कॉर्नियल अल्सर म्हणजे काय?
कॉर्नियल अल्सर, ज्याला केराटीटीस असेही म्हणतात, हा डोळ्याच्या कॉर्निया मध्ये दाह निर्माण करणारा गंभीर आजार आहे. या रोगाचा भारतात एकूण प्रभाव अज्ञात आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- डोळा लालसर होणे.
- डोळ्यात यातना होणे आणि हुळहुळ वाटणे.
- डोळ्यातून डिस्चार्ज किंवा पस येणे.
- डोळा चुरचुरणे.
- अश्रू वाहणे.
- प्रकाशाला संवेदनशीलता.
- अस्पष्ट दृष्टी.
- पापण्या सुजणे.
- कॉर्नियावर पांढरे डाग येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कॉर्नियल अल्सर खालील कारणांमुळे होऊ शकतो:
- बॅक्टेरियल संसर्ग:
- सामान्यतः जे लोकं दीर्घकाळ कॉन्टॅक्ट लेन्स घालून ठेवतात, त्या लोकांमध्ये दिसून येतो.
- व्हायरल संसर्ग:
- विशेषतः, हर्पिस सिम्प्लेक्स ज्यामुळे कोल्ड सोअर्स होतात
- तणाव, कमकुवत प्रतिकार शक्ती, आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे
- फंगल संसर्ग :
- स्टेराॅइडल आयड्राॅप्स चा वापर किंवा काॅन्टॅक्ट लेन्स चा चुकीचा वापर यामुळे काॅर्निया मध्ये फंगल इन्फेक्शन होते.
- पॅरासाइटिक संसर्ग:
- अकॅन्थामोबिक अकँथामोईबीक संसर्गा मुळे.
- डोळ्यात भाजले गेल्यामुळे किंवा दुखापतीमुळे.
समाविष्ट असलेले धोकादायक घटक:
- काॅन्टॅक्ट लेंसेसचा वापर.
- कोल्ड सोअर्स किंवा कांजण्या.
- स्टेराॅइड्स असणाऱ्या आय ड्राॅप्स चा वापर.
- पापण्यांचे विकार.
- काॅर्निया मध्ये इजा होणे किंवा भाजणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सुरवातीला डोळ्याची नेहमीसारखी तपासणी, सोबतच मेडिकल हिस्टरी, नुकतीच डोळ्याला जर काही दुखापत झाली असेल तर ती, आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस चा वापर याचे परीक्षण होते. पुढील तपासणी साठी इतर अशा चाचण्या केल्या जाऊ शकतात:
- स्लिट लॅम्प परिक्षण.
- फ्लुरोसेन स्टेन: कॉर्नियामध्ये झालेल्या कोणत्याही हानीला ठळक करण्यासाठी.
- स्क्रॅपिंगचे कल्चर: संसर्गाचा प्रकार शोधण्यासाठी.
- काॅनफोकल मायक्रोस्कोपी: कॉर्निया मधील प्रत्येक पेशीची एक प्रतिमा प्रदान करते.
- हाय-डेफिनेशन फोटोग्राफी.
कॉर्नियल अल्सरच्या उपचारांमध्ये अँटीबायोटिक्स, अँटीफंगल्स किंवा अँटीव्हायरल आय ड्राॅप्स चा वापर होतो. संसर्ग कमी झाल्यानंतर, आपल्याला स्टेरॉइडल आय ड्राॅप्स दिले जाऊ शकतात. जर काही वेदना असतील तर कमी करण्यासाठी पेनकिलर दिले जाऊ शकते.
दृष्टि पुनर्संचयित करण्यासाठी कॉर्नियल प्रत्यारोपण ही एक शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
स्वतःच्या-काळजीच्या टिप्सः
- अधिक नुकसान टाळण्यासाठी डोळ्याचे संरक्षण करणारे गॉगल्स किंवा किंवा चष्मा घाला.
- झोपण्यापूर्वी काॅन्टॅक्ट लेंसेस काढा.
- संसर्ग टाळण्यासाठी आपले डोळे वारंवार थंड पाण्याने धुवा.
कायमचे नुकसान किंवा अंधत्व टाळण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या.