कोरडे नाक म्हणजे काय?
कोरडे नाक एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये परिरातील वेगवेगळ्या प्रकारचे कण (प्रदूषक, व्हायरस आणि बॅक्टेरिया) नाकातून शरीरात जातात. यामुळे नाकातली आर्द्रता कमी होते आणि परिणामी कोरडेपणा येतो. यामुळे व्यक्तीस अस्वस्थ वाटते आणि यामुळे इतर त्रास होऊ शकतात.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची चिन्हे आणि लक्षणे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:
- नाकच्या आतील भागात भेगा आणि जखम.
- नाकात जळजळ.
- नाक खूप खाजवणे.
- तोंडात आणि घशात कोरडेपणा.
- क्वचित नाक सूजणे आणि नाकातून रक्तस्त्राव होणे.
- कधीकधी, नाकात अडथळा निर्माण होतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कोरड्या नाकांचे मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कमी आर्द्रता.
- पर्यावरणाचे घटक.
औषधेंचे साइड इफेक्ट्स जसे की:
- डिकंजेस्टंटस.
- अँटीहिस्टामाइन.
- इम्यूनोसप्रेसन्ट्स.
- दारू आणि अमली पदार्थांचे सेवन.
- शरीरातील हार्मोनल बदल (रजोनिवृत्त महिला).
- र्हायनीटीस.
- उच्च रक्तदाब.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सुरुवातीला, डॉक्टर चिन्हे आणि लक्षणांबद्दल विचारतात. नंतर नाकांची बाह्य व आंतरिक संपूर्ण तपासणी करतात व तपशीलवार इतिहास घेतात. रुग्णाच्या इतिहासावर अवलंबून, व व्यक्तीचे वय आणि शारीरिक तपासणीचे निष्कर्षांच्या आधावर, डॉक्टर खालील गोष्टींचा सल्ला देतात:
- नाकाचे छिद्र (आणि वातपोकळी) आणि नासाग्रसनीच्या संगणित टोमोग्राफी (सीटी) सोबत नाकाची एंडोस्कोपी.
- प्रयोगशाळेतील अन्वेषण, ज्यात रक्त तपासणी, ॲलर्जी साठी चाचणी आणि मायक्रोबायोलॉजिकल स्वँब समाविष्ट आहेत.
उपचार पद्धती खालील प्रमाणे आहेत
- पूर्ववर्ती घटक काढून टाकणे आवश्यक आहे.
- मॉइश्चनिंग: स्वच्छ ह्युमिडीफायर किंवा व्हेपोरायझरच्या मदतीने, कोरडेपणा कमी करण्यासाठी वातावरणात ओलावा निर्माण केला जाऊ शकतो.
- मेकूड काढणे.
- इजा करणारे घटकं टाळावे आणि योग्य श्लेष्मक काळजी घ्यावी.
- मौखिक किंवा स्थानिक अँटीबायोटिक्सने संसर्गाचा उपचार करणे.
- इन्फिरिअर आणि मिडिल टरबाइन शस्त्रक्रियेने काढून टाकणे टाळा कारण त्याने कोरडे नाक होऊ शकते.