अमली पदार्थाचे व्यसन काय आहे?
अमली पदार्थ घेतल्यास प्रत्येक व्यक्तीचा मेंदू आणि शरीर वेगळे प्रतिक्रिया देतात. अमली पदार्थ घेतल्यानंतर लगेच माणूस व्यसनाधीन होत नाहीत, पण जास्त काळ सतत अमली पदार्थ घेतल्यास अमली पदार्थाचे व्यसन लागण्याचा धोका वाढत जातो.
ब्रेन डिसऑर्डर म्हणून अमली पदार्थाच्या व्यसनाला वर्गीकृत केले जाऊ शकते, ह्यामध्ये व्यक्ती पूर्णपणे अमली पदार्थवर अवलंबून रहायला लागतो/लागते आणि त्याला/तिला असे वाटू लागते की अमली पदार्थ शिवाय तो /ती काहीही करू शकत नाहीत. हे व्यसन लागल्याने अमली पदार्थ मिळवण्यास माणूस चुकीचे पावलं उचलू शकतो आणि विशिष्ट अमली पदार्थाचे हवे तसे परिणाम मिळवण्यासाठी डोस वाढवू शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
व्यसनाची काही चिन्हे आणि लक्षणे खाली दिलेली आहेत. शक्य तितक्या लवकर व्यसन असणाऱ्या व्यक्तीस मदत करण्यासाठी या लक्षणाबाबत पालक आणि मित्रांचे देखील जागरूक असणे आवश्यक आहे.
खालीलप्रमाणे चिन्हे आढळतात:
- समाजापासून दुरावा.
- कमी भुक.
- दैनंदिन जीवनात कमी रस.
- छंदांपासून लांब जाणे.
- सारखे अमली पदार्थ खरेदी केल्याने न सांगता येणारे आर्थिक तोटे.
- कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि हॉस्पिटलला भेट देणे टाळणे किंवा दुर्लक्षित करणे.
- चिडचिडेपणा.
- वजन कमी होणे.
- विचित्र आणि अनैतिक वागणूक .
- मानसिक मंदपणा आणि सौम्य भावनिक प्रतिक्रिया.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अमली पदार्थांच्या व्यसनाचे कारण समजून घेणे हा या सामाजिक आरोग्याच्या समस्येवर विस्तृत दृष्टीकोन आवश्यक आहे.
- मनोवैज्ञानिक कारणे, जसे दीर्घकाळ टिकणारा ताण अणि त्रासदायक वातावरणामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक अस्वस्थतेसाठी अमली पदार्थ घ्यावेसे वाटते.
- किशोरवयीन मुलांमध्ये ड्रग्सच्या व्यसनाचे एक प्रमुख कारण मित्रांकडून दबाव आहे.
- पालकांच्या मार्गदर्शनाची कमतरता, शारीरिक आणि लैंगिक अत्याचार किंवा अमली पदार्थाच्या लवकर उपलब्ध होणे, सामाजिक तणावामुळे देखील अमली पदार्थाचा गैरवापर करण्याची शक्यता वाढते.
- संशोधकांनी असेही म्हणणे आहे की व्यसनी होण्यासाठी काही जणांमध्ये आनुवांशिकता देखील कारणीभूत असू शकते.
- वेगवेगळे अमली पदार्थ प्रमाणे वेगवेगळे परिणाम होतात आणि व्यसनाचे कारण प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारे स्पष्ट केले होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बरेचदा अमली पदार्थांचे व्यसनी ला मदत मिळाली की तिने कोणते अमली पदार्थ घेतले हे ती स्वतः सांगते. यामुळे,निदान करणे सोपे जाते. पण जर ती व्यक्ती नाही सांगू शकली तर निदान करण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करायला सांगतात ज्यात अमली पदार्थ रक्तात आहे की नाही हे समजू शकते.
अमली पदार्थ व्यसनाच्या उपचारासाठी बहु-आयामी दृष्टीकोन पाळला लागतो. मनोवैज्ञानिक मदत आणि कुटुंब व इतर नातेवाईकांकडून सपोर्ट हे अमली पदार्थ व्यसनापासून दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते.
औषधां व्यतिरिक्त डॉक्टर ह्या व्यक्तींना पुनर्वसन कार्यक्रमांमध्ये पाठवतात. औषोधोपचारांसोबतच थेरपी सत्रांनी पुनरावृत्ती टळू शकते.
गंभीर स्वरुपाच्या केसमध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करणे गरजेचे असते.