डोळ्यांचे विकार म्हणजे काय?
डोळ्यांचे विकार म्हणजे सर्वसाधारणपणे डोळ्यांच्या विविध भागांच्या समस्या. डोळे कोरडे होणे, कंजंक्टिवायटीस, ग्लोकोमा, मॅक्युलर डिजेनरेशन, डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू, दृष्टी अधू होणे, चकणेपणा, लेझी आय आणि दृष्टी जाणे ह्या डोळ्याच्या सर्वसाधारण समस्या आहेत.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
तुम्हाला डोळ्याच्या समस्यांमुळे त्रास होतो आहे असे पुढे दिलेली चिन्हे आणि लक्षणे सुचवतात:
- डोळे लाल होणे आणि सुजणे.
- डोळ्याला खाज येणे आणि डोळ्यात चिपड जमा होणे.
- डोळे चुरचुरणे आणि जड होणे.
- दृष्टी अधू होणे.
- डोळ्याभोवती आणि डोळ्यात वेदना होणे.
- धुरकट, अस्पष्ट किंवा दुहेरी दृश्य दिसणे.
- दृष्टीसमोर डाग किंवा ठिपके दिसणे उदा., फ्लोटर्स.
- बुब्बुळाचा रंग बदलणे.
- प्रकाशामुळे डोळे दिपणे.
- दृष्टी जाणे.
- डोळ्यावर पडदा असल्यासारखे वाटणे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
डोळ्याच्या समस्या विविध कारणांमुळे उद्भवू शकतात. या समस्यांची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवींमुळे होणारा संसर्ग.
- डोळ्याला किंवा डोळ्याच्या एखाद्या भागाला इजा होणे.
- मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या रोग परिस्थिति आणि संधिवात, जोग्रेन सिंड्रोमसारख्या ऑटोइम्युन कंडिशन्स.
- डोळ्यांवर खूप ताण येणे.
- व्हिटॅमिन ए ची कमतरता.
- आनुवंशिक रोग.
- अॅलर्जी.
- लांबलेले औषधोपचार.
- वृद्धत्व.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. डोळे तपासणीमुळे त्यांच्या समस्यांची चिन्हे आणि लक्षणे समजण्यात मदत होते. नेत्रचिकित्सकाकडून डोळ्यांच्या समस्यांचे निदान खालील प्रकारे केले जाऊ शकते:
- डोळ्यांची तपासणी.
- दृष्टी सुक्ष्मतेसंबंधी समस्या आहेत का ते तपासण्यासाठी रिफ्राक्षन आणि स्नेलन परीक्षा जसे की जवळची आणि दूरची दृष्टी.
- व्हीज्युअल फील्ड टेस्टिंग.
- गोल्डमन्स स्पेरिमेट्री आणि अम्स्लर्स ग्रीड यांनी अनुक्रमे परिघीय आणि मध्य दृष्टी तपासली जाते.
- फंडस (अंतर्गत पृष्ठभाग) तपासण्यासाठी डोळ्याची फंडोस्कोपी केली जाते.
- ऑक्युलर प्रेशर मोजण्यासाठी टोनोमेट्री केली जाते.
- रातांधळेपणा तपासण्यासाठी ईशीहारा कलर प्लेट्स केले जाते.
डोळ्यांच्या समस्यांवरचे उपचार त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. सध्या उपलब्ध असलेले डोळ्यांवरील उपचार पुढीलप्रमाणे आहेत:
- चष्मा, कॉनटॅक्ट लेंसेस किंवा लेझर उपचारांनी दृष्टी दुरुस्त करणे.
- डोळे कोरडे झाल्यास त्यांना ओलावा देणारे औषधी असलेले आय ड्रॉप्स किंवा आय जेल्स.
- अॅलर्जी, ग्लोकोमा आणि डोळ्यांच्या संसर्गावर उपचार म्हणून औषधी आय ड्रॉप्स.
- डायबेटिक रेटीनोपॅथीसाठी लेझर उपचार.
- मोतीबिंदू आणि रेटीनल डिटॅचमेंटवरील उपचार म्हणून सर्जिकल इंटरव्हेंशन.
- मॅक्युलर डिजनरेशनवरील उपचार म्हणून फोटोडायनॅमिक थेरपी.
- डोळ्यांच्या कोरडेपणावर ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि पौष्टिक सप्लिमेंट्स.
जीवनशैलीत बदल केल्यानेसुद्धा डोळ्यांच्या समस्यांचा त्रास होत नाही. निरोगी आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घ्यावा, धूम्रपान करू नये, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी, सनग्लासेसच्या सहाय्याने डोळ्यांचे संरक्षण करावे, जोखमीचे काम करताना सुरक्षा चष्मा घालावा आणि डोळ्यांना पुरेसा आराम द्यावा. वरचेवर होणार्या आणि जुन्या लक्षणांसाठी नेत्रविकारतज्ञांचा सल्ला घ्यावा.