कानात मळ असणे म्हणजे काय?
कानाचा मळ हा मानवी शरीरात नैसर्गिकपणे आढळणारा पदार्थ आहे जो कानाच्या स्वच्छतेसाठी जबाबदार असतो. कानाचा मळ, ज्याला सेरुमॅन देखील म्हणतात, यात ॲन्टी-बॅक्टेरिअल आणि ल्युब्रिकेटींग गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. तरी, जर मळ हा कानात जमा झाला आणि त्याला साफ केले गेले नाही तर तो कानात अडथळा निर्माण करतो, जे कॉम्पिकेशन्स निर्माण करू शकतात.
बऱ्याचदा, कानात मळ असणे हे वृद्ध व्यक्ती किंवा मुलांद्वारे अनुभवले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
ही सर्वसाधारणपणे उद्भवणारी घटना आहे आणि आपण कानात मळ असल्याची खालील चिन्हे आणि लक्षणे अनुभवू शकता:
- ऐकताना त्रास होणे.
- कानामध्ये रक्तसंचय.
- कान सतत पोक करणे किंवा घासण्याची इच्छा होणे.
- सतत खाजवणे.
- कानात घंटी वाजणे (याला टीनिटस देखील म्हणतात).
- चक्कर येणे.
- गंभीर प्रकरणात कानातुन डिसचार्ज होणे.
- चाचणी केल्यानंतर कानाच्या पोकळीत मोठ्या प्रमाणात कानात मळाचा गोळा उपस्थित असणे.
संपूर्ण अडथळा झाल्यास, कमी ऐकायला येऊ शकते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कानातील मळ सामान्यपणे आढळणाऱ्या समस्यांमधून आहे जो सहज व्यवस्थापित केला जाऊ शकतो. कानातील मळाच्या सामान्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- कॉटन बड चा नियमित वापर, ज्यामुळे कानातील मळ मागे ढकलला जातो आणि जमा होतो.
- सर्वसाधारणपणे मळाचे जास्त प्रमाणात उत्पादन.
- इअर प्लग चा नियमित वापर, यात सुद्धा असे आढळले आहे की मळ मागे ढकलला जातो आणि जमा होतो.
- कान साफ करण्यासाठी पिन किंवा त्यासारख्या वस्तूंचा वापर.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जर तुम्हाला वरील उल्लेखित चिन्हे आणि लक्षणांपैकी कोणताही अनुभव आला असेल तर परिस्थिती वाईट होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा. कानात मळ झाला आहे का, हे तपासण्यासाठी ओटोस्कोपचा वापर करून डॉक्टर तुमच्या कानाची तपासणी करतील. निदान किंवा उपचार करण्यासाठी रक्त किंवा इमेजिंग चाचण्या आवश्यक नाही आहे.
एकदा का निदान निश्चित झाले तर तुमचे कान वैद्यकीयदृष्ट्या किंवा स्वतः स्वच्छ करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला एक औषध सांगतील.
ते मेडिकल स्टोअर मध्ये सहजरीत्या उपलब्ध असलेले ड्रॉप्स सुचवू शकतात जे कान साफ करणे सोपे करते. गरज पडल्यास,तुम्ही डॉक्टरांकडून सुद्धा कान साफ करवून घेऊ शकता.