कोरडे तोंड म्हणजे काय?
कोरडे तोंड, झेरोस्टोमिया म्हणूनही ओळखले जाते. यात लाळेचा प्रवाह कमी होतो. हे सामान्यतः पाहिले जाणारे लक्षण आहे आणि खूप औषधांच्या दुष्परिणामामुळे वारंवार होते.
चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त अवस्थेत देखील तोंड कोरडे होते. हे वाढत्या वयाशी सुद्धा संबंधित आहे. तीव्र कोरड्या तोंडाने बोलताना, चावताना आणि गिळताना त्रास होऊ शकतो. कोरड्या तोंडामुळे दंत क्षोभ आणि इतर संसर्ग, जसे ओरल थ्रष चा धोका वाढतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कोरड्या तोंडाची चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः
- बोलणे, चावणे, आणि गिळायला त्रास होतो.
- वारंवार तहान लागते.
- ओठ फाटणे.
- तोंडाची चव जाणे.
- घसा दुखणे.
- हॅलिटोसिस (तोंडाचा घाण वास).
- तोंडाचे कोपरे सुखणे.
- तोंडात वारंवार फोडं येणे.
- कवळी घालण्यात अडचण.
- हिरड्याचा संसर्गात वाढ.
याची मुख्य कारणं काय आहेत?
तोंड अनेक कारणांमुळे कोरडे पडते:
- निर्जलीकरण जे कमी द्रवपदार्थ घेतल्याने होते किंवा मूत्रपिंड रोग आणि मधुमेह यांसारख्या वैद्यकीय परिस्थितीमुळे होते.
- तोंडातून श्वासोच्छ्वास(रात्रीच्या वेळी) देखील कोरड्या तोंडासाठी जबाबदार आहे. नाकाचे पॉलीप्स, वाढलेले टॉन्सिल्स आणि ॲलर्जीक र्आनायटिस तोंडातून श्वास घेण्यासाठी प्रवृत्त करतात ज्याने कोरडेपणा वाढतो.
- मधुमेहामुळे लाळ कमी होतो.
- कर्करोगाच्या उपचारांसाठी रेडिएशन थेरपी.
- धूम्रपान.
- कोरडे तोंड ऑटिमीम्यून रोग (स्ज्रोजेन सिंड्रोम) चा देखील परिणाम असू शकतो.
- औषधांमुळे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
याचे निदान खालील पद्धतींनी केले जाऊ शकते:
- सीलोमेट्री - लाळ प्रवाहाचे मापन.
- सियालोग्राफी - लाळेच्यख नलिका मध्ये रेडिओओपेक डायचा वापर.
- इतर अन्वेषण - अल्ट्रासाऊंड, चुंबकीय रेझोनन्स इमेजिंग, लसिका ग्रंथीचे बायोप्सी, इ.
कोरड्या तोंडाच्या उपचारांसाठी मानक मार्गदर्शक नाही. पण, आपण खालील उपचारांनी अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो:
- भरपूर सूट मिळावी म्हणून सलायव्हरी लोझेंजेस आणि सलायव्हरी स्प्रे.
- सलायव्हरी ग्रंथी उत्तेजक, जसे च्यूइंग गम आणि सेंद्रिय आम्ल.
- तोंडाचा कोरडेपणा कमी करण्यासाठी जास्त द्रवपदार्थ पिणे.
- सिस्टमिक औषधे.
विभेदक निदान:
- स्ज्रोजेन सिंड्रोम तोंड आणि डोळे कोरडे होण्याची स्थिति आहे.
- रेडिएशन थेरेपीमुळे तोंड कोरडे होऊ शकते.
- कमी झोप, चिंता आणि घाबरणे यासारख्या शारीरिक स्थिती मुळे तोंडात लाळेची कमतरता.
- हार्मोनल विकार.