कोलोरेक्टल कॅन्सर काय आहे?
कोलोरेक्टल कॅन्सर मोठ्या आतडी, कोलन किंवा गुदाशय, किंवा दोन्ही भागांवर परिणाम करतो. कोलन किंवा गुदाशयच्या आतील बाजूचा काही भाग पुढे येऊन याची सुरुवात होते. कोलन मलातील अतिरिक्त पाणी शोषून घेते आणि मल शरीराच्या बाहेर निघेपर्यंत गुदाशय त्याला साठवून ठेवते.
आहार आणि कमी लठ्ठपणा असल्यामुळे भारतातील कोलोरेक्टल कर्करोगाचा दर इतर देशांपेक्षा कमी असल्याचे दिसून येते, पण जगण्याचा दर पाच वर्षां इतका कमी आहे.
याचे मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?
सामान्य लक्षणे जे दिसून येतात ते खालील प्रमाणे आहेत:
- मलच्या सवयमधील बदल जसे पातळ मल किंवा खूप काळापासून बद्धकोष्ठता असणे.
- पोट साफ न होण्याची भावना.
- संकुचित आकाराचे मल.
- कोलन किंवा गुदाशयमध्ये रक्तस्त्रावामुळे गडद रंगाचे मले होण.
- पोटात दुखणे.
- अशक्तपणा.
- अचानक वजन कमी होणे.
सहसा याची लक्षणे उशीरा दिसू लागतात तसेच व्यक्तीनुसार लक्षणे आणि स्थितीची तीव्रता बदलू शकते.
क्रोहन्स रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, रक्तस्राव आणि संसर्ग या आजारामध्ये देखील अशीच लक्षणे असतात.
याची मुख्य कारणे काय आहेत?
कोलोरेक्टल कर्करोगाचे मूळ कारण अद्याप ही सापडले नाही आहे, पण कोलोरेक्टल कर्करोग होण्याची अधिक शक्यता खालील परिस्थितीत असते:
- 50 वर्षांवरील पुरुष.
- व्यक्तीच्या कुटुंबामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा इतिहास अस.
- लठ्ठ लोक.
- ध्रुमपान करणारी व्यक्ती.
- मद्यपान करणारी व्यक्ती.
- लाल आणि प्रोसेस्ड मांस खाणारे.
- आहारात कमी फायबर खाणारे.
- आसक्त जीवनशैली असलेले व्यक्ती
- अवयव प्रत्यारोपणानंतर इम्यूनोसप्रेसंट औषधोपचार घेणारे
- इंसुलिन प्रतिरोधकांसह डायबिटीस मॅलिटस असणारे किंवा एचआयव्ही चा संसर्ग असेलेले व्यक्ती
- रेडिएशन थेरपी घेणारे व्यक्ती, जसे., प्रोस्टेट कॅन्सर.
- पित्ताशय काढलेले व्यक्ती.
- कोरोनरी हृदय रोग असेले व्यक्ती.
वरील गोष्टी केल्यास कॅन्सर होईलचं असे नाही, पण या मुळे शक्यता नक्कीचं वाढू शकते.
याचे निदान आणि उपचार कसे होते?
रक्त असलेले मल किंवा गुदाशयातील रक्तस्त्राव अनुभवल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण ही सामान्य स्थिती नाही आहे.
कोणत्याही मासेस किंवा असामान्यतेसाठी डॉक्टर गुदाशय तपासतील. हिमोग्लोबिन, लाल रक्तपेशींची संख्या (जे रक्तस्रावामुळे कमी होऊ शकते) आणि इतर पेशींची संख्या, यकृत परीक्षण आणि मूत्रपिंडच्या पडताळणीसाठी रक्त तपासणी करतील. वारंवार रोगाची स्थिती अनुभवल्यास, रक्तातील विशिष्ट अँटीजनचे स्तर बघण्यासाठी तपासणी केली जाऊ शकते. कॉलनोस्कोपी,ही पोलिप्स ओळखण्यासाठीची स्क्रीनिंग चाचणी केली जाऊ शकते. इतर अवयवांवरील कॅन्सरचा प्रभाव तपासण्यासाठी कधीकधी छातीचा एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी आणि सीटी स्कॅन केले जाऊ शकते.
शस्त्रक्रिया हा एक उपचारचा पर्याय आहे. किमोथेरेपीटिक औषधे देखील उपचारांसाठी दिली जातात. रेडिएशन थेरपी ठराविक प्रकरणामध्येच वापरली जाते. इम्यूनोथेरपी कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत वापरली जाते.