सरव्हायकल डिस्टोनिया - Cervical Dystonia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 29, 2018

March 06, 2020

सरव्हायकल डिस्टोनिया
सरव्हायकल डिस्टोनिया

सरव्हायकल डिस्टोनिया काय आहे?

सरव्हायकल डिस्टोनिया (सीडी-CD) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यास स्पॅस्मोडिक टॉर्टीकोलिस असेही म्हटले जाते आणि हा फोकल डायस्टोनियाचा प्रकार आहे. हे मानेच्या स्नायूंचे असामान्य आणि अनैच्छिक संकुचन झाल्याने लक्षात येते. यामुळे आपले डोके बाजूने, मागे किंवा पुढे जाण्यास प्रवृत्त होऊ शकते आणि आपल्या खांद्यावर देखील परिणाम होऊ शकतो. जरी सीडी (CD) हा सर्व वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये होऊ शकतो, तरी तो सामान्यत: स्त्रिया आणि 40 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये सामान्यपणे पाहिला जातो. सीडी (CD) दोन प्रकारचे असू शकते, प्राथमिक किंवा आयसोलेटेड आणि सेकंडरी.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सीडी (CD) चे सर्वात सामान्य चिन्ह म्हणजे मानवाच्या स्नायूंचे असामान्य अनैच्छिक संकुचन. स्नायू स्पॅम हे निरंतर, झटके देणारे किंवा दोन्हीचे मिश्रण असू शकते आणि त्यामुळे अस्वस्थता, कठोरता आणि वेदना होऊ शकतात. हे संकुचन वाढू शकते आणि खांद्याच्या स्नायूंमध्ये पसरले जाऊ शकते, परंतु खांद्याच्या पलीकडे असलेल्या स्नायूंवर त्याचा परिणाम होत नाही.

सातत्यपूर्ण संकुचितपणामुळे मान आणि डोक्याची अस्वस्थ मुद्रा बनते, तर वारंवार संकुचितपणामुळे डोके झटक्याच्या हालचाली करु लागते. सर्वात सामान्य अव्यवस्थित अवस्था जी अनुभवली जाते, ती म्हणजे हनुवटी खांद्याकडे वळवताना डोके बाजूच्या दिशेने फिरणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

बहुतेकदा, आयसोलेटेड सीडी (CD) चे मूळ कारण अज्ञात असते आणि त्यासाठी केवळ न्यूरोलॉजिकल घटक जबाबदार आहेत असे वाटते. प्राथमिक सीडी(CD) चे कारण याप्रकारे असू शकतात

  • सीडी (CD) चा कौटुंबिक इतिहास.
  • अनेक जीनचे म्युटेशन / जनुकीय कारणे.
  • पर्यावरणीय घटक.

सेकंडरी सीडी (CD) चे कारणः

  • अँटिसाइकोटिक औषधे वापरणे
  • डोपामाईन रिसेप्टर्सला रोखणाऱ्या व मळमळी चा उपचार करणारी औषधे वापरणे.
  • टॉक्झिन.
  • इतर न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांची बाधा.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

बऱ्याच प्रयोगशाळा चाचण्या जसे इमेजिंग तंत्र सीडी (CD) च्या निदानासाठी सामान्यतः वापरले जातात; म्हणून, विकार निदान करण्यासाठी क्लिनिकल तपासणी केली जाते. सीडी (CD) चे निदान करण्यात खालील उपाय उपयोगी आहेत:

  • सीडीची वैद्यकीय चाचणी आणि ज्ञान.
  • प्रत्येक व्यक्तीचा तपशीलवार वैद्यकीय इतिहास.
  • स्पाइनल कॉर्डमधे दाब असल्याचा संशय असल्यास मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) मदत करू शकते.
  • जर तंत्रिका जळजळ करत असेल तर इलेक्ट्रोमायोग्राफी मदत करू शकते.

सीडीच्या उपचार पद्धतीचा प्रभाव व्यक्तीनुसार भिन्न असू शकतो आणि बहुतांश पद्धतींमध्ये लक्षणे दूर करणे आवश्यक आहे. सीडी (CD) साठी उपलब्ध असलेले उपचाराचे पर्याय खालील प्रमाणे आहेत:

  • बोट्युलिनम टॉक्झिन इंजेक्शन.
  • तोंडावाटे औषध.
  • शस्त्रक्रिया.
  • शारीरिक थेरपी.

तणावाचा सीडी (CD) शी कोणताही संबंध नसला तरीही, लक्षणे आणखी गंभीर होऊ शकतात. ताण, उत्साह किंवा ठराविक मुद्रेमुळे डायस्टोनिया सक्रिय होऊ शकतो आणि लक्षणे गंभीर होऊ शकतात.

ताण कमी करणे आणि आपल्या मुद्रा व्यवस्थित करून लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात. डोके आणि मानेच्या पट्ट्याचा वापर केल्याने आपल्याला वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यास देखील मदत होऊ शकते.



संदर्भ

  1. Dystonia Medical Research Foundation. Dystonia News. Medical Research Foundation; [Internet]
  2. National Organization for Rare Disorders. Cervical Dystonia. Danbury CT; [Internet]
  3. Brain Foundation. Cervical Dystonia. Australia. [Internet]
  4. American Academy of Family Physicians. Cervical Dystonia. UK; [Internet]
  5. National Health Service [Internet]. UK; Dystonia

सरव्हायकल डिस्टोनिया साठी औषधे

Medicines listed below are available for सरव्हायकल डिस्टोनिया. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹537.0

Showing 1 to 0 of 1 entries