस्थिभंगाची जागा आणि तीव्रता पाहण्यासाठी काढला जातो.
वेदना कमी करण्यासाठी औषधे दिले जातात, आणि सौम्य आहार घेण्याची सूचना दिली जाते. स्थिर फ्रॅक्चर साठी खालच्या आणि वरच्या दाताला वायर ने जोडून ठेवले जाते. ही वायर 6 ते 8 आठवड्यांसाठी ठेवली जाते. अस्थिर फ्रॅक्चर साठी ओपन रिडक्शन पद्धतीची गरज असते जिथे तुटलेल्या भागाला टिटॅनियम च्या प्लेट ने आणि स्क्रू ने जोडून ठेवले जाते. तुटलेल्या जबड्याची जागा स्वतःच्या हाताने बरोबर न करण्याचा महत्वाचा सल्ला दिला जातो. शास्त्रक्रियेनंतर होणारी वेदना आणि सुज कमी होण्यासाठी दाहनाशक औषधे दिली जातात.