डायबेटिक न्युरोपथी म्हणजे काय?
डायबेटिक न्युरोपथी का मधुमेहातील कॉम्प्लिकेशन मुळे होणारा मज्जातंतूंचा विकार आहे. याची लक्षणे फक्त हात आणि पायावर दिसतात. मधुमेहानी ग्रासलेल्या जवळजवळ 50% लोकांना डायबेटिक न्युरोपॅथी असते, आणि मधुमेह दीर्घकालीन असल्यास याची शक्यता जास्त असते. ब्लड शुगर पातळी नियंत्रणात ठेवून या विकारापासून सरंक्षित होता येते.
डायबेटिक न्युरोपॅथी खालील प्रकारची असू शकते:
- पेरिफेरल न्युरोपॅथी ज्यामध्ये हात आणि पायावर मुंग्या येतात, वेदना होतात, किंवा ते बधिर होतात.
- ऑटोनॉमस न्युरोपॅथी ज्यामध्ये शरीरावर ताबा ठेवणाऱ्या मज्जातंतूंवर परिणाम होतो.
- फोकल न्युरोपॅथी ज्यामध्ये हात, पाय, डोके आणि धड यातील एकाच मज्जातंतूवर परिणाम होतो.
- प्रॉक्सिमल न्युरोपॅथी, हा क्वचित होणार विकार आहे, ज्यामध्ये हिप,नितम्ब किंवा मांडीच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो. हा शरीराच्या एका बाजूवर परिणाम करतो आणि क्वचितच दोन्ही बाजूवर परिणाम होतो. यामुळे तीव्र वेदना होतात आणि खूप वजन कमी होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डायबेटिक न्युरोपॅथी ची लक्षणं त्याच्या प्रकारानुसार वेगवेगळी असतात.
पेरिफेरल न्युरोपॅथी मध्ये, खालील लक्षणं दिसतात:
- पायांवर संवेदना कमी होणे किंवा जळजळणे किंवा असहय्य वेदना होणे.
- तोल जाणे किंवा समन्वय न राहणे.
- स्पर्श केल्यावर हुळहुळणे.
ऑटोनॉमस न्युरोपॅथी अवयवांच्या मज्जातंतूंवर परिणाम करत असल्यामुळे, खालील लक्षणं दिसतात:
- पचन समस्या.
- रक्तदाब कमी होणे.
- असमाधान.
- चक्कर येणे आणि गरगरणे.
- खूप घाम येणे.
- वेदनेची आकलनशक्तीकमी होणे.
फोकल न्युरोपॅथी एकाच मज्जातंतूवर परिणाम करते आणि जे मज्जातंतू प्रभावित झाले आहे त्यावर खालील लक्षणं दिसून येतात:
- मांड्या दुखणे.
- पाठीच्या खालच्यख भागात खूप वेदना होणे (अधिक वाचा: पाठदुखीचे उपचार).
- छातीत दुखून हृदयविकाराचा झटका आला असे वाटणे.
- दृष्टी वर परिणाम होणे, लक्ष केंद्रित करून बघण्यात समस्या.
- ऐकण्याच्या समस्या.
याची मुख्य कारणं काय आहेत?
डायबेटिक न्यूरोपथीचे नेमके कारण अजून स्पष्ट नाही. पण, पुढील काही घटक असू शकतात:
- ब्लड शुगर ची पातळी वाढून मज्जातंतूत केमिकल बदल होतात त्यामुळे ज्या रक्तवाहिन्या ह्या मज्जातंतूंना पोषण देतात त्या बाधित होतात आणि मज्जातंतू सुद्धा खराब होतो.
- डायबेटिक न्युरोपॅथी अनुवांशिक सुद्धा असू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पूर्ण शारीरिक तपासणी करतांना, डॉक्टर पुढील चाचण्या करतात
- स्नायूची शक्ती आणि प्रतिक्रिया तपासणे.
- स्नायूची स्थिती, कंपन, तपमान आणि अलगद स्पर्शाची संवेदनशीलता तपासणे.
- इलेक्ट्रोमोग्राफी, नर्व्ह कंडक्शन स्टडीज, अल्ट्रासाऊंड आणि नर्व्ह या सारख्या इतर चाचण्या करायला सांगू शकतात.
उपचार रुग्णाच्या वय, आरोग्य आणि मेडिकल हिस्टरीवर अवलंबून असतात. रुग्णाच्या वेदना आणि अस्वस्थतेचा पेन- रिलिव्हिंग औषधे देऊन उपचार केला जातो. अँटिडिप्रेसंट औषधे, टॉपिकल क्रीम, ट्रान्सक्यूटेनियस इलेक्ट्रिक नर्व्ह स्टिम्युलेशन थेरपी, रिलॅक्सेशन थेरपी आणि ॲक्यूपंक्चरचा वापर अधिक नुकसान टाळण्यासाठी केला जातो.