डोळ्याला इजा होणे काय आहे?
डोळ्याला होणारी इजा हे एक वैद्यकिय लक्षण आहे ज्यात डोळ्यांची रचना आणि कार्य काही कारणांमुळे बदलते किंवा त्यात अडथळा येतो. व्यापकदृष्ट्या बघितले तर डोळ्यांच्या कोणत्याही भागाला किंवा पेशींना इजा होऊ शकते. डोळ्याला होणारी इजा ही वैद्यकियदृष्ट्या गंभीर बाब मानली जाते कारण त्यात दृष्टी जाण्याचा धोका उद्भवु शकतो.
याच्याशी निगडित प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डोळ्याला होणाऱ्या इजेची सर्वसामान्य चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- सतत डोळे दुखणे.
- डोळ्यामधील बुबुळाचा आकार बदलत राहणे.
- दृष्टी अधू होणे.
- धूसर दिसणे.
- डोळे लाल होणे.
- डोळ्यांची जळजळ होणे.
- डोळ्यात पाणी येणे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
डोळ्यांना विविध कारणांमुळे इजा होऊ शकते. मनोरंजनाच्या धामधुमीत झालेल्या निष्काळजीपणामुळे याची जोखीम जास्त वाढते.
बॉक्सिंग, कुस्ती, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, मार्शल आर्ट्स, टेनिस किंवा बॅडमिंटन यासारख्या खेळांमधे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.
व्यापकदृष्ट्या ह्याची सर्वसाधारण कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- पापणीवर अचानक लागणाऱ्या धक्क्याने किंवा मार लागल्यामुळे डोळ्यात जखम होऊ शकते.
- अतीतीव्र प्रकाशाच्या स्त्रोतामुळे होणाऱ्या फ्लॅश बर्न्स नी सुद्धा डोळ्याला इजा होऊ शकते. म्हणूनच कामाच्या ठिकाणी हा धोका टाळण्यासाठी डोळ्यावर सुरक्षा चष्मे जरूर घालावेत.
- आम्ल किंवा अल्कलींसारखे रासायनिक पदार्थ कामाच्या ठिकाणी वापरताना भाजण्यासारखे अपघात होऊ शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वर दिलेले चिन्हे किंवा लक्षणांपैकी एखादे जरी लक्षण तुम्हाला दिसले आणि डोळ्याला इजा झाली असण्याची शक्यता वाटली तर ताबडतोब नेत्रतज्ञ्याला भेटा.
नेत्रतज्ञ तुमची सर्व लक्षणे तपासुन बघतील. डोळा व्यवस्थित तपासता यावा यासाठी ते तुमच्या डोळ्यात डायलेटींग ड्रॉप्स घालतील ज्यामुळे बुब्बुळे प्रसरण पावतील आणि डॉक्टर तुमच्या डोळ्यातील आतील भाग व्यवस्थित तपासून योग्य निदान करू शकतील.
- डोळ्यात जर बाहेरील कचरा गेला असेल तर कापसाच्या बोळ्यानी तो काढून टाकला जाईल.
- एखाद्या संसर्गामुळे इजा झाली असेल तर त्यावर औषधे सुचवली जातील.
- तुमचे नेत्रतज्ञ तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत दवाखान्यात येण्याचा सल्ला देतील.
डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून तुम्ही पुढीलप्रमाणे काळजी घेऊ शकता.
- तुम्ही जेव्हा रासायनिक पदार्थांसोबत काम करत असाल ज्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते तेंव्हा सुरक्षा चष्मे घालायला विसरू नका.
- धारदार किंवा टोकदार वस्तुंबरोबर काम करताना योग्य अंतर ठेवा ज्यामुळे तुमचा त्या वस्तूंशी सरळ संबंध येणार नाही.