डोळ्यातील संसर्ग काय आहे?
डोळ्यातील संसर्ग सर्वसामान्यपणे सगळीकडे आढळून येतात आणि अस्वस्थतेचे ते एक मुख्य कारणही आहे. जीवाणू, विषाणू आणि बुरशी या सर्वांमुळे डोळ्याला संसर्ग होतो ज्यामुळे डोळे लाल होणे, सुजणे, डोळ्याला खाज येणे, डोळ्यात चिपाड जमणे आणि डोळे दुखणे हे त्रास होतात. सर्वात जास्त आढळणारा डोळ्याचा संसर्ग म्हणजे कंजंक्टीव्हायटीस जो विषाणूजन्य आहे.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डोळ्याच्या संसर्गाशी निगडीत चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कंजंक्टीवायटीस आणि ब्लेफारिटीस:
- सुजलेले डोळे.
- वेदना.
- सूज.
- डोळ्यातून पाण्यासारखा स्त्राव बाहेर पडणे.
- जीवाणूजन्य केराटिटीस:
- वेदना.
- लालसरपणा.
- स्त्राव.
- फोटोफोबिया.
- डोळ्यातून पाणी येणे.
- दृष्टी कमी किंवा धूसर होणे.
- कॉर्नियल अल्सर.
- हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस केराटिटीस:
- वेदना.
- दृष्टी कमी किंवा धूसर होणे.
- डोळ्यातून पाणी येणे.
- स्त्राव.
- अल्सर.
- खाजवणे.
- फोटोफोबिया.
- एंडोफ्थल्मिटीस:
- वेदना.
- दृष्टी अधू होणे.
- लालसरपणा.
-
स्टाय:
- वेदना.
- गुठळी बनणे ज्यात पस होण्याची शक्यता असते.
- डोळे लाल होणे आणि त्यातून पाणी येणे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
डोळ्याच्या प्रत्येक संसर्गाची कारणे वेगवेगळी असतात जी पुढे दिलेली आहेत:
- कंजंक्टीव्हायटीस: कंजंक्टीव्हायटीसने संसर्गित असलेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्कात राहिल्यामुळे याचा प्रसार होतो.
- जीवाणूजन्य केराटिटीस: कॉनटॅक्ट लेंसेसच्या वापरामुळे किंवा डोळ्यावर होणार्या आघातामुळे हा होतो.
- हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस केराटिटीस: हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरसमुळे हा होतो.
- एंडोफ्थल्मिटीस: मायक्रोबियल संसर्गामुळे डोळ्याला सूज येते किंवा दाह होतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया, डोळ्यावर होणारा एखादा आघात आणि डोळ्यात घेतल्या गेलेल्या इंजेक्शनमुळे देखील हा होतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वैद्यकीय पूर्व इतिहास आणि योग्य शारीरिक तपासणीच्या आधारावर डोळ्यांच्या संसर्गाचे निदान केले जाते.
नेत्रविकार तज्ञ स्लीट-लॅम्प मायक्रोस्कोपच्या सहाय्याने तुमच्या डोळ्यांची तपासणी करतात.
तपासणीमध्ये पुढील गोष्टी येतात:
- कॉर्निया किंवा कंजंक्टीव्हाच्या टिश्यूंच्या तुकड्यांचे कल्चर.
- पापणी किंवा कंजंक्टीव्हल सॅकमधील स्त्रावाचे कल्चर.
- कॉर्नियाची बायोप्सी.
संसर्गाची तीव्रता, लक्षणे आणि प्रकार यावर उपचार अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे आढळणार्या डोळ्यांच्या संसर्गावरील उपचार पुढीलप्रमाणे आहेत:
- व्हायरल कंजंक्टीव्हायटीसच्या असल्यास डॉक्टर्स तुम्हाला अॅन्टीव्हायरल ड्रॉप्स किंवा जेल्स सुचवू शकतात.
- जीवाणूजन्य केराटिटीसवर सामान्यपणे क्लोरमफेनिकॉल सुचवण्यात येते.
- हर्पीस सिम्प्लेक्स केराटिटीससाठी तोंडावाटे घेण्यात येणारे अॅन्टीव्हायरल एजंट्स आणि टॉपीकल स्टेरोईड्स सुचवले जातात.
- एंडोफ्थल्मिटीसवर व्हिट्रीयल इंजेक्शन्स किंवा शिरेतून इंजेक्शन्स द्यायची गरज भासू शकते तसेच तोंडावाटे घेण्यात येणारी अँटीबायोटिक्सही दिले जातात.
- पॅरासिटामोल किंवा इतर वेदनाशामकांनी स्टाय मध्ये लक्षणीय आराम मिळू शकतो. गरम कपड्यानी डोळा शेकल्यास सूज कमी व्हायला मदत होते.
तुम्हाला झालेला संसर्ग पूर्ण बरा होईपर्यंत कॉनटॅक्ट लेन्सेस न वापरण्याचा सल्ला नेत्रविकार तज्ञ तुम्हाला देतात.