सेल्युलाइटिस काय आहे?
सेल्युलाइटिस त्वचेचा विकार आहे जो प्रामुख्याने खालच्या अवयवांना प्रभावी करतो. कदाचित, काही प्रकरणांमध्ये चेहरा किंवा हात देखील प्रभावित होऊ शकतात. हा जिवाणूजन्य संसर्ग असून, यात त्वचा लाल आणि सुजलेली दिसते आणि स्पर्शाला अत्यंत संवेदनशील असते. सेल्युलाइटिस संसर्जन्य नाही आहे आणि सहज नियंत्रित केला जाऊ शकतो पण, उपचार न केल्याने तो धोकादायक ठरु शकतो कारण असे न केल्यास लिम्फ नोड्सद्वारे रक्तप्रवाहात संसर्ग पसरु शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्यतः लक्षणे शरीराच्या एकाच भागावर आढळतात आणि त्यात खालील लक्षणं दिसतात:
- त्वचेचा लालसरपणा.
- वेदना होणे आणि नाजूकपणा.
- सूज येणे आणि खळी पडणे.
- फोड येणे.
- प्रभावित क्षेत्राजवळ उष्णता आणि ताप असण्याची शक्यता.
याची मुख्य कारणं काय आहेत?
ही स्थिती उद्भवण्यामागे सामान्यतः स्टॅफिलोकोकस किंवा स्ट्रेप्टोकोकस सारखे जिवाणू कारणीभूत असतात. त्वचेचे संसर्ग,शस्त्रक्रियेची जखम, अल्सर, दुखापत आणि प्राण्यांच्या चावा ई. द्वारे शरीरावरील उघड्या भागातून ते आत शिरतात. ते सर्वसाधारणपणे पायमध्ये आढळतात
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदान अगदी सोपे आणि सरळ आहे. निदान किंवा संसर्गाच्या एजंटची पुष्टी करण्यासाठी रक्त परीक्षण जसे पूर्ण ब्लड काउंट आणि एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन दराची आवश्यकता भासू शकते.
उपचार हे सामान्यपणे तोंडी अँटीबायोटिक्सच्या स्वरूपात दिले जातात. स्थानिक क्रीमचा उपयोग करुन काळजी घेतली जाऊ शकते. काही दिवसात सुधारणेची काही लक्षणं दिसू शकत असली तरी डॉक्टर 10 ते 15 दिवसांसाठीची औषध लिहून देऊ शकतात. दिलेल्या औषधांचा कोर्से पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून रोग परत येणार नाही आणि शरीरातून जिवाणू बाहेर निघाल्याचे निश्चित करणे देखील आवश्यक आहे.
जर ताप जास्त असेल, लक्षणे शरीराच्या जास्त भागात पसरली असतील किंवा रुग्ण तोंडी औषधांना योग्यरित्या प्रतिसाद देत नसेल तर, डॉक्टर इन्ट्राव्हेनस्ली अँटीबायोटिक देऊन नियंत्रण करु शकतात.