यूरिनरी रिटेंशन म्हणजे काय?
जेव्हा एखादी व्यक्ती समाधानकारक/पुरेशी लघवी करू शकत नाही तेव्हा त्यास यूरिनरी रिटेंशन असे म्हणतात. अशा लोकांना लघवी करावीशी वाटते आणि मूत्राशय भरले आहे हे जाणवते पण ते लघवी करू शकत नाही.
गंभीर यूरिनरी रिटेंशन अचानक उद्भवू शकते आणि त्यात अतिशय वेदना होऊ शकतात ज्यावर त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.पण, दीर्घकालीन यूरिनरी रिटेंशन हे कालांतराने तयार होते आणि त्यात वेदना न अनुभवण्याची शक्यता आहे, तसेच रुग्णास हळूवार मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नसल्याचे जाणवते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
गंभीर यूरिनरी रिटेंशनची लक्षणं खाली दिल्याप्रमाणे असतात:
- लघवी करता न येणे.
- लघवी करावीशी वाटणे.
- ओटीपोटात दुखणे.
- ओटीपोट फुगल्यासारखे वाटणे.
दीर्घकालीन यूरिनरी रिटेंशन ची लक्षणं अशी असतात:
- लघवी करतांना त्रास होणे.
- लघवी चा प्रवाह कमी असणे.
- लघवी केल्यावर सुद्धा परत करावीशी वाटणे.
- लघवी केल्यानंतर पोटात थोडे दुखणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
यूरिनरी रिटेंशनची अनेक कारणं आहेत आणि पुढे काही अंतर्भूत कारणे विस्तृत केली आहेत:
- ओटीपोट किंवा गुप्तांगाजवळ दुखापत.
- स्नानयुच्या समस्या.
- प्रभावित क्षेत्रावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया.
- मधुमेह किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस सारखे विकार.
- कमकुवत मूत्राशय स्नायू .
- बद्धकोष्ठता.
- काही औषधोपचार.
- यूरिनरी ट्रॅक्ट संसर्ग.
- मूत्रमार्गात अडथळा.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
गंभीर किंवा दीर्घकालीन यूरिनरी रिटेंशनचे निदान करण्यासाठी, डॉक्टर पुढील चाचण्या करतात:
- शारीरिक तपासणी.
- सायस्टोस्कोपी.
- सीटी स्कॅन्स.
- युरोडायनॅमिक चाचण्या (या चाचण्यांमध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्ग किती लघवी संग्रहीत करतात आणि सोडतात हे समजते).
- इलेक्ट्रोमयोग्राफी (प्रभावित क्षेत्रातील स्नायू मोजण्यासाठी आणि मूल्यांकन करण्यासाठी).
डॉक्टर यूरिनरी रिटेंशनचे उपचार खालील पद्धतीने करतात:
- युरेथ्रल डायलेशन (लघवी निघण्याकरिता मूत्रमागाचे छिद्र मोठे करणे).
- युरेथ्रल स्टेंट प्लेसमेंट (मूत्रमार्ग रुंद करण्यासाठी कृत्रिम नळी घालणे).
- प्रोस्ट्रेटे औषधे (प्रोस्ट्रेटे ची वाढ थांबवून यूरिनरी रिटेंशनच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी औषधे).
- ब्लॅडर ड्रेनेज (नळी वापरून ब्लॅडर रिकामे करणे).
- शस्त्रक्रिया.