फ्रॅक्चर्ड घोटा - Fractured Ankle in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 01, 2018

March 06, 2020

फ्रॅक्चर्ड घोटा
फ्रॅक्चर्ड घोटा

फ्रॅक्चर्ड घोटा म्हणजे काय?

घोटा हा तीन हाडांनी बनलेला असतो - टीबिया (शिनबोन), फिब्युला (काल्फ बोन), आणि टॅलस (टीबिया, फिब्युला आणि टाचेचं हाड). फ्रॅक्चर झालेल्या घोट्यामध्ये, घोट्यामधील कोणतेही हाड मोडलेले असू शकते. फ्रॅक्चर हे एका हाडा (एक सामान्य घटना) मध्ये होऊ शकते, जो दररोजच्या क्रियांना हानी देत नाही किंवा तीव्र फ्रॅक्चर मध्ये घोट्याचे हाड विस्थापित होते त्यात त्वरित वैद्यकीय उपचाराची गरज आहे. कोणत्याही वयोगटात फ्रॅक्चरर्ड घोटा दिसून येऊ शकते. घोटा फ्रॅक्चरचा वारंवार होत असलेला प्रकार लॅटरल मॅलेओलस (55% सर्व फ्रॅक्चर्सचा फ्रॅक्चर) असतो. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात घोटा फ्रॅक्चरची घटना प्रति 100,000 व्यक्ती-वर्षे 187 फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले आहे. भारतात, वार्षिक घटना दर 100,000 व्यक्तींमध्ये 122 फ्रॅक्चर असल्याचे आढळले आहे.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

फ्रॅक्चर घोट्याच्या सर्वात सामान्य सादरीकरणात खालील समाविष्ट आहे:

  • असह्य वेदना ज्या प्रभावित भागाकडून गुडघापर्यंत वाढू शकतात.
  • स्थानिकीकृत किंवा संपूर्ण पाय एडीमा (सूज).
  • खपल्या सारख्या फोडांची निर्मिती.
  • चालण्यास असक्षम.
  • त्वचातून हाडे बाहेर दिसणे.

कोमलता येऊ शकते आणि  ती व्यक्ती प्रभावित पायावर स्वतःचे वजन सहन करण्यास सक्षम नसतो. फ्रॅक्चरर्ड एंकल हे एका विशिष्ट प्रकारचे मुरगळ्याशी सारखेच असते असे समजले जाऊन गोंधळ निर्माण होतो.

त्याचे मुख्य कारण काय आहेत?

घोट्याच्या फ्रॅक्चरसाठीचे सर्वाधिक वारंवार असलेली कारणे आहेत, जसे की खाली पडणे,पाय मुरगळणे आणि खेळ खेळताना कायमस्वरुपी नुकसान.
ज्या रुग्णांच्या रक्तात साखरेचे उच्च प्रमाण असते त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांच्या संवेदना पेशींना हानी पोचल्यामुळे त्यांच्या शरीराला दुखापत झालेली असते, ज्यामुळे हाडे आणि आसपासच्या संरचनेला आणखी नुकसान होऊ शकते. धूम्रपान आणि हाय बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) गुणोत्तर बऱ्याच वेळा घोट्याच्या फ्रॅक्चरशी जोडले जातात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

डॉक्टर ट्रोमॅटिक घटनामुळे झालेल्या फ्रॅक्चरचा इतिहास तपासून त्याचबरोबर काही संवादात्मक वैद्यकीय अटी,क्लिनिकल वैशिष्ट्ये आणि प्रभावित घोटा साठी काही चाचण्या ही सूचवू शकतील. एक्स-रेद्वारे फ्रॅक्चरचे विश्लेषण केले जाऊ शकते. इतर चाचण्यांमध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआय स्कॅनचा समावेश आहे. सर्जिकल हस्तक्षेप करण्याची गरज आहे का हे पाहण्यासाठी तणाव चाचणी केली जाते.

उपचारांच्या धोरणांमध्ये हे समाविष्ट आहे:

सर्जिकल पद्धत: हाडाचे विस्थापन किंवा त्वचेतून बाहेर आलेली हाड

नॉन-सर्जिकल पद्धतीः

  • बर्फाचा वापर आणि प्रभावित पाय उंचावर ठेवणे, यामुळे वेदना आणि सूज कमी होते.
  • हाडांचे विस्थापन नसल्यास स्प्लिंटचा वापर प्रभावित झालेल्या घोट्याला मदत करु शकतो.
  • संपूर्ण विश्रांती घेणे आणि पाया वर वजन ठेवणे टाळा.
  • फूट इम्मोबिलायझर किंवा प्लास्टरचा वापर करून कोणत्याही पुढील हालचाली रोखू शकते.

वेदना आणि सूज नियंत्रित करण्यासाठी काही ऍनाल्जेसिक आणि नॉन स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स (NSAIDs) वापरली जाऊ शकतात. त्वरित पुनर्प्राप्तीसाठी औषधोपचाराने शारीरिक उपचार घेतला जाऊ शकतो.

फ्रॅक्चर्ड घोटा ही दीर्घकालीन स्थिती नाही आहे आणि प्रभावित पायाची योग्य देखभाल करून आणि व्यवस्थापनाद्वारे ते बरे केले जाऊ शकते.



संदर्भ

  1. Meena S, Gangary SK. Validation of the Ottawa Ankle Rules in Indian Scenario. Arch Trauma Res. 2015 Jun 20;4(2):e20969. PMID: 26101760
  2. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont, Illinois. Ankle Fractures (Broken Ankle).
  3. Journal of Arthritis. Ankle Fractures: Review Article. OMICS International. [internet].
  4. Clinical Trials. Operative Versus Non Operative Treatment for Unstable Ankle Fractures. U.S. National Library of Medicine. [internet].
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Bone fractures

फ्रॅक्चर्ड घोटा साठी औषधे

Medicines listed below are available for फ्रॅक्चर्ड घोटा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹239.0

Showing 1 to 0 of 1 entries