सारांश
मूत्रपिंडाचे घातक आजार (CKD) (क्रॉनिक रेनल डिसीझ) एक असे आजार आहे, ज्यामध्ये मूत्रपिंडाच्या कार्याची टप्प्याटप्प्याने हानी होते. याचे अर्थ असे की, आजारात वाढ झाल्याबरोबर, टप्प्याटप्प्याने मूत्रपिंडे सामान्य पद्धतीने रक्ताची छाननी करू शकणार नाहीत. सीकेडीची दोन सर्वांत सामान्य कारणे म्हणजे मधुमेह आणि हृदयरोग. सुरवातीच्या टप्प्यामध्ये, कोणतीही विशेष लक्षणे नसतात. म्हणून, त्याचे निदान सामान्यपणें काही विशिष्ट रक्त व लघवी चाचण्यांद्वारे नियमित आरोग्य चाचणीदरम्यान होते. तरीही, मूत्रपिंडाचे कार्य उपचाराबरोबर अधिकच बिघडल्यास, किंवा सीकेडीचे निदान आधीच्या टप्प्यामध्ये न झाल्यास, व्यक्तीमध्ये टाच सुजणे, लघवीत रक्त, स्नायूच्या आकड्या, वारंवार लघवी लागणें आणि थोड्या हालचालीने श्वास जाण्यासारखी लक्षणे दिसू शकतात. सीकेडीचे उपचार कारणावर आधारित आहे. औषधोपचारासह, जीवनशैलीचीही सीकेडीच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका असते. मूत्रपिंडाचे कार्य बिघडतच राहिल्याने, शेवटी रुग्णाला शेवटच्या टप्प्याचे मूत्रपिंडरोग( ईएसआरडी/ मूत्रपिंड निकामी होणें) होऊ शकते, ज्यामध्ये डायलसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज पडते. सीकेडी असलेल्या दर 50मधील 1 व्यक्तीचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गुंतागुंती व अंततोगत्त्वा, मूत्रपिंड निकामी होणें टाळण्यासाठी वेळीच निदान व उपचाअर महत्त्वाचे आहे.