कार्सिनॉईड सिंड्रोम - Carcinoid Syndrome in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 29, 2018

March 06, 2020

कार्सिनॉईड सिंड्रोम
कार्सिनॉईड सिंड्रोम

कार्सिनॉईड सिंड्रोम म्हणजे काय?

कार्सिनॉईड ट्यूमर म्हणजे शरीराच्या पेशींमध्ये असामान्य पेशी तयार होणे ज्यामध्ये मज्जातंतूसारखे आणि एंडोक्राइन अवयवांसारखे दोन्ही गुणधर्म असतात उदा.,न्युरोएंडोक्राइन पेशी. सहसा त्या पाचन तंत्रात आढळतात. कधीकधी ज्या लोकांना कॅन्सरस कार्सिनॉईड ट्युमरची समस्या असते त्यांमध्ये काही अवघड स्थिती आणि लक्षणे आढळतात जी त्यांच्या आजाराशी जुळत नाहीत. याला कार्सिनॉईड सिंड्रोम म्हणतात - म्हणजे असा आजार जो कार्सिनॉईड ट्यूमरमधून रसायनांचा स्राव झाल्यामुळे होतो. याची लक्षणे शरीराच्या विविध भागांमध्ये, आणि विविध रूपांमध्ये अनुभवली जाऊ शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ट्युमर कुठे आहे आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचे रसायने स्त्रावित झाले आहेत याच्या आधारावर लक्षणे बदलू शकतात. काही सामान्य लक्षणे अशी आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

कार्सिनॉईड ट्यूमर हे सर्व लक्षणे आणि सिंड्रोमचे कारण आहे. कर्करोग अधिक प्रगत अवस्थेत गेल्यास हे सामान्यतः होते, परंतु सुरवातीच्या टप्प्यामध्ये देखील कार्सिनॉईड सिंड्रोमच्या काही तक्रारी आढळतात.

कार्सिनॉईड ट्यूमर सामान्यत: गुदाशय, कोलोन, आतडे, पोट किंवा पाचन मार्गामध्ये आढळतो. ट्युमर मधून रसायने स्त्रावित झाल्यामुळे विकाराची लक्षणे दिसून येतात. सर्वच कार्सिनॉईड ट्यूमर सिंड्रोमचे कारण बनत नाहीत कारण सर्व ट्युमर रसायने स्त्राव करीत नाहीत.

बहुतेकदा, रक्तापर्यंत पोहोचण्याआधी आणि लक्षणे दिसण्याआधी यकृताद्वारे रसायने निष्प्रभावीत केली जातात. कधी कधी ट्यूमर यकृतापासून खूप लांब असू शकतो जो त्या रसायनांना निष्प्रभावीत करु शकत नाही, किंवा ट्यूमर यकृतामध्ये असू शकतो किंवा त्यात पसरलेला असू शकतो, ज्यामुळे रसायने रक्तप्रवाहापर्यंत पोहोचतात आणि कॅरसिनोइड सिंड्रोम म्हणून दिसू लागतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

बहुतेक विशेषज्ञ जे या कर्करोगाचा उपचार करतात आणि रुग्णाच्या इतिहासाबद्दल जागरूक असतात ते या सिंड्रोमचे निदान सहज करू शकतात. तरीसुद्धा, पोटाशी संबंधित डायरिया सारख्या समस्या वगळण्यासाठी ते काही चाचण्या करू शकतात. निदान चाचण्या खालील प्रमाणे आहेत:

  • कार्सिनॉईड ट्यूमरद्वारे बाहेर टाकल्या गेलेल्या सेरोटोनिनची उपस्थिती तपासण्यासाठी मूत्र चाचणी.
  • क्रोमोग्रानीन ए, जे एक कॅरसिनोइड रसायन आहे तपासण्यासाठी रक्त तपासणी.
  • ट्यूमर शोधण्यासाठी आणि त्याच्या प्रसार तपासण्यासाठी सिटी स्कॅन आणि इमेजिंग.

या सिंड्रोमचे काही उपचार नाही आहेत, ते फक्त कर्करोगासाठी आहे. पण काही नियोजित पद्धती पुढील प्रमाणे आहेत:

  • शस्त्रक्रियेने ट्युमर काढणे.
  • स्किन फ्लशिंग आणि अतिसार कमी करण्यासाठी आणि ट्यूमरची वाढ मंद करण्यासाठी ऑक्ट्रियोटाइड आणि लेनरियोटाइड सारखी औषधे इंजेक्शनद्वारे देणे.
  • हिपॅटिक आर्टरी एम्बोलायझेशन द्वारे यकृतास रक्त पुरवठा रोखणे ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींना रक्त पुरवठा कमी होतो.
  • रेडिओफ्रीक्वेंसी अब्लेशनने पेशींना गरम करणे, आणि क्रायथेरपीने पेशींना गोठवणे आणि त्यांचा नाश करणे.
  • इंटरफेरॉन अल्फा वापरून रोगप्रतिकार यंत्रणेस उत्तेजन देणे, जे ट्यूमरच्या वाढीस संथ करते आणि रुग्णास आराम देते.
  • कर्करोगासाठी किमोथेरपी.



संदर्भ

  1. Niederhuber JE, et al., eds. Cancer of the endocrine system. In: Abeloff's Clinical Oncology. 5th ed. Philadelphia, Pa.: Churchill Livingstone Elsevier; 2014
  2. Feldman M, et al. Neuroendocrine tumors. In: Sleisenger and Fordtran's Gastrointestinal and Liver Disease: Pathophysiology, Diagnosis, Management. 10th ed. Philadelphia, Pa.: Saunders Elsevier; 2016.
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Carcinoid syndrome
  4. Pandit S, Bhusal K. Carcinoid Syndrome. [Updated 2019 Apr 8]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. National Institutes of Health [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Carcinoid tumor.