पायाचे हाड मोडणे - Fractured Foot in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

April 25, 2019

July 31, 2020

पायाचे हाड मोडणे
पायाचे हाड मोडणे

पायाचे हाड मोडणे म्हणजे काय?

पायाचे हाड मोडणे हे सगळ्यात सामान्यपणे होणारे फ्रॅक्चर आहे. पायामध्ये 26 हाडे असतात, जे थेट मार लागून किंवा अपघाताने फ्रॅक्चर होऊ शकतात. पायाची हाडे पाय चुकीचा टाकला गेल्याने किंवा पडल्याने फ्रॅक्चर होऊ शकतात ज्याकडे गंभीरपणे पाहिलं जात नाही. बऱ्याचदा अंगठयामधील हाडे फ्रॅक्चर होतात, त्याचबरोबर मेटाटरसल फ्रॅक्चर (अंगठ्यामधील असणारी 5 हाडे आणि त्यांना जोडणारा भाग व पायाच्या मधल्या भागातील हाडे). सर्वात सामान्यपणे दिसणारी मेटाटरसल फ्रॅक्चर्स पाचव्या मेटाटरसल हाडात दिसतात, जे करांगळीला जोडलेले असते.

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

पायाचे हाड मोडणे ची सर्वसामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • दुखणे.
  • फ्रॅक्चर च्या ठिकाणी सूज येणे.
  • फ्रॅक्चर झालेला पाय हलवायला त्रास होणे.

इतर लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • पायामध्ये रक्त साकळणे व रंग बदल होणे जे पायाचे हाड मोडल्यावर इतर भागातही दिसून येते.
  • चालताना दुखणे किंवा वजन उचलताना त्रास होणे.
  • शारीरिक हालचालींमुळे दुखण्यामध्ये वाढ होणे तसेच आराम केल्यावर ते दुखणे कमी होणे.
  • स्पर्श झाल्यास वेदना होणे.
  • आकार बदलणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

पायाचे हाड मोडण्या ची सामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

थेट ट्रॉमा किंवा दुखापत: वाहन अपघातात हाडांचा चुरा होणे, घसरणे किंवा पडणे यात दुखापत कायम राहते, उंचीवरून उडी मारून पायांवर उभे राहणे, अवजड वस्तू पायावर पडणे यामुळे पाय फ्रॅक्चर होऊ शकतो.

इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • सततच्या ट्रॉमा किंवा अतिवापरामुळे स्ट्रेस फ्रॅक्चर.
  • पाय हलका टाकल्याने फ्रॅक्चर.
  • चालताना पायाचे बोट फर्निचर किंवा अवजड वस्तूला लागल्याने ट्रॉमा राहणे.
  • पाय मुरगळल्यामुळे देखील फ्रॅक्चर होऊ शकतो.

याचे निदान व उपचार कसे केले जाते?

पायाची हाडे व सांधे यांची शारीरिक चाचणी करून मग पायाचे हाड मोडण्या चे योग्य निदान केले जाते. फ्रॅक्चर चे परीक्षण स्पर्श चाचणी व न्यूरोव्हॅस्क्युलर चाचणी (पायाच्या रक्त पेशी व शिरांची तपासणी) द्वारे केले जाते.

निरीक्षणे पुढीलप्रमाणे:-

  • एक्स-रे.
  • अल्ट्रा सोनोग्राफी.

कारण शोधून उपचार करणे हे फ्रॅक्चर चा भाग व त्याच्या गंभीरतेवर अवलंबून असते. आराम मिळण्याचा काळ 4 आठवडे ते 10 ते 12 आठवडे असू शकतो.

बऱ्याच वेळेस, कमी केलेल्या शारीरिक हालचालीं सोबत स्प्लिंट्स आणि कास्ट हे फ्रॅक्चर ल आराम द्यायला उपकारक ठरतात.

काही बाबतीत,दुसरे बोट हे फ्रॅक्चर झालेल्या बोटाला आराम देण्यासाठी कारणीभूत ठरते.

फ्रॅक्चर झालेल्या भागाने जागा बदलली असेल तर डॉक्टर ॲनेस्थेशिया ने त्यावर योग्य ते उपचार करतात पण जर हे ओपन फ्रॅक्चर असेल तर शस्त्रक्रिया करून उपचार केला जातो.

जर फ्रॅक्चर हे पाचव्या बोटाच्या मधल्या भागात झाले असल्यास ते गंभीर फ्रॅक्चर असून त्यात शस्त्रक्रिया करावी लागते व पूर्ण आराम मिळण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

स्वतः घ्यायची काळजी:-

  • परिणाम झालेला भाग पृष्ठभागा पासून वर ठेवा.
  • दुखणे कमी करण्यासाठी थंड पदार्थांचा वापर करा.
  • वजन घेणे कमी करा.

 



संदर्भ

  1. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont, Illinois. Toe and Forefoot Fractures.
  2. MedlinePlus Medical: US National Library of Medicine; Metatarsal fracture (acute): Aftercare
  3. Cedars-Sinai Medical Center. Ankle Fractures. Los Angeles, California. [internet].
  4. Barts Health. Patient information: Ankle or foot fracture. National health service. [internet].
  5. American Academy of Family Physicians [Internet]. Kansas, United States; Diagnosis and Management of Common Foot Fractures