चेहऱ्याचा पॅरेलेसिस म्हणजे काय?
चेहेर्याच्या शीरेला हानी पोहोचल्यामुळे उद्भवणार्या वैद्यकीय अवस्थेला चेहेर्याचा पॅरेलेसिस म्हणतात ज्यामुळे रुग्ण चेहेर्यावर भाव दाखवण्यासाठी हालचाली करू शकत नाही, व्यवस्थित खाऊ किंवा पिऊ शकत नाही.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
चेहऱ्याच्या पॅरेलेसिसची सर्वसाधारण लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- पापण्या बंद न करता येणे किंवा पापण्याची उघडझाप न करता येणे.
- चेहेर्याची हालचाल न करता येणे.
- तोंड खाली ओघळणे.
- चेहेर्याच्या संरचनेचा तोल सांभाळण्यात असमर्थता.
- चेहऱ्याचा पॅरेलेसिसमध्ये व्यक्तिस भुवया उंचावता येत नाही.
- बोलण्याची आणि खाण्याची क्रिया करण्यास अवघड जाते
- चेहेर्याच्या एकूण हालचाली करण्यास अवघड जाणे.
चेहेर्याचा वापर करून करता येणार्या मूलभूत हालचालींमध्ये अवघडपणा आल्यामुळे सहसा रुग्ण एकटा पडतो. त्यामुळे त्याच्यावरील उपचारांमुळे होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेत राहणे फार महत्वाचे आहे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
चेहऱ्याचा पॅरेलेसिस अचानक किंवा कालांतराने होऊ शकतो. चेहऱ्याचा पॅरेलेसिसची सर्वसाधारण कारणे पुढीप्रमाणे आहेत:
- चेहेर्याच्या शिरांना संसर्ग किंवा त्या सुजणे.
- डोक्यामध्ये गाठ होणे.
- मानेमध्ये गाठ होणे.
- स्ट्रोक.
- आघात किंवा ताण.
- बेल्स पाल्सी (अमेरिकेत सामान्यत: आढळणारा चेहर्याच्या पॅरेलेसिसचा प्रकार).
काही इतर कारणांमुळेही चेहर्याचा पॅरेलेसिस होऊ शकतो ती म्हणजे:
- चेहेर्याला इजा होणे.
- लाईम रोगाचा संसर्ग (गोचीडीमार्फत माणसाकडे प्रसारित होणारा जिवाणूजन्य रोग).
- विषाणूंचा संसर्ग.
- वॅस्क्युलीटीस सारखे ऑटोइम्युन रोग.
- चुकीच्या पद्धतीने केली गेलेली दातांवरील प्रक्रिया ज्यामुळे चेहेर्याच्या शिरेची हानी होते.
- दुर्मिळ बाबतीत जन्मतःच काही बाळांना चेहर्याच्या पॅरेलेसिस झालेला असतो (जो नंतर बरा .होतो).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुम्हाला वर दिलेल्यापैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या. चेहेर्यावर अशक्तता आणि बधिरता वाटणे ही चेहर्याच्या पॅरेलेसिसची सुरुवातीची लक्षणे आहेत.
डॉक्टर तुमच्या चेहेर्याची दोन्ही बाजूंनी तपासणी करतील. ते तुमच्या तबेतीच्या बद्दल अलीकडेच आलेल्या समस्या किंवा इजा याबद्दल चौकशी करतील. मग ते तुम्हाला काही तपासण्या करून घेण्यासाठी सांगतील. त्यात पुढीलपैकी असू शकतात:
- रक्त तपासणी (रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी).
- लाईम चाचणी.
- शिरा आणि स्नायूंच्या नमुन्याचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रोमायोग्राफी (EMG).
- डोक्याचा सीटी स्कॅन / एमआरआय.
योग्य निदान झाल्यावर रुग्णाचे वय, रोगाचे कारण आणि तीव्रता यांचा विचार करून तुम्हाला योग्य असे उपचार सुचवतील जे पुढे दिले आहेत:
- शारीरिक/वाचा थेरपी.
- चेहेर्याच्या स्नायूंचे प्रशिक्षणाचा उपचार.
- चेहेर्याच्या स्नायूंचे नियंत्रण सुधारण्यासाठी बायोफिडबॅक प्रशिक्षण.
- चेहेर्याला झालेल्या इजेमुळे चेहेरा खराब झाला असेल तर आणि डोळे मिटता यावेत म्हणून प्लॅस्टिक सर्जरी.
- उच्च रक्तदाब यासारख्या अंतर्गत कारणांसाठी विशिष्ट औषधे दिली जातात.