पाय दुखणे - Foot Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 20, 2018

September 09, 2020

पाय दुखणे
पाय दुखणे

सारांश

मानवी शरीराच्या चालण्यातच काय, तर ताठ मुद्रेत सुद्धा पायांचे अनन्यसाधारण महत्व आहे. चालताना आणि उभे राहिले असताना शरिराला संतुलित ठेण्यासाठी पायांच्या रचनेची महत्वाची भूमिका आहे. अमेरिकी शिशुरोग वैद्यकीय संघटना या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मानवी पाय 50 वर्षे वयापर्यंत सरासरी 75, 000 मैल इतके चालत असतात. याचे पर्यावसान म्हणजे, पायांच्या दीर्घकालीन हानी, जखमा, आणि शारिरीक आघातांमध्ये होते, जी व्यक्तीचे पाय दुखण्याची मुख्य कारणे आहेत. पुरूषांपेक्षा स्त्रियांमधे पाय दुखण्याचे अधिक प्रमाण आढळते. रुग्णाच्या पायांच्या कोणत्याही भागात वेदना होऊ शकतात. तरीही टाचांना आणि मेटाटर्सल (पायाच्या टाचांच्या आणि अंगठ्याच्या मधील हाड) या भागांवर  अधिक प्रमाणात प्रभाव पडतो, कारण शरीराचा भार पेलण्यासाठी पायांचे हे अवयव महत्वाचे असतात. तुमचे डॉक्टर पायदुखीचे, शारीरिक चाचण्या, इमेजिंग चाचण्या, रक्ताच्या तपासण्या, आणि इतर लक्षणसूचक साधनांच्या आधाराने निदान करतात. स्वतः काळजी घेतली, तर पायाचे दुखणें कमी होऊ शकते, उदा. आइस पॅक्सचा वापर करणे, व्यवस्थित सज्ज होणारी आणि धक्क्यांची तीव्रता कमी करणारी पादत्राणे घालणें, टाचांचे पॅड्स वापरणे, वजनाचे नियंत्रण, शारीरिक तणाव कमी करणारे व्यायाम करणे, आणि इतर उपाय. वेदनाशामक औषधी आणि फीजीओथेरपींचे व्यायाम देखील पायदुखी कमी करायला मदत करतात.

पाय दुखणे ची लक्षणे - Symptoms of Foot Pain in Marathi

पायदुखीची लक्षणे त्यांच्या प्रकारांवर अवलंबून आहेत, उदा. :

  • टाच दुखणे
    प्लांटर फसायटिस, टाचांपासून ते अंगठ्या पर्यंतच्या  लिगामेंटचे दुखणे हे असते. टाचांचे अणुकुचीदार होणे (हाडाच्या अधिक वाढीने कॅल्शियमचा थर बनल्याने) किंवा लिगामेंटवरील अमर्याद दाबामुळे लिगामेंटमधे ताण येण्याने किंवा जखम होऊन टाचांचे दुखणे वाढते. रुग्णामध्ये खालील लक्षणे अनुभवाला येतात: 
    • टाचांतील किंवा पायाच्या मधल्या भागातील वेदना
    • बराच वेळ बसून  किंवा पडून राहिल्यानंतर (उदा. झोपेतून उठतांना) लगेच उठल्याने सुरुवातीच्या काही पावलांत टाचांमध्ये तीव्र वेदना जाणविणे
    • थोडा वेळ चालण्याने पायातील वेदनांचे कमी होणे
    • व्यायाम, दूरवरचे चालणे, किंवा तत्सम कार्यांनी वेदनांचे चिघळणे
    • वेदनांसोबत झिणझिण्या येणे किंवा बधिरता असणे.
  • अकिलीस टेंडीनायटिस
    ही टाचेला आणि पायांना जोडणाऱ्या स्नायुबंधातील दाहकता आहे. पोटरीच्या स्नायूंचे शेवटचे टोक वरच्या दिशेने वाढून अकिलीज स्नायुबंध बनतात जे चालताना, उड्या मारताना, आणि धावतांना पायाच्या खालच्या हालचालींना मदत करतात. ह्या स्नायुबंधांत दाह होतो, जेव्हा अधिक चालण्याने किंवा धावण्याने, पोटरीच्या स्नायूंमधील ताठरपणा, कडक पृष्ठभागावरील धावणे, उड्या मारणे आणि तत्सम इतर क्रिया केल्याने ताण येतो. सपाट तळपाय, टाचांचे अणुकुचीदार होणे, आणि आर्थरायटीसने देखील अकिलीज स्नायुबंधांत दाह होतो. खालील लक्षणे अनुभवास येतात:
    • अकिलीज स्नायूबंध आणि टाचांच्या वरील भागातील वेदना
    • ताठरपणा येतो आणि वेदना होतात,  चालणे  किंवा धावणे यांसारख्या शारीरिक क्रिया, केल्याने हे वाढते.
    • पायांवर उभे राहण्यात समस्या
    • तळपायांतील वेदना आणि सूज
  • तळपायाच्या मध्यभागातील वेदना
    मेटाटार्सल्जीया मध्ये तळपायाच्या मध्य भागात वेदना होतात. अनुचित प्रकारची पादत्राणे, आर्थरायटिस, आणि कोणत्याही खेळातील वेगवान हालचालींमुळे टाच आणि अंगठ्याला जोडणाऱ्या तळपायांतील हाडाला इजा होते. लठ्ठपणा, सपाट तळपाय, उंच कमानी सदृश तळपाय, आर्थरायटिस, गाऊट, बुनीऑन्स (मोठ्या अंगठ्याच्या पहिल्या सांध्यातील सूज), हॅमरटो (आंगठ्यातील खालच्या दिशेला आलेला वाक), मॉर्टनस न्यूरोमा (मज्जातंतूंना संकुचित करणारी कर्करोगरहित वाढ), फ्रॅक्चर, आणि प्रौढांतील मधुमेह, मेटाटार्सल्जीयाला वाढवते. याच्याशी संबंधित लक्षणे अशी आहेत:
    • एक किंवा दोन्ही पायांमधील विशेषतः अंगठ्यातील  जळजळीच्या किंवा वेदनादायक संवेदना.
    • तळपायांखाली खडा ठेवल्यागत संवेदना
    • वेदनांचा गतीने वाढणे,  झिणझिण्या येणे आणि बधिरता येणे.
    • उभे राहिल्यासकिंवा चालल्यास वेदना वाढणे
  • तळपायाच्या पुढील भागातील वेदना
    अंगठ्याच्या नखांचे वाढणे, व्हरुका किंवा चामखीळ, नखांना आणि चामडीचा, बुरशीजन्य संक्रमण (खेळाडूंचे पाय), कॉर्न आणि कॅलोसायटिस (जाड आणि कडक त्वचा), बुनीऑन्स, हॅमरटो, क्लॉ फूट, आणि गाऊट या काही स्थिती आहेत ज्या पायांच्या पुढील भागाला प्रभावित करतात. सहसा आढळणारी लक्षणे अशी आहेत:
    • प्रभावित भागातील थरथरत्या वेदनांसह सूज आणि दुखणे, ज्या अंगठा वाढण्यासोबत आणि गाऊटशी संबंधितअसतात. हाडांच्या विशेषतः मोठ्या अंगठ्याची, दाहकता हिला गाऊट असे म्हणतात.
    • तळपायांतील वेदना आंगठ्यातील विकृतींमुळे होतात जसे:
      • हॅमरटो
        (दुसऱ्या, तिसऱ्या, किंवा चौथ्या) बोटांतील विकृतीमुळे तळपाय हातोड्यासारखा दिसतो.
      • क्लॉ फूट
        अंगठ्यातील विकृतीमुळे तळपाय वाकल्यासारखा दिसतो
      • बुनिऑन्स
        ​हाडावरील कडक थराच्या साचण्यामुळे मोठा आंगठा दुसऱ्या बोटाकडे वाकलेला असतो
    • अंगठ्याच्या स्नायूंच्या आकुंचनाने व तिथे जखडलेल्या नसेमुळे तळपायाच्या समोरील भागात जळजळ होते किंवा वेदना होतात.
    • नसा समविष्ट असल्यामुळे, वेदनांसह तळपायांत झिणझिण्या जाणवतात आणि त्यांमध्ये बधिरता सुद्धा येते.
    • अंगठ्यावरील आणि तळपायांवरील सततच्या दबावामुळे वाढणाऱ्या वेदनांसोबत सामान्यतः कातडीला जाडपणा आणि कडकपणा (कॉर्न किंवा कॅलॉसिटी) देखील येतो.
    • वेदनांसह फोडी येतात आणि त्वचेवर रुक्ष खवल्या येऊन कातडीमधे बुरशीचा संक्रमण होतो. रुग्णाच्या पायाची नखे ठिसूळ होतात आणि चवड्यांच्या रंगांमध्ये बदल दिसून येतो.
  • पायांचे सामान्य दुखणे
    • पायांतील वेदना, ओडेमा, फ्रॅक्चर, आणि चिलब्लेन (गार तापमानाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे आलेली सूज)यांच्याशी संबंधित असतात.
    • व्हेरुका किंवा चामखीळ, कॉर्न आणि केलॉसिटीमधे पायांमधे तीव्र वेदना उन्मळून येतात.
    • पायांमधे चिलब्लेनसह तीव्र वेदना आणि चुरचुर असते. कातडीवर सूज येते आणि तिचा रंग लालसर निळा होतो.
    • पायांमधे फ्रॅक्चर आणि हाडांचे दाहक आजार जसे, रूमॅटॉइड आर्थराइटिस, गाऊट, ओस्टेओआर्थरायटिस, सोरीयाटिक आर्थरायटिस आणि इतरांसह अत्यंतिक वेदना असतात. रुग्णाच्या पायांच्या हालचालींवर खूप मर्यादा येतात आणि सूज वेदनेशी निगडीत असते.

पाय दुखणे चा उपचार - Treatment of Foot Pain in Marathi

पायांच्या दुखण्यावरील उपचारांत औषधे आणि स्वतः घ्यावयाची काळजी समाविष्ट आहे.

औषधी

  • पॅरासिटामोल सारखी औषधं सौम्य वेदना कमी करतात
  • आयब्रुफेनसारखीएँटी-इनफ्लेमेटरी औषधं दाहकता कमी करून वेदना शमवतात.
  • इतर काही उपयोगात न आल्यास, कॉर्टिकोस्टेरोइड औषधं आणि वेदनेच्या ठिकाणचे लसीकरण वेदना कमी करण्यात मदत करते.
  • गाउटच्या उपचारात युरीक अॅसीड कमी करणारी औषधंदेतात.
  • चामखीळ या अवस्थेला घालवण्यासाठी सॅलीसायलीक अॅसीड मलम किंवा जेल वापरतात. त्यामुळे चामखीळ तुकडे होऊन गळते.

शस्त्रक्रीया

  • भिन्न शस्त्रक्रीयांच्या मदतीने पायांतील विकृतींवर उपचार करतात. त्यामधे, पायांमधे तीव्र वेदनांसहित झिणझिण्या आणि बधिरता येण्यासाठी कारणीभूत असलेल्या व जखडलेल्या नसांना मोकळे करतात.
  • गॅस्ट्रोक्नेमीक रिसिजनमधे पोटऱ्यांच्या स्नायुंतील ताठरपणा याला सर्जन शिथील करतात. पोटऱ्यांचे हे ताठरलेले स्नायू प्लांटर फासीयावरील ताण वाढवीतात ज्याने स्ट्रेचींगच्या व्यायामाला प्रतीसाद मिळत नाही.
  • प्लांटर फासीयाचे प्रसरण करण्यासाठी प्लांटर फासीयाला चिरा देऊन त्याचा कडकपणा शिथील केल्या जातो.

जीवनशैलीचे व्यवस्थापन

जीवनशैलीच्या व्यवस्थापनातील काही उपाय पायांच्या वेदना वाढून देण्यात महत्वाची भूमिका साकारतात

  • दीर्घकालीन वेदनांना कमी करण्यासाठी वेदनादायक जागेवर गरम शेक दिल्यास, रक्ताचा पुरवठा वाढून वेदना कमी होतात.
  • बर्फाचा पॅक लाऊन पायातील सूज आणि दाह कमी करून वेदना कमी होतात. वेदना होत असलेल्या भागावर गार पाण्याच्या बाटलीच्या लाटण्याने वेदना लक्षणीय रीत्या कमी करण्याचा सुद्धा विकल्प आहेच.
  • प्रभावीत पायावर कमीत कमी भार टाकण्याचा प्रयत्न करा जेणे करून त्यावर अधिकचा दबाव टळेल.
  • नरम पॅड्सचे सोल असलेले आरामदायक जोडे वापरा, किंवा वेदनादायक पायांवर दबाव न येण्यासाठी टाचेचे पॅड्स वापरा.
  • कडक पृष्ठभागावर अनवाणी किंवा पादत्राणांशिवाय चालू नका.
  • पोटरीच्या स्नायूंच्या, पायांच्या (प्लॅंटर फॅसीया) स्ट्रेचींगचे व्यायाम करा, ज्याने कडकपणा कमी होतो व पायांच्या स्नायुंतील लवचीकपणा वाढतो.
  • रात्री स्प्लींट बांधल्यास, झोपेत प्लांटर फासीया प्रसरण पाऊन प्लांटर फासीयामूळे होणार्या पायाच्या दुखण्याला विराम मिळतो.
  • वजन अधिक असल्यास, माफक व्यायम करून अधीकचे वजन कमी करा.
  • बोटांच्या नखांना स्वच्छ ठेवा आणि आसपासच्या कातडीमधे जाण्यापासून वाचवण्यासाठी नखांना वारंवार कापत रहा.
  • पायांच्या दुखण्यात आराम करणे अतिशय महत्वाचे आहे.
  • सतत ताणण्याचे व्यायाम केल्याने पोटऱ्यांचे आणि पायांचे स्नायू लवचिक बनतात ज्याने पायांच्या वेदना कमी होतात.
  • घट्ट जोड्यांना आरामदायक जोड्यांनी आणि कडक सोल असलेल्या जोड्यांना मऊ सोलच्या जोड्यांनी बदला. याने पाय मोकळेही वाटेल.
  • मधुमेहावर नियंत्रण ठेवा आणि पोषकतत्वांनी युक्त निरोगी आहार असलेली जीवनशैली स्वीकारा.


संदर्भ

  1. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Lacing right to fight foot pain. Year published. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  2. Awale A, Dufour AB, Katz P, Menz HB, Hannan MT. Link Between Foot Pain Severity and Prevalence of Depressive Symptoms.. Arthritis Care Res (Hoboken). 2016 Jun;68(6):871-6.PMID: 26555319.
  3. R. Kevin Lourdes, Ganesan G. Ram. Incidence of calcaneal spur in Indian population with heel pain. Volume 2; 31August 2016; Department of Orthopaedics,Sri Ramachandra Medical University,Chennai.
  4. National Health Service [Internet]. UK; Foot pain
  5. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Plantar Fasciitis and Bone Spurs.
  6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Achilles tendinitis
  7. National Health Service [Internet]. UK; Pain in the ball of the foot
  8. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Hammer Toe.
  9. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Claw foot.
  10. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Bunions.
  11. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Exercises for healthy feet. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  12. National Health Service [Internet]. UK; Foot pain
  13. National Health Service [Internet]. UK; Heel pain
  14. National Health Service [Internet]. UK; Ingrown toenail

पाय दुखणे साठी औषधे

Medicines listed below are available for पाय दुखणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹114.0

Showing 1 to 0 of 1 entries