ई. कोलाई संसर्ग काय आहे?
एस्चेरीचिया कोलाई, ज्याला सामान्यता ई. कोलाई म्हटले जाते, ते आपल्या आतड्यातील नैसर्गिक निवासी आहेत. या जीवाणूंचा शोध 1880 च्या दशकाच्या उत्तरार्धात लागला होता, हा जीवाणू हाताळण्यासाठी सुलभ असल्याने आणि त्याच्या ॲरोबिक आणि अनॲरोबिक वातावरणात वाढण्याची क्षमतेमुळे मायक्रोबायोलॉजिकल आणि बायोटेक्नॉलॉजीकल अभ्यासांमध्ये वापरला जातो. याचे 7 वेगवेगळे रोगकारक प्रकार आहेत, जे मूत्रमार्गाच्या संसर्गास (युरिणारी ट्रक इन्फेक्शन यूटीआय-UTI), सेप्टिसिमीया, मेनिनजायटीस आणि अतिसार सारख्या विविध संसर्गासाठी जबाबदार आहेत. भारतात, इ.कोलाई संसर्ग सामान्यतः दरवर्षी पाहिले जातात, अतिसार आणि यूटीआय (UTI) हा सर्वात सामान्य आहे.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
ई. कोलाई संसर्गाच्या प्रकारा वरून तुम्हाला त्याचे विविध लक्षणे दिसून येतील. संसर्गाच्या प्रकारानुसार, चिन्हे आणि लक्षणे आहेत :
- मुलांमध्ये अतिसार आणि प्रवास्यांचा अतिसार: पाण्यासारखी विष्ठा (कधीकधी श्लेष्मासह) आणि उलट्या.
- हेमोरॅगिक कोलायटिस: रक्तरंजित विष्ठा.
- क्रॉन्स रोगासह ई.कोलाई संसर्ग: पोटात सतत सूज, आतड्याच्या भिंतीवर घाव आणि पाण्यासारखी विष्ठा.
- युटीआय(UTI): मूत्रविसर्जना सोबत वेदना, मूत्राचा घाण वास येणे आणि जास्त ताप
- निओनेटल मेनिनजायटीस: नवजात मुलांमध्ये जास्त ताप.
याची मुख्य कारणं काय आहेत?
संसर्गाचे मुख्य कारण रोगकारक ई. कोलाईमुळे होणारे दूषित अन्न आणि पाणी आहे. जरी आतड्यात ई. कोलाई मैत्रीपूर्ण जीवाणू असला, तरी त्याचे रोगकारक अवयव मानवी शरीरात विनाश निर्माण करू शकतात. हे स्वस्थ मनुष्यात देखील संसर्ग निर्माण करू शकतात आणि पुढील कारणांनी संसर्ग पसरू शकतो:
- दूषित पाणी पिणे.
- दूषित अन्न ग्रहण करणे.
- ई. कोलाईने ग्रासीत दूषित जमिनीत उगवलेल्या भाज्या खाणे.
- आरोग्यास हानिकारक असलेल्या खाण्याच्या सवयी.
- इ. कोलाईसोबत दूषित असणारे रुग्णालयातील सांडपाणी.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वेगवेगळ्या ई.कोलाई संसर्गाच्या निदानात प्रामुख्याने जीवाणू किंवा त्याच्या विषारी नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते. संसर्गानुसार, उपचारासाठी पुढील चाचण्या केल्या जातात:
- युटीआय(UTI): मूत्र चाचणी आणि युरीन कल्चर.
- अतिसार: विष्ठेची चाचणी.
- निओनेटल मेनिनजायटीस - सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ-CSF) चाचणी आणि कल्चर.
- क्रॉन्स रोग - पोटातील जखमांचा अभ्यास करण्यासाठी पारंपरिक रेडिओलॉजी आणि त्यांना अल्सरेटिव्ह कोलिटिसपासून विभक्त करणे, त्यासोबतच ई.कोलाई आहे का याची खात्री करण्यासाठी विष्ठे ची तपासणी.
इ. कोलायच्या बहु-प्रतिरोधक जमाती असल्यामुळे उपचार आव्हानात्मक बनू शकतो. कोलाई संसर्गाचा उपचारा या प्रकारे केला जाऊ शकतो:
- अँटीबायोटिक्सचा तर्कशुद्ध वापर.
- प्रोबायोटिक्स.
- बॅक्टेरियोफेज थेरपी.
- अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स.
औषधां व्यतिरिक्त, काही स्वः काळजीचे उपाय जसे भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घेणे उपयुक्त ठरू शकते.
प्रतिबंधक उपायांमध्ये स्वतःची योग्य स्वच्छता, सुरक्षित आहार पद्धती आणि परिसर स्वच्छता यांचा समावेश असतो.