इलेक्ट्रोलाइट असंतुलन काय आहे?
खनिजे किंवा इलेक्ट्रोलाइट हे होमिओस्टॅसिस किंवा शरीरातील वेगवेगळे कार्य संतुलीत राखण्यासाठी महत्वाची असतात. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीमध्ये असंतुलन, तंत्रिका, हार्मोन्स आणि शरीराच्या द्रवपदार्थांच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणतात. इलेक्ट्रोलाइट असंतुलन म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स जसे,सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांची एकतर कमतरता किंवा जास्त प्रमाण.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता किंवा जास्त प्रमाणामुळे काही चिन्हे आणि लक्षणे दिसतात,ती म्हणजे:
- निर्जलीकरण (डिहायड्रेशन).
- स्नायू मध्ये वेदना आणि थकवा.
- डोकेदुखी, चक्कर येणे आणि सुस्ती.
- गोंधळ.
- फीट येणे.
- उदासीनता (डिप्रेशन).
- रक्तदाबात बदल.
- हृदयाच्या ठोक्या मध्ये अडथळा.
- संपूर्ण शरीरावर सूज.
- हाडांची समस्या.
- मूत्रविसर्जना मध्ये बदल.
इलेक्ट्रोलाइट असंतुलनाची मुख्य कारणं काय आहेत?
इलेक्ट्रोलाइट असंतुलनाच्या मुख्य कारणांमध्ये समाविष्ट आहे:
- अतिसार, उलट्या, जास्त घाम येणे, गंभीर संसर्ग, अँटीडाययुरेटिक हार्मोनमध्ये विकार, इत्यादि कारणांमुळे शरीरातुन पाणी वाहून जाणे.
- एल्डोस्टेरॉन (ॲड्रेनल ग्रंथी द्वारा सोडले गेलेले) आणि पॅराथायराईड हार्मोनच्या कार्यामध्ये विकार, जे शरीरातील सोडियम आणि कॅल्शियमशी संबंधित आहेत.
- मूत्रपिंडाच्या कार्यप्रणालीतील विकार ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे असामान्य नुकसान किंवा संचय होते
- रक्तदाबाच्या उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे (डाययुरेटिक्स)
- कंजसटिव्ह हार्ट फेलिअर,फुफ्फुस विकार इ.
इलेक्ट्रोलिट असंतुलनाचे निदान आणि उपचार केले जातात?
इतिहास, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचणीच्या आधारावर डॉक्टर इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचे निदान करतात.
- रक्त चाचणी
- सीरम सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, कॅल्शियम इत्यादि मोजण्यासाठी वापरले जाणारे मूल मेटॅबॉलिक पॅनेल. रक्तातील इलेक्ट्रोलाइट्समध्ये घट किंवा वाढ, रक्ताचे पीएच(Ph), मूत्रपिंडांचे कार्य इ. शोधण्यासाठी.
- मूत्र चाचणी
- हे मूत्रात इलेक्ट्रोलाइट्सचे स्तर मोजण्यासाठी वापरले जाते.
- इतर चाचण्या- इलेक्ट्रोलाइट असंतुलनच्या कारणांवर अवलंबून असतात.
- सीरम क्रिएटिनिन, ब्लड यूरिया नायट्रोजन.
- पॅराथाईरॉईड हार्मोनची पातळी.
- हृदय आणि फुफ्फुसाची समस्या शोधण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम, 2 डी इको, एक्स-रे छाती इ.
असमतोल सुधारण्याच्या उद्देशाने उपचार पद्धती खाली दिल्या आहेत:
- इंट्राव्हेनस(शिरेच्या आत) इंजेक्शन्स किंवा तोंडी टॅब्लेटद्वारे इलेक्ट्रोलाइट सप्लीमेंट्स.
- पोटॅशियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असलेली ताजी फळं.
- स्नायूचा त्रास, डोकेदुखी, मळमळ इत्यादींपासून मुक्त करण्याकरिता लक्षणांचा उपचार.
- शरीरावर एडीमा किंवा सूज आल्यास पाण्याच्या वापरावर प्रतिबंध.
- औषधं जसे कि डाययुरेटिक्स, इडीमा कमी करण्यासाठी वापरली जातात.
- ॲड्रेनल ग्रंथी-संबंधित विकारांकरिता कॉर्टिकोस्टेरॉइड्स, ज्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन होते.