कॉन्टॅक्ट डर्मटायटिस - Contact Dermatitis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 30, 2018

July 31, 2020

कॉन्टॅक्ट डर्मटायटिस
कॉन्टॅक्ट डर्मटायटिस

कॉन्टॅक्ट डर्मटायटिस म्हणजे काय?

कॉन्टॅक्ट डर्मटायटिस ही एक त्वचेची समस्या असून जगभरातील 15% ते 20% लोकांवर परिणाम करते. कॉन्टॅक्ट डर्मटायटिस मध्ये शरीराच्या काही भागावर किंवा संपूर्ण शरीरावर पुरळ आणि खूप खाज सुटते. कॉन्टॅक्ट डर्मटायटिस या रोगाचा प्रसार लोकांचा व्यवसाय, सवयी आणि सभोवतालच्या वातावरणावर अवलंबुन असून प्रत्येक देशात याचे प्रमाण वेगवेगळे आहे. हे ॲलर्जी किंवा प्रक्षोभकांमुळे होऊ शकते. प्रक्षोभकांमुळे होणारा डर्मटायटिस म्हणजे इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मटायटिस हा डर्मटायटिसचा सर्वात सामान्य प्रकार आहे (80%).

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सामान्यतः ॲलर्जन्स किंवा इरिटंट्सशी थेट संपर्कात येणाऱ्या भागांवर कॉन्टॅक्ट डर्मटायटिस होतो. याची लक्षणे काही मिनिटे ते तासांमध्ये दिसून येतात आणि 2 ते 4 आठवडे राहतात. प्रामुख्याने दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे:

  • एक्झिमा मध्ये येते तशी रॅश किंवा चट्टे.
  • खाज सूटणे.
  • वेदना.
  • सूजणे.
  • त्वचा कोरडी पडणे किंवा पापुद्रे निघणे.

इरिटंट प्रकारामध्ये दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • काहीतरी चावल्यासारखे वाटणे किंवा जळजळणे.
  • एरिथिमा.
  • त्वचा सूजणे किंवा सोलणे

हाईव्ज असे म्हणूनही ओळखले जाणारा कॉन्टॅक्ट अर्टिकेरिया हा या विकाराचा कमी सामान्य प्रकार आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

दैनंदिन जीवनात त्वचेवर जास्त ताण आल्यामुळे डर्मटायटिसचा त्रास होतो.

इतर कारणे खालीलप्रमाणे:

  • साबण, डिटर्जंट, ॲसिड किंवा बेसेस यांच्या संपर्कात आल्याने इरिटंट डर्मटायटिस अधिक खराब होतो.
  • ॲलर्जीक प्रकार हा अनुवांशिक कारणांमुळे किंवा ॲलर्जन्सच्या पूर्वीच्या संसर्गामुळे होऊ शकतो. सौंदर्य उत्पादने, औषधे, विशिष्ट प्रकारचे कापड, अन्न, वनस्पती, रबर आणि पॉइझन आइव्ही झाड ही मुख्य ट्रिगर्स आहेत.
  • धातू, सुगंध/अत्तर, ॲन्टीबॅक्टेरियल मलम आणि फॉर्माल्डिहाइड, कोकॅमिडोप्रोपिल बिटेन आणि पॅराफिनिलिनडायामिन यांसारख्या रसायनांशी संपर्क आल्यामुळे कॉन्टॅक्ट डर्मटायटिस होणे संभाव्य आहे.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

निदान असे केले जाते:

  • मेडिकल हिस्ट्री: एक्सपोज होण्याची वेळ आणि कालावधी.
  • शारीरिक तपासणी: रॅशची लक्षणे आणि नमुना यांचे सामान्य परीक्षण.
  • लॅब चाचण्या: संसर्ग तपासण्यासाठी.
  • संवेदनशीलता तपासण्यासाठी पॅच चाचण्या.

उपचार पद्धती खालील प्रमाणे आहेत:

  • टाॅपिकल स्टेराॅइड- जळजळ आणि सूज नियंत्रणात ठेवण्यासाठी.
  • ॲन्टी-हिस्टामाइन- खाज नियंत्रणात ठेवण्यासाठी.
  • टाॅपिकल इम्यूनोमाॅड्यूलेटर्स: प्रतिकार प्रतिक्रिया नियंत्रित करण्यासाठी.
  • टाॅपिकल ॲन्टीबायोटीक्स.
  • सिस्टेमिक स्टेराॅइड्स- स्थानिक स्टेराॅइड्स काम करत नसल्यास सुज नियंत्रित करण्यासाठी.
  • फोटोथेरपी म्हणजेच, प्रभावित भागाची सूज कमी करण्यासाठी विशिष्ट वेव्हलेंथच्यख प्रकाशात त्वचेस देणे.

स्वतःच्या काळजीचे उपाय पुढील प्रमाणे आहेत:

  • तीव्र लक्षणांसाठी, खाजेपासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड काॅम्प्रेस चा वापर केला जातो.
  • माॅइस्चर राखून ठेवणारे लोशन किंवा क्रीम चा वापर.
  • ज्यामुळे खाज किंवा चुरचूर होते, असे एजंट्स वापरणे टाळले पाहिजे.
  • ओरबाडणे टाळणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
  • खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी ज्यामुळे आराम मिळतो.
  • ज्यामुळे खाज होत नाही अशा कापडापासून बनलेले हातमोजे आणि कपडे घाला.
  • त्वचेवर डाग सोडणारी किंवा इतर विकार करणारी ॲक्सेसरीज घालणे टाळा.

जीवनशैलीत खालील काही बदल केल्याने फायदे होतात आणि लवकर बरे वाटते:

  • ध्यान.
  • योगा.
  • विश्रांतीचे विविध मार्ग.

निरोगी जीवनशैली अंगीकारल्याने काॅन्टॅक्ट डर्मटायटिस टाळता येऊ शकतो, कारण ते औषधाच्या परिणामास पूरक असते.

(अधिक वाचा: त्वचा रोग कारणं आणि उपचार)



संदर्भ

  1. Guruprasad KY et al. Clinical profile of patients with allergic contact dermatitis attending tertiary care hospital. International Journal of Research in Dermatology. Int J Res Dermatol. 2017 Dec;3(4):517-522
  2. National Eczema Association. Contact Dermatitis. Novato, California. [internet].
  3. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; Contact dermatitis
  4. American Academy of Allergy, Asthma and Immunology [Internet]. Milwaukee (WI); Contact dermatitis: overview
  5. MSDmannual professional version [internet].Contact Dermatitis. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA

कॉन्टॅक्ट डर्मटायटिस साठी औषधे

Medicines listed below are available for कॉन्टॅक्ट डर्मटायटिस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹95.0

Showing 1 to 0 of 1 entries