सारांश
मानवी शरीराच्या चालण्यातच काय, तर ताठ मुद्रेत सुद्धा पायांचे अनन्यसाधारण महत्व आहे. चालताना आणि उभे राहिले असताना शरिराला संतुलित ठेण्यासाठी पायांच्या रचनेची महत्वाची भूमिका आहे. अमेरिकी शिशुरोग वैद्यकीय संघटना या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मानवी पाय 50 वर्षे वयापर्यंत सरासरी 75, 000 मैल इतके चालत असतात. याचे पर्यावसान म्हणजे, पायांच्या दीर्घकालीन हानी, जखमा, आणि शारिरीक आघातांमध्ये होते, जी व्यक्तीचे पाय दुखण्याची मुख्य कारणे आहेत. पुरूषांपेक्षा स्त्रियांमधे पाय दुखण्याचे अधिक प्रमाण आढळते. रुग्णाच्या पायांच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकतात. तरीही टाचांना आणि मेटाटर्सल (पायाच्या टाचांच्या आणि अंगठ्याच्या मधील हाड) या भागांवर अधिक प्रमाणात प्रभाव पडतो, कारण शरीराचा भार पेलण्यासाठी पायांचे हे अवयव महत्वाचे असतात. तुमचे डॉक्टर पायदुखीचे, शारीरिक चाचण्या, इमेजिंग चाचण्या, रक्ताच्या तपासण्या, आणि इतर लक्षणसूचक साधनांच्या आधाराने निदान करतात. स्वतः काळजी घेतली, तर पायाचे दुखणें कमी होऊ शकते, उदा. आइस पॅक्सचा वापर करणे, व्यवस्थित सज्ज होणारी आणि धक्क्यांची तीव्रता कमी करणारी पादत्राणे घालणें, टाचांचे पॅड्स वापरणे, वजनाचे नियंत्रण, शारीरिक तणाव कमी करणारे व्यायाम करणे, आणि इतर उपाय. वेदनाशामक औषधी आणि फीजीओथेरपींचे व्यायाम देखील पायदुखी कमी करायला मदत करतात.