दातावरील फोड काय आहे?
दातावरील फोड हा दाताच्या मध्यभागी संसर्गित ऊतींचे संचय झाल्यामुळे उत्त्पन्न झालेली एक स्थिती आहे. हे उपचार न केलेल्या पोकळ्या, दुखापत किंवा मागील दाताच्या उपचारांमुळे होऊ शकते. मध्यम वयोगटातील प्रौढांपेक्षा तरुण व वृद्धांमध्ये हे सामान्यपणे अधिक प्रमाणात आढळते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
दातावरील फोडची चिन्हे आणि लक्षणे यात हे समाविष्ट आहेत:
- दातामध्ये सतत, ठसठसणारी वेदना जी संपूर्ण जबड्याभर पसरते.
- गरम किंवा थंड तापमानाला संवेदनशीलता.
- चावतांना किंवा चघळतांना होणाऱ्या दबावाला संवेदनशीलता.
- ताप.
- चेहऱ्यावर सूज.
- फोड फुटल्यास अचानक तोंडाला दुर्गंधी सुटणे, तोंडात खारट द्रवपदार्थ श्रवणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
मुख्य कारण म्हणजे दातांच्या मध्यभागी म्हणजेच - दातचा आतील भाग ज्यामध्ये रक्तवाहिन्या, नसा आणि संयोजी ऊतक उपस्थित असतात, तिथे जीवाणूंचे आक्रमण. हे दात किडल्यामुळे होऊ शकते. हे जीवाणू दात मध्ये तडा किंवा पोकळीमार्गे प्रवेश करतात आणि दात (मध्यभागी) खराब होतो, त्यामुळे सूज येते आणि पस जमा होतो. याचा धोका निर्माण करणाऱ्या कारणांमध्ये खालील समाविष्ट आहेत:
- दातांची अयोग्य काळजी: अनियमित दात घासण्याची आणि फ्लॉसिंगची सवय.
- साखरेचा अति वापर: मिष्ठान्न आणि सोड्यासारखे भरपूर साखर असलेले अन्नपदार्थ आणि पेयांचे सेवन करणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
दातावरील फोडाचे निदान करण्यासाठी, दंतचिकित्सक प्रभावित दात तपासतात आणि दाताची स्पर्श किंवा दाबावासाठी संवेदनशीलतेची तपासणी करतात. इतर चाचण्या पुढील प्रमाणे आहेः
- दाताचा एक्स-रे एखादा फोड आणि संक्रमण किती प्रमाणात पसरले ते शोधण्यात मदत करू शकतो.
- सीटी स्कॅन देखील करण्यास सांगितले जाऊ शकते.
संक्रमणाची वाढ रोखण्यासाठी उपचारांचा सल्ला दिला जातो. यात खालील पद्धती समाविष्ट आहे:
- कोरणे आणि निचरा करणे.
- रूट कॅनल उपचार.
- दात काढणे.
- अँटीबायोटिक्स.
स्वत:ची काळजी घेण्याच्या टिप्सः
- जेवणानंतर मिठाच्या कोमट पाण्याने स्वच्छ गुळण्या करा, जेणेकरून दातात कोणतेही अन्नकण अडकले राहणार नाहीत.
- पेनकिलर घेऊ शकता.
- फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट वापरून दिवसातून कमीतकमी दोनदा दात घासावेत.
- दर 3-4 महिन्यांनी आपल्या टूथब्रश बदलावा.
- निरोगी आहारामुळे संसर्गाची शक्यता आणि दुर्गंधी कमी होते.
- अँन्टीसेप्टिक किंवा फ्लोराईडयुक्त माऊथवॉशचा वापर केला जाऊ शकतो.