कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग काय आहे?
कॅम्पिलोबॅक्टरचा संसर्ग ही एक प्रकारची अन्नाची विषबाधा आहे. हा सामान्यत: सौम्य असतो परंतु अर्भक, वृद्ध आणि रोग प्रतिकारशक्ती कमी व्यक्तींमध्ये मृत्यु चे कारण बनू शकतो. कोणत्याही वयाच्या लोकांना हा संसर्ग होऊ शकतो. या संसर्गाच्या घटना आणि प्रसार गेल्या दशकात जागतिक पातळीवर वाढलेल्या आहेत. पण, भारतात या गॅस्ट्रोइंटेस्टीनल रोगाची तपासणी कमी प्रमाणात केली जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यानंतर 2-4 दिवसातच खालील लक्षणे दिसून येतात:
काही लोकांमध्ये काहीही लक्षणं दिसत नाहीत. बॅक्टरेमिया (रक्तात जिवाणूंची उपस्थिती), यकृतात जळजळ, आणि स्वादुपिंडात दाह यांचा कॉम्प्लिकेशन्स मध्ये समावेश असू शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
बरेचदा, हा संसर्ग कॅम्पिलोबॅक्टेर प्रजातीमुळे होतो. हे जिवाणू आतडयाच्या आतील मऊ भागावर परिणाम करतात. नंतर इतर शरीराच्या इतर भागांत प्रवेश करून ते भाग प्रभावित करू शकतात. संसर्गाच्या स्त्रोतांमध्ये कच्चे मांस, दूषित अन्नधान्य, पाणी, न तापवलेल्या दुधाचा वापर आणि संक्रमित जनावरांचा संपर्क यांचा समावेश होतो. हे आतड्यांवरील संसर्ग किंवा प्रवाशाच्या अतिसाराच्या कारणांपैकी एक आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
आरोग्य चिकित्सक प्रदाता खालील चाचण्या करायला सांगू शकतात:
- रक्ताची पूर्ण तपासणी (सीबीसी).
- पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) चे अस्तित्व जाणण्याकरता मलाचा नमुना.
- कॅम्पिलोबॅक्टर प्रजातींसाठी स्मलाचे कल्चर.
बरेचदा हा संसर्ग आपोआपच बरा होतो, परंतु काही प्रभावित व्यक्तींना औषधं घेणे आवश्यक असते. निर्जलीकरण टाळून प्रकृतीत सुधारणा करणे हा उपचारांचा हेतू असतो. जर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल तर अँटीबायोटिक थेरेपी दिली जाऊ शकते. स्वत:ची काळजी घेतली तर औषधांची फारशी आवश्यकता भासत नाही. मोठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना अँटी-मायक्रोबियल औषधे दिली जाऊ शकतात.
स्वतःच्या काळजीसाठी
- दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे.
- प्रत्येक वेळी शौचाला जाऊन आल्यावर किमान एक कप द्रव पदार्थ प्यावा.
- ताजे, व्यवस्थित शिजवलेले,गरम अन्न पदार्थ खावेत कारण त्यामुळे विषाणु नष्ट होतात.
- सार्वजनिक ठिकाणी किंवा बाहेरच्या प्रवाहातून पाणी पिऊ नये.
- काहीही खाण्याआधी आपले हात स्वच्छ धुवावे.
हा संसर्ग सामान्यतः सौम्य असतो, परंतु उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. कॅम्पिलोबॅक्टरच्या संसर्गची योग्यरित्या काळजी घेऊन आणि योग्य स्वच्छता ठेऊन उपचार केले जाऊ शकतात.