गर्भाशयाचा कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग) काय आहे?
उदरामध्ये किंवा गर्भाशयाच्या आत एक आंतरिक आवरण असते ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात. जेव्हा एंडोमेट्रियमच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा त्या गर्भाशयाचा कर्करोगास कारणीभूत ठरतात. सामान्यतः ते एंडोमेट्रियल हायपरप्लासिया म्हणून सुरू होते आणि वाढल्यास कर्करोग होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गर्भाशयाचा कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला गर्भाशयातच मर्यादित असतात आणि कालांतराने लक्षणे पसरतात किंवा वाढतात.सर्वसाधारण लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो:
- योनीतील असामान्य रक्तस्त्राव, जो जास्त असू शकतो किंवा काही काळादरम्यान असू शकतो.
- मेनोपॉझ म्हणजे रजोनिवृत्ती (स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होतो तो काळ) नंतरही योनीतून रक्तस्त्राव.
- पेल्विक वेदना.
- डिस्पॅरुनिया.
- असामान्य योनी स्त्राव (रक्तरंजित, पिवळा).
- वजन कमी होणे.
- थकवा.
- भूक कमी होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
एंडोमेट्रियम हा अंडकोशातील हार्मोनला खूप संवेदनशील असतो विशेषतः इस्ट्रोजन सोबत. तरी गर्भाशयाच्या कर्करोगाचे अचूक कारण अद्यापही कळले नाही आहे.पूर्वसूचक घटकांचा किंवा धोक्याच्या कारणांचे काही कारणं आहे ज्यामुळे स्त्रीला गर्भाशयाच्या कर्करोग होऊ शकतो. त्यात हे समाविष्ट आहेत.
- कौटुंबिक इतिहास (आई किंवा बहिणीला एंडोमेट्रियल कर्करोग किंवा युटेरिन फायब्रॉइड (एका प्रकारचा कर्करोग जो गर्भाशयाशी संबंधित असतो)).
- मासिक पाळी लवकर येणे.
- वंधत्व.
- लठ्ठपणा.
- हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (एचआरटी) चा दीर्घकालीन उपयोग.
- स्तन कर्करोगाची औषधे (टॅमॉक्सिफेन).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
क्लिनिकल तपासणीसह संपूर्ण वैद्यकीय इतिहासाने, सामान्यतः एंडोमेट्रियल कर्करोगाचे निदान साध्य होते. याव्यतिरिक्त, कर्करोगाच्या प्रमाणाची तपासणी आवश्यक आहे:
- पेल्विक अल्ट्रासाऊंड - एंडोमेट्रियलची जाडी माहिती करून घेण्यासाठी.
- ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड - एंडोमेट्रीममध्ये बदलाचे अचूकपणे मूल्यमापन करण्यासाठी.
- हिस्टेरोस्कोपी - एंडोस्कोपचा वापरू करून अँन्डोमेट्रियम पाहण्यासाठी; जे गर्भाशयाच्या आतल्या आवरणातील अनियमितता सूचित करते.
- एंडोमेट्रियल बायोप्सी - एंडोमेट्रियल कर्करोगाच्या प्रकाराची पुष्टी करण्यासाठी मायक्रोस्कोप खाली अनेक लहान ऊतींचे नमुने तपासले जातात.
- पेल्विक सीटी स्कॅन - एंडोमेट्रियल कर्करोगाचे स्टेजिंग (टप्पे माहित करून घेण्यासाठी) करण्यात मदत करण्यासाठी.
- पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी / सीटी स्कॅन - एंडोमेट्रियल पेशींच्या प्रसाराचे मूल्यांकन करणे.
लवकर निदान झाल्यास, योग्य उपचाराने तो बरा होऊ शकतो. एंडोमेट्रियल कर्करोगासाठीच्या उपचार पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे:
- शस्त्रक्रिया - ही उपचारांची पहिली पायरी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास अंडाशय आणि अंडनलिकेसह गर्भाशय काढले जाते.
- रेडिएशन थेरपी - सहसा, प्रोटॉन किरणे कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी वापरतात.काही बाबतीत, मोठ्या आकाराच्या ट्युमरला कमी करण्यासाठी रेडिएशन दिले जाते.
- हार्मोन थेरपी - तोंडी संप्रेरकांची तयारी केली जाते, ज्यामुळे प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते किंवा इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, ट्युमरच्या पेशी कमी होतात.
- किमोथेरपी - तोंडी किंवा इंट्रावेनस किमोथेरेपीटिक एजंट कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यात मदत करतात.
किमोथेरेपीटिक औषधे देखील ट्युमर कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे शस्त्रक्रिया सुलभ होते.