कोल्ड सोर्स म्हणजे काय?
कोल्ड सोर्स द्रवपदार्थाने भरलेले लहान फोडं असतात जे आपोआप फूटतात किंवा खपली येऊन निघून जातात. सामान्यतः जरी ते तोंडाच्या कोपऱ्यात दिसून येत असले तरी ते चेहऱ्याच्या इतर भागात, हातावर किंवा शरीराच्या इतर भागावर पण दिसून येतात.
ह्याचा संसर्ग व्हायरसमुळे होतो आणि हे संक्रामक असतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- फोड येण्यापूर्वी, त्या जागेवर तुम्हाला काही अस्वस्थता जाणवेल.तुम्हाला खाजवेल किंवा जळजळण्याचा अनुभव येईल, त्या शिवाय त्या जागेवर हात लावल्यास दुखेल.
- एकदा पूर्णपणे तयार झाल्यानंतर, सोर्स मध्ये पिवळा द्रव-भरलेला केंद्र असतो जो दाबल्यावर त्यातून तो द्रव निघून येतो.
- फोड फुटल्यावर त्यावर खपली येते व ती नंतर निघून जाते. हे फोड सामान्यतः एक आठवड्यापर्यंत राहतात.
- जर व्हायरसचा संसर्ग खूप गंभीर असेल तर तुम्हाला फोडासह ताप येणे, लिम्फ नोड सूजणे आणि हिरड्या दुखणे असा त्रास देखील होऊ शकतो.
- मौखिक संभोगाने कोल्ड सोर्स जननांगांमध्ये पसरू शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस (एचएसव्ही) हा एक जिवाणू आहे ज्यामुळे कोल्ड सोर्स होतात. एचएसव्ही दोन प्रकारचे असतात - एचएसव्ही -1 आणि एचएसव्ही -2 .
- एचएसव्ही -1, ज्याला हर्पिस सिम्प्लेक्स लेबियालिस देखील म्हणतात, त्याचा सामान्यत: तोंड आणि आसपासच्या भागांवर प्रभाव पडतो, तर एचएसव्ही -2 मुळे जननेंद्रियावर किंवा आसपासच्या भागांवर कोल्ड सोर्स होतात.
- हे व्हायरस व्यक्तींमध्ये चुंबनातून किंवा एक दुसऱ्यांचे रुमाल, लिप बाम, भांडी आणि इतर वैयक्तिक वस्तू वापरल्याने पसरतात.
- शरीराच्या मज्जातंतू मध्ये हे व्हायरस निष्क्रिय असतात त्यामुळे पुनरावृत्ती होणे सामान्य आहे. हे कमकुवत प्रतिकार शक्ती, उन्हात फिरणे, ताण आणि हार्मोनल चढउतारांसारख्या कारणांमुळे होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- डॉक्टर सामान्यतः फोड बघून निदान करू शकतात आणि फोडच्या मध्यभागीतील द्रवाची चाचणी करून पुष्टी करतात.
- संसर्गामुळे तुमच्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या देखील वाढू शकते.
- अँटी-व्हायरल औषधे कोल्ड सोर्सच्या उपचारासाठी आवश्यक आहेत.
- औषधं म्हणून गोळ्या तर गंभीर प्रकरणांमध्ये इंजेक्शन पण दिले जाऊ शकते.
- खाज आणि जळजळ पासून आरामाकरिता टॉपिकल मलमचा वापर करू शकता.
- रुग्णाने वैयक्तिक वस्तूं सामायिकर करु नये आणि चुंबन आणि लैंगिक संभोगच्या माध्यमातून संपर्क टाळावा.